BK01104
New product
'बँकिंग'विषयक प्रश्नांना अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे म्हणजे 'बँकिंग क्लासरूम'
ही एक प्रकारची 'बँकिंग साक्षरता'च आहे. याचा प्रमुख हेतू लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे, हा आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Banking Classroom - Bhag 2
'बँकिंग'विषयक प्रश्नांना अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे म्हणजे 'बँकिंग क्लासरूम'
ही एक प्रकारची 'बँकिंग साक्षरता'च आहे. याचा प्रमुख हेतू लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे, हा आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे तसेच फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे, हाही या साक्षरतेचा एक भाग आहे.
रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत. यांमुळे यामधील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून 'तज्ज्ञांचे मत' (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत.
बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहोचवण्याची कृती आणि कार्य या 'बँकिंग क्लासरूम'मधून साध्य होईल.
लेखकाविषयी माहिती : विद्याधर अनास्कर यांनी M.com., DTL, DLL & LW, LLB पदव्या संपादन केल्या आहेत. ते कर सल्लागार म्हणून कार्यरत असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी बँकिंग क्षेत्रात विविध पदे भूषवली आहेत, त्यामध्ये माजी अध्यक्ष, महाराष्ट्र सहकार परिषद (राज्यमंत्री दर्जा), ‘प्रशासकीय अध्यक्ष’, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ या राज्याच्या शिखर बँकेवर गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत आहेत. संचालक, ‘नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स लि.,’ नवी दिल्ली, संचालक, को-ऑपरेटिव्ह बँक्स ऑफ इंडिया, नवी दिल्ली, सदस्य, ‘राज्य सहकार विकास समिती’, सदस्य, विद्या परिषद, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा, अध्यक्ष, विद्या सहकारी बँक लि., पुणे, सदस्य , ‘पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन’, संचालक , ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन,’ मुंबई, सलग १२ वर्षे अध्यक्ष सदस्य, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या स्थायी सल्लागार समिती, सलग १२ वर्षे, सदस्य , ‘तज्ज्ञ गट’ नागरी सहकारी बँक, नवी दिल्ली, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने विविध राज्यांकरिता स्थापन केलेल्या कृतिदलाचे (TASKFORCE), गुजरात, गोवा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, सलग १२ वर्षे प्रतिनिधत्व, उपाध्यक्ष, सहकार कायदा दुरुस्ती समिती, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थापक विश्वस्त, ‘बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान’ संस्थापक विश्वस्त, ‘दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकिंग सर्व्हिसेस प्रा .लि.’ यांचा समावेश आहे. वर्तमानपत्र व नियतकालिकांमधून बँकिंग क्षेत्राबद्दल त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Vidyadhar Anaskar |
Language | Marathi |
ISBN | 978-93-49487-01-7 |
Binding | Paperback |
Pages | 232 |
Publication Year | 05/07/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |