SHARIR VIDNYANACHE TUSHAR - Dr. H. V. Sardesai (Marathi)

BK00277

New product

शरीर- विज्ञानाचे रंजक तुषार

आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, गरगरणे, पोटात दुखणे यांसारखे नेहमीचे आजार का आणि कशामुळे होतात ? साधा खोकला कोणता आणि धोकादायक कोणता ? कावीळ झाल्यावर व्यक्ती पिवळी का दिसते ? कोणते आजार टाळता येतात ? कोणत्या तपासण्या कधी कराव्यात ? हे आहेत आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळू शकतात. 

More details

₹ 150 tax incl.

More Info

आपण कधीच आजारी पडू नये अशीच आपली इच्छा असते. एवढंच नाही तर आपण सुदृढ, तल्लख, चपळ , आनंदी असावे, बऱ्याच गोष्टी सहज करता याव्यात असंही मनापासून वाटत असतं. ठणठणीत प्रकृती असणारेही कधी ना कधी आजारी पडतात किंवा अस्वास्थ्याची काही लक्षणं त्यांच्यात दिसू लागतात. प्रति धन्वंतरी म्हणून विख्यात असलेले डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी प्रकृतिविषयक लहानसहान विषयांवर पटरन वाचून होईल अशा प्रकारतं केलेलं लेखन
' साप्ताहिक सकाळ'मध्ये सदर रूपानं प्रसिद्ध झालं. तेच छोटे छोटे लेख ' शरीर-विज्ञानाचे तुषार' मधून संग्रहित केलेलं आहे.

आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, गरगरणे, पोटात दुखणे यांसारखे नेहमीचे आजार का आणि कशामुळे होतात ? साधा खोकला कोणता आणि धोकादायक कोणता ? कावीळ झाल्यावर व्यक्ती पिवळी का दिसते ? कोणते आजार टाळता येतात ? कोणत्या तपासण्या कधी कराव्यात ? हे आहेत आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळू शकतात. अत्यंत क्लिष्ट असलेल्या शरीर- विज्ञानाबाबत आपल्या निरामय प्रकृतीसाठी जाणून घेणं हिताचं. अगदी थोड्या वेळात वाचून होईल असं हे सहजसोपं लेखन एकदा वाचल्यावर वारंवार वाचावंसं वाटेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. H. V. Saradesai
LanguageMarathi
ISBN9789384316983
BindingPaperback
Pages136
Publication Year2016
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

SHARIR VIDNYANACHE TUSHAR - Dr. H. V. Sardesai (Marathi)

SHARIR VIDNYANACHE TUSHAR - Dr. H. V. Sardesai (Marathi)

शरीर- विज्ञानाचे रंजक तुषार

आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं? ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, गरगरणे, पोटात दुखणे यांसारखे नेहमीचे आजार का आणि कशामुळे होतात ? साधा खोकला कोणता आणि धोकादायक कोणता ? कावीळ झाल्यावर व्यक्ती पिवळी का दिसते ? कोणते आजार टाळता येतात ? कोणत्या तपासण्या कधी कराव्यात ? हे आहेत आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकातून मिळू शकतात. 

Customers who bought this product also bought: