Disha Bandhkam Navnirmitichi

BK00342

New product

जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता येण्याची मोठीच सोय झाली आहे.

More details

₹ 380 tax incl.

More Info

बांधकामातील नवी दिशा

जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता येण्याची मोठीच सोय झाली आहे.

मेढेकरांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी विशेष श्रेणीत संपादन केल्यावर सुरवातीला पुण्यातल्या एका बांधकाम कंपनीत नोकरी केली. अनुभव व आत्मविश्वाच्या बळावर ते लवकरच इराकची राजधानी बगदाद येथे जाऊन पोहोचले. बांधकामाशी संबंधित विविध घटकांची माहिती त्यांनी करून घेतली. नंतर मायदेशी परतल्यावर निवासी, व्यापारी, औद्योगिक, महामार्ग व पूल आदी कामांचा अनुभव घेतला. पुन्हा आखाती देशांमध्ये व त्यानंतर मलेशियात काम करायची संधी मेढेकरांना मिळाली. मलेशियात भारतीय कामगारांच्या साहाय्यानं त्यांनी उत्कृष्ट दर्जाच्या रेल्वे स्थानकं उभारणीच्या कामाची दखल तेव्हाचे आपले राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी घेतली. त्यांनी मेढेकरांना आपल्या ज्ञान व अनुभवांचा उपयोग समाजासाठी करायला सुचवलं. त्यातून मेढेकरांचं लेखन दैनिक सकाळ सुरू झालं. त्याची परिणती या पुस्तकात झाली. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी परिपूर्ण वास्तुरचनेसाठी आवश्यक ती मूलभूत माहिती यात दिल्यामुळे हे पुस्तक आपल्या व आपल्या नातलग किंवा स्नेहीजनांच्या बांधकाम नवनिर्मितीसाठी उत्तम वाटाड्या असल्यासारखंच आपल्याला वाटेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPRAKASH MEDHEKAR
LanguageMARATHI
ISBN978-93-86204-39-4
BindingPaperback
Pages190
Publication Year2017

Reviews

Write a review

Disha Bandhkam Navnirmitichi

Disha Bandhkam Navnirmitichi

जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता येण्याची मोठीच सोय झाली आहे.

Customers who bought this product also bought: