Topper Prepares (IIT JEE)

BK00358

New product

फक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी सौम पॉल यांचं सकाळ प्रकाशनं आणलेलं पुस्तक कुणालाही लाभदायक ठरू शकेल. 'Topper बनण्याचा मूलमंत्र' हेच ते अद्भुत पुस्तक. यात जेईई परीक्षेतील यशवंतांच्या सत्यकथा आहेत

More details

₹ 200 tax incl.

More Info

फक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी सौम पॉल यांचं सकाळ प्रकाशनं आणलेलं पुस्तक कुणालाही लाभदायक ठरू शकेल. 'Topper बनण्याचा मूलमंत्र' हेच ते अद्भुत पुस्तक. यात जेईई परीक्षेतील यशवंतांच्या सत्यकथा आहेत. आयआयटी जेईई किंवा जेईई अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षा खरं म्हणजे हार्वर्ड अथवा एमआयटीमध्ये प्रवेश मिळण्यापेक्षा खूप अवघड समजली जाते. हिची तयारी करण्याच्या काही खास पद्धती आहेत का याचा धांडोळा सौम पॉल यांनी घेतला. त्यांच्या अनुभवावर आधारित अनेक प्रसंग देत त्यांनी स्वतःची यशकथा दिलखुलासपणे सांगितली आहे. इतर यशवंतांची वाटचालही खुमासदारपणे कथन केली आहे. या पुस्तकातील यशापर्यंत नेणारी वाटचाल नाट्यमय पैलूंमुळे सुरस कादंबरापेक्षाही अधिक रंजक वाटते. सर्वसामान्य स्मरणशक्ती असलेल्या विद्यार्थ्यांनी नेमके मार्ग शोधून असामान्य गुणवत्ता कशी प्राप्त केली, याबबबतचे किस्से या पुस्तकात वाचून केवळ हीच परीक्षा देणारे विद्यार्थी नव्हे तर एकूणच जीवनात सफलतेचा ध्यास बाळगून पुढं जाऊ पाहणाऱ्यांचीही उमेद वाढायला मदत होईल. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोबळ कसं वाढवावं, एकाग्रता, स्मरणशक्ती, रस नसलेल्या विषयांत आवश्यक म्हणून रस निर्माण करणं याचबरोबर त्यांच्या पालकांची मानसिकता वगैरे विविध विषयांचं विवेचन सुगमतेनं केलं आहे. सौम पॉल यांनी आयआयटी कानपूरमधून वर्ष २०००मध्ये संगणक विज्ञान विषयातील पदवी मिळवली. तेव्हापासून ते अमेरिका, इंग्लंड व भारतातील अनेक तंत्रज्ञानविषयक नवनवीन उपक्रमांत सक्रिय आहेत. याशिवाय ते लेखन व चित्रपटनिर्मिती क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचं दिग्दर्शन केलं आहे तसंच विविध संस्थांसाठी माहितीपटही बनवले आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
LanguageMarathi
ISBN9789386204585
BindingPaperback
Pages192
Publication Year2017
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Topper Prepares (IIT JEE)

Topper Prepares (IIT JEE)

फक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी सौम पॉल यांचं सकाळ प्रकाशनं आणलेलं पुस्तक कुणालाही लाभदायक ठरू शकेल. 'Topper बनण्याचा मूलमंत्र' हेच ते अद्भुत पुस्तक. यात जेईई परीक्षेतील यशवंतांच्या सत्यकथा आहेत

Customers who bought this product also bought: