Kaljat Dhavtoy Sasa (Firasti) - Uttam Kamble

BK00375

New product

काळजात धावतोय ससा
कासवाबरोबरच्या शर्यतीत सशाला हरवणारा माणूस पुढे एक दिवस जगण्याच्या शर्यतीत स्वत:च काळजात ससा घेऊन फिरेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आज तेच दिसतं आहे. उत्तम कांबळे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानं प्रत्येकाच्या काळजात धावणाऱ्या या सशाला भेडसावणारा भवताल 'काळजात धावतोय ससा' या लेखसंग्रहात
मार्मिक शब्दांत मांडला आहे.

More details

₹ 140 tax incl.

More Info

काळजात धावतोय ससा '
उत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या' काळजात धावतोय ससा ' या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून-बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन आहे. स्वत:च्या सावलीला देखील भिणाऱ्या सशाची अशी मानसिकता कशामुळे झाली असावी, याचा धांडोळा लेखकानं वेधकपणे घेतला आहे. भोवतालची व्यवस्था, पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या साऱ्याच वाटा माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागल्या आहेत. आपल्या प्रखर सामाजिक जाणिवांनी ओतप्रोत लेखनानं वाचकांना खडबडून जागं करण्याचं कांबळे यांचं व्रत वर्तमानात आवश्यकच आहे.

'गांधी आणि आर्टकल्चर,' ' पुन्हा एकदा दुष्काळ,' 'कर्ज चुकवायचंय, उघडा दरवाजा,'
' मरणाच्या भरपाईची सावली' यांसारख्या लेखांमधून कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व अगतिकता संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorUttam Kamble
LanguageMarathi
ISBN978-93-86204-75-2
BindingPaperback
Pages112
Publication Year2017
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kaljat Dhavtoy Sasa (Firasti) - Uttam Kamble

Kaljat Dhavtoy Sasa (Firasti) - Uttam Kamble

काळजात धावतोय ससा
कासवाबरोबरच्या शर्यतीत सशाला हरवणारा माणूस पुढे एक दिवस जगण्याच्या शर्यतीत स्वत:च काळजात ससा घेऊन फिरेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आज तेच दिसतं आहे. उत्तम कांबळे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानं प्रत्येकाच्या काळजात धावणाऱ्या या सशाला भेडसावणारा भवताल 'काळजात धावतोय ससा' या लेखसंग्रहात
मार्मिक शब्दांत मांडला आहे.

Customers who bought this product also bought: