Healthy Shakahar

BK00393

New product

शाकाहाराला पूर्णाहाराचं रूप देऊ

नाश्ता व भोजनासाठीच्या विविध शाकाहारी पाककृती यात आहेत

More details

₹ 180 tax incl.

More Info

शाकाहाराला पूर्णाहाराचं रूप देऊ


पूर्णाहार तयार करणं म्हणजे अवघड कृती व भरपूर साहित्य असलंच पाहिजे असं नाही. कमी तेल वापरूनही पदार्थ रुचकर व अधिक पोषणमूल्ययुक्त करता येतात. या दृष्टिकोनातून स्वयंपाकाच्या पद्धतीत केलेले बदल मृणाल तुळपुळे यांनी
' हेल्दी शाकाहार' या पुस्तकातून सांगितले आहेत. नाश्ता व भोजनासाठीच्या विविध शाकाहारी पाककृती यात आहेत. विविध प्रांत व देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी आपणही या पुस्तकच्या मदतीनं तयार करू शकतो.

आहारतज्ज्ञ सुचेता लिमये यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे, ' आज आपल्या देशात जवळजवळ २० ते २४ टक्के लोक शाकाहार घेणं पसंत करतात. पण ते सारेच निरोगी आहेत का ? याचे उत्तर ' नाही' असे आहे. शाकाहारी असले तरी कोणाच्या आहारात भाज्या व फळांचा समावेश अभावानेच असतो कर काहीजण धान्यपदार्थांवर भर देताना दिसतात. काहीजण दुग्धजन्य पदार्थ कमी सेवन करतात. याचबरोबर हल्ली गोड व तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण देखील वाढलेले दिसते. या सर्वांमुळे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचे प्रमाण आपल्या देशात वाढत चालले आहे. यांना जीवनशैलीमुळे होणारे आजार असे म्हणतात. या आजारांना जर आपल्यापासून दूर ठेवायचे असेल , तर दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. पुरेसा व्यायाम आणि संतुलित व पोषक आहार. हेल्दी शाकाहार या पुस्तकात लेखिकेने नेहमीच्या काही पदार्थांच्या कृती देऊन त्या आपण कशा हेल्दी करू शकतो , हे आपल्यासमोर सुंदर पद्धतीने मांडले आहे. '

Reviews

Write a review

Healthy Shakahar

Healthy Shakahar

शाकाहाराला पूर्णाहाराचं रूप देऊ

नाश्ता व भोजनासाठीच्या विविध शाकाहारी पाककृती यात आहेत

Customers who bought this product also bought: