BK00400
New product
Now in Stock
Warning: Last items in stock!
Availability date: 02/28/2018
Kukutpalan Vyavasay Margdarshak - Vasant Hingane
Recipient :
* Required fields
or Cancel
पावसाची अनियमितता तसेच इतरही अनेक कारणांमुळे शेतकर्यांना शेतीपूरक उद्योगांवर विसंबून राहावे लागते. दुग्धोत्पादन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांबरोबरच कुक्कुटपालन हा व्यवसायही शेतकर्यांसाठी तसेच इतर व्यावसायिकांसाठीही फायदेशीर ठरत आहे. मात्र , आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन केल्यास त्यातून कमी श्रमात आणि खर्चात अधिक लाभ मिळवता येतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध कुक्कुटपालन व्यवसायाचे तंत्र माहिती करून घेण्याची गरज आहे. हे जाणून कुक्कुटपालन तंत्राचे अभ्यासक डॉ. वसंत हिंगणे लिखित कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शक हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.
गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन क्षेत्रात नवनवीन व्यावसायिक संस्था व व्यावसायिकही उतरल्यामुळे या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. अशावेळी व्यवसायात नव्याने उतरू पाहणार्या व्यावसायिकांनी नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तसेच आधीपासून या व्यवसायात असलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय कसा वाढवावा व अधिक नफा मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत या पुस्तकात तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले आहे. ब्रीडर पक्ष्यांबद्दलची दुर्मीळ माहिती, अंड्यांची उबवणूक, आरोग्य व्यवस्थापन, विविध रोग व त्यांचा प्रतिबंध, पक्ष्यांसाठी खाद्य अशा अत्यावश्यक विषयांचा संपूर्ण तपशील या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनातील धोके, नवनवीन रोग, पक्ष्यांकडून माणसांना होणारे रोग, बाजारपेठेतील स्पर्धा, जागतिकीकरणाचा परिणाम याबद्दल माहिती देत असतानाच डॉ. हिंगणे यांनी प्रकल्प अहवाल व अनुवंशशास्त्र या किचकट विषयांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
१) कुक्कुटपालन व्यवसायाविषयी प्राथमिक माहिती
२) आनुवंशिकताशास्त्र आणि कुक्कुटपालन
३) देशी कोंबड्यांचे व्यावसायिक पालन
४) आधुनिक कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रकार
५) कुक्कुटपालन व्यवसायाविषयी काही आवश्यक प्रारंभिक माहिती
६) कुक्कुटपालनासंबंधी वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी - मराठी तांत्रिक शब्दांचा परिचय
७) प्रकल्प अहवाल
८) करारबद्ध कमर्शिअल ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय
९) कोंबड्यांच्या शरीररचना व शरीरक्रिया शास्त्राबद्दलची संक्षिप्त माहिती
१०) आहारशास्त्र, कुक्कुटखाद्य व आहार व्यवस्थापन
११) कमर्शिअल ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय
१२) कमर्शिअल लेअर कुक्कुटपालन व्यवसाय
१३) ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय
१४) ब्रॉयलर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय
१५) लेअर ब्रीडर कुक्कुटपालन व्यवसाय
१६) अंडी उबवणी केंद्राचे व्यवस्थापन
१७) नोंदी व नोंदींचे व्यवस्थापन
१८) आरोग्य व्यवस्थापन
१९) कोंबड्यांचे रोग व त्यांचे नियंत्रण
२०) कुक्कुटपालन व्यवसायातील काहो व्यवस्थापकीय क्रिया
Publisher | Sakal Prakashan |
Author | Vasant Hingane |
Language | Marathi |
ISBN | 978-9386204684 |
Binding | Paperback |
Pages | 264 |
Publication Year | 2018 |
Dimensions | 6.7 x 9.5 |
₹ 349
₹ 140
₹ 200
₹ 225
₹ 349
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने...
₹ 170
₹ 399
दर्जेदार बियाणे वेळेवर आणि परवडणाऱ्या किमतीत...
₹ 150
₹ 199
वाढवूया आर्थिक भान विनायक कुळकर्णी यांनी...
₹ 170