Vidrohache Vyakaran (Mahatma Joteeba Fule yanche nivdak Sahitya) - Dr. Sadanand More

BK00409

New product

जोतिबांनी निर्मिलेलं 'विद्रोहाचे व्याकरण'
महात्मा जोतिराव फुले यांचं निवडक साहित्य डॉ. सदानंद मोरे देहूकर यांनी संपादित स्वरूपात अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह 'विद्रोहाचे व्याकरण' या शीर्षकाने आणून मराठी पुस्तक विश्वातच फक्त नव्हे तर एकूणच भारतीय वैचारिक साहित्यात मोलाची भर घातली आहे.

More details

Warning: Last items in stock!

₹ 490 tax incl.

More Info

जोतिबांनी निर्मिलेलं 'विद्रोहाचे व्याकरण'
महात्मा जोतिराव फुले यांचं निवडक साहित्य डॉ. सदानंद मोरे देहूकर यांनी संपादित स्वरूपात अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह 'विद्रोहाचे व्याकरण' या शीर्षकाने आणून मराठी पुस्तक विश्वातच फक्त नव्हे तर एकूणच भारतीय वैचारिक साहित्यात मोलाची भर घातली आहे. डॉ. मोरे म्हणतात,
" जोतिरावांना मराठी भाषेचे व्याकरण समजत नाही, असा आक्षेप घेऊन निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी जोतीरावांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच्या प्रमाणभाषेच्या व्याकरणावरही त्यांनी भाषेतील कर्ता-कर्म-क्रियापदांपेक्षा प्रत्यक्ष व्यवहारातील कर्ता-कर्म-क्रियापदांकडे लक्ष देऊन त्यात घडवून आणलेला उलथापालथ अधिक महत्त्वाची होती.
उलथापालथीचं व्याकरण हे विद्रोहातुन जन्मलेलं आहे.

'महात्मा जोतिराव फुले यांचे निवडक साहित्य : विद्रोहाचं व्याकरण ' या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. सदानंद मोरे यांनी जोतिबांच्या सामाजिक योगदानाकडे नव्याने लक्ष वेधले आहे. शाळांचे काम चालू असताना वाचन आणि चर्चेच्या माध्यमातून जोतिराव आपल्या ज्ञानाच्या व विचारांच्या कक्षा वाढवत होते. त्यांच्या गद्य-पद्य लेखनातून त्यांची विद्रोही विचारधारा प्रकट होऊ लागली. उलटापालटीच्या पद्धतीचा अवलंब करून जोतीरावांनी विद्रोहाचं नवं व्याकरण मांडलं.

ते आजही मोलाचे ठरते. या पुस्तकात डॉ. मोरे यांनी हे व्याकरण समजावून सांगितले आहे. याचा उपयोग समाजअभ्यासक, राजकारणी व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होऊ शकेल.

Reviews

Write a review