Bhartiya Kala aani Sanskruti by Bhushan Deshmukh and Nikhil Date

BK00429

New product

विविध स्पर्धा परीक्षांना विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासाकरिता भारतीय संस्कृती व कला या विषयांसाठी सुसंबद्ध, सर्वसमावेशक संदर्भ पुस्तक.

More details

₹ 399 tax incl.

More Info

भारतीय स्थापत्यकला, चित्रकला, संगीत, नृत्यकला, नाट्यकला, हस्तकला व साहित्य यांचे महत्त्वपूर्ण विश्लेषण

भारतातील सर्कस उद्योग, पारंपरिक व बोलक्या बाहुल्यांचा खेळ, युद्धकला, चित्रपट उद्योग यांची मूलभूत व आटोपशीर माहिती

प्राचीन व मध्ययुगीन भारतातील विज्ञान-तंत्रज्ञान, भारतीय राज्यघटना व संस्कृती संवर्धनाबाबतच्या तरतुदी तसेच भारताचा सांस्कृतिक वारसा व भारतीय भाषांची परिपूर्ण ओळख

भारतातील दिनदर्शिका, सण व उत्सव, भारतातील महत्त्वाच्या सांस्कृतिक संस्था, सन्मान पुरस्कार यातील महत्त्वपूर्ण बाबींचे तपशिलासह विवेचन

कला, संस्कृती व इतिहास या विषयांत रस असणाऱ्या वाचक, अभ्यासक, विद्यार्थी तसेच जिज्ञासूंना अधिक उपयुक्त व्हावं यासाठी महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना; तसेच घडामोडींशी निगडित संस्था व विशेष व्यक्तींच्या माहितीची सामान्य ज्ञानासह (General Knowledge) मांडणी

लेखकांविषयी :

प्रा. भूषण देशमुख
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ व मार्गदर्शक अशी श्री. भूषण देशमुख यांची ओळख असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठातून बी.कॉम, एमबीए व एम.ए. (इतिहास व मराठी साहित्य) अशा ज्ञानशाखांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी विविध संस्थांमध्ये स्पर्धापरीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. व्याख्यानांसोबतच वृत्तपत्रांतून वेळोवेळी लेख लिहिणे, विविध महाविद्यालयांतून स्पर्धापरीक्षांविषयी जागृती घडवून आणणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली आयोजित करणे, अशा विविध उपक्रमांमध्येही ते सातत्याने कार्यरत आहेत. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे भारतीय अर्थव्यवस्था तसेच महाराष्ट्राची कला आणि संस्कृती ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

निखिल दाते
अवघड गोष्ट सोपी करून सांगणे ही एक हातोटी आहे आणि या कलेत निखिल दाते प्रवीण आहेत. पुणे विद्यापीठातून ‘संवाद शास्त्रा’ची मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर गेली 14 वर्षे ते ‘संवाद’ क्षेत्रात कार्य करत आहेत. जाहिरातींसाठी लेखन करण्यापासून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि कमीत कमी शब्दांत मोठा आशय सांगण्याचे कौशल्य त्यांनी तिथे आत्मसात केले. सध्या ते ‘अनंत कंटेंट अ‍ॅण्ड वेब डेव्हलपमेंट एलएलपी’ या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणून कार्यरत आहेत. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे महाराष्ट्राची कला आणि संस्कृती हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Bhushan Deshmukh, Nikhil Date
LanguageMarathi
BindingPaperback

Reviews

Write a review

Bhartiya Kala aani Sanskruti by Bhushan Deshmukh and Nikhil Date

Bhartiya Kala aani Sanskruti by Bhushan Deshmukh and Nikhil Date

विविध स्पर्धा परीक्षांना विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासाकरिता भारतीय संस्कृती व कला या विषयांसाठी सुसंबद्ध, सर्वसमावेशक संदर्भ पुस्तक.

Customers who bought this product also bought: