Sakal Current Update 2018 Vol. 3

BK00444

New product

सकाळ प्रकाशनाचा चालू घडामोडींवरील सकाळ करंट अपडेटस 2018 (Vol.3) त्रैमासिकाचा अंक प्रकाशित 

आगामी राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी,महाराष्ट्र कृषी सेवा,गट -क सेवा, वन सेवा (मुख्य)परीक्षांसाठी उपयुक्त

More details

₹ 150 tax incl.

More Info

आगामी काळात होणाऱ्या राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी,महाराष्ट्र कृषी सेवा,गट -क सेवा, वन सेवा (मुख्य) या व यूपीएसी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले सकाळ प्रकाशनाचे सकाळ करंट अपडेट्‌स व्हॉल्युम 3 (Sakal Current Updates vol.3) हे त्रैमासिक प्रकाशित झाले आहे. 
जून, जुलै व ऑगस्ट हा तीन महिन्यांचा कालावधी विविध संमिश्र घडामोडींसाठी संस्मरणीय ठरला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटनांमध्ये वीस वर्षांनंतर फ्रान्सने जिंकलेला फुटबॉल विश्चचषक, इंडोनेशिया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने विक्रमी 69 पदकांची केलेली कमाई , विम्बल्डन व फ्रेंच ओपन ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धांचे निकाल या क्रीडा क्षेत्रातील रोमहर्षक स्पर्धांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. याचवेळी भारताच्या राजकीय क्षेत्रातील नाट्यपूर्ण घडामोडींनीही हा कालावधी विशेष गाजला. यात बहुमताभावी अल्प कालावधीतच जम्मू-काश्‍मीरमध्ये लागू करण्यात आलेली राज्यपाल राजवट,199 मतांनी फेटाळला गेलेला केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव, मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सुरू करण्यात आलेल्या "देशातील प्रतिष्ठित संस्था' उपक्रमातील समाविष्ट संस्थांची जाहीर करण्यात आलेली बहुचर्चित पहिली यादी यांचा समावेश होतो. 
राज्यात ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा  60 वर्षे करण्याचा तसेच प्लॅस्टिकबंदीचा निर्णय, मराठा, कुणबी समाजासह शेती व्यवसायातील बहुजन समाजाच्या विकासासाठी "सारथी'संस्थेची करण्यात केलेली स्थापना हे विशेष निर्णय देखील राज्य सरकारकडून याच कालावधीत घेण्यात आले. या घटनांबरोबरच अमेरिकेकडून एसटीए-1मध्ये भारताचा करण्यात आलेला समावेश, दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली दहावी ब्रिक्स परिषद ,संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचे कारण सांगत अमेरिकेचा या परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील विशेष चर्चेतील घडामोडींबरोबरच राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक,क्रीडा,कृषी,पर्यावरण,विज्ञान व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना घडामोडींची माहिती, या घडामोडींमागील इतिहास, घटनाक्रम तसेच महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना, घडामोडींशी निगडीत संस्थांची तशीच विशेष व्यक्तींची माहिती विशेष सामान्य ज्ञानासह (General Knowledge) सकाळ करंट अपडेट्‌स व्हॉल्युम 3(Sakal Current Updates vol.3) या त्रैमासिकामध्ये देण्यात आली आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व,मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांच्या अभ्यासाकरिता हे संदर्भ पुस्तक उपयुक्त आहे. 
सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या व परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंचाचा समावेश.

Reviews

Write a review

Sakal Current Update 2018 Vol. 3

Sakal Current Update 2018 Vol. 3

सकाळ प्रकाशनाचा चालू घडामोडींवरील सकाळ करंट अपडेटस 2018 (Vol.3) त्रैमासिकाचा अंक प्रकाशित 

आगामी राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी,महाराष्ट्र कृषी सेवा,गट -क सेवा, वन सेवा (मुख्य)परीक्षांसाठी उपयुक्त

Customers who bought this product also bought: