{"title":"Informative","description":"","products":[{"product_id":"garja-maharashtra-demi-size","title":"गर्जा महाराष्ट्र (डेमी साइज़)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळातील मानव, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट आदी राजघराण्यांपासून ते शहाजी, शिवाजी आणि भोसले राजघराणे, पेशवे, शिंदे-होळकर यांपासून पुढे आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात 'महाराष्ट्र' कसा घडला याचा इतिहास. राजारामशास्त्री भागवत, इतिहासचार्य वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर, मान्यवर इतिहासकार जदुनाथ सरकार, विविध ब्रिटिश इतिहासकार आदींच्या इतिहासलेखनाचा आढावा घेत, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींना स्पर्श करणारे लेखन. ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी आंतरविद्याशाखीय बैठक आणि तौलनिक दृष्टी यांचा आधार घेत सिद्ध केलेला मौलिक संदर्भग्रंथ. डॉ. यशवंत सुमंत यांच्या विवेचक प्रस्तावनेसह.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Paperback","offer_id":46277835456643,"sku":"BK01108","price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Garja_Maharashtra.jpg?v=1759387389"},{"product_id":"chaitanya-guru-gorakshanath","title":"Chaitanya Guru Gorakshanath","description":"\u003cp\u003eप्राचीन काळापासून वेगवेगळ्या शतकात जन्मलेले, वेगवेगळ्या देशांमधील, विविध जातीजमातींचे लोक नाथ संप्रदायातील आदिनाथांपासून मत्स्येन्द्रनाथांसह सर्व नवनाथांची पूजा करीत आले आहेत. अनेक शतकांच्या कालावधीत या दैवतांनी विविध अवतार घेतले. भूतलावरील मर्त्य लोकांना संसारातील दुःखांमधून मुक्ती मिळावी, म्हणून त्यांनी उपदेश केला. जिथे केवळ शुद्ध आनंद आणि शांती आहे, अशा आत्मोद्धाराच्या मार्गाची दिशा त्यांनी लोकांना दाखवली. अवघड योगमार्ग साधक सांसारिकांसाठी खुला करण्याचे काम गोरक्षनाथांनी केले. तत्कालीन शैव आणि वज्रयान बौद्ध धर्मांना एकत्र आणणारा धागा म्हणून गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथांचे कार्य विलक्षण आहे. गोरक्षनाथांच्या कार्याचा आढावा घेताना तत्कालीन समाजात प्रभावी असलेले धर्म, पंथ यांच्या कार्याचे स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eSince ancient times, people from different centuries, various countries, and diverse castes and communities have worshiped the Adinath and all the Navnaths of the Nath tradition, including Matsyendranath. Over many centuries, these deities have taken various incarnations. They preached so that mortal beings on earth could attain liberation from the sufferings of worldly life. They showed people the path of spiritual salvation, where there is only pure joy and peace. Gorakshanath opened the difficult path of yoga to householders and ordinary people. His work is remarkable as he served as a connecting thread between the Shaiva and Vajrayana Buddhist traditions of his time. While reviewing Gorakshanath’s contributions, this book also attempts to explore the role and influence of contemporary religions and sects in society.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717855404163,"sku":"BK00823","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Chaitanyaguru_Gorakshnath_Front_Cover.jpg?v=1759379088"},{"product_id":"draksha-shetiche-nave-tantra","title":"Draksha Shetiche nave Tantra","description":"\u003cp\u003eआधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान आणि प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले दर्जेदार, फायदेशीर द्राक्षशेतीचे 'दाभोळकर प्रयोग परिवार' पुरस्कृत नवे मॉडल! 'द्राक्षशेतीचे नवे तंत्र' या पुस्तकाद्वारे वेगवेगळ्या समस्यांनी अडचणीत असलेल्या द्राक्षशेतीस फायदेशीर बनविण्याचे तंत्र 'दाभोळकर प्रयोग परिवारातील प्रयोगशील शेतकरी वासुदेव चिमणराव काठे यांनी सांगितले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंका नाही. सहज-सोप्या तंत्रशुद्ध पद्धतीने द्राक्षशेतीच्या सुरूवातीपासून ते बाजारात द्राक्षमाल पोहोचेपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे प्रयोगाअंती सफल झालेले ज्ञान या पुस्तकातून मिळते. अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण नोंदींचा समावेश हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Dabholkar Prayog Parivar”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e presents a new model of high-quality, profitable grape cultivation, proven through modern knowledge, technology, and experiments! In the book \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Drakshashetiche Nave Tantr”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e (New Techniques in Grape Cultivation), the experimental farmer \u003c\/span\u003e\u003cspan\u003eVasudev Chimnrao Kathe\u003c\/span\u003e\u003cspan\u003e from the Dabholkar Prayog Parivar explains methods to make grape farming profitable, even for those struggling with various problems.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThis will undoubtedly provide great relief to grape-producing farmers. The book offers tested knowledge of all the intricate details—from the very beginning of grape cultivation to delivering the produce to the market—using simple, precise, and practical techniques. Another highlight of this book is the inclusion of research-based observations and notes from numerous scientists and experts.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717855731843,"sku":"BK00801","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00801-1.jpg?v=1763724682"},{"product_id":"teen-sannyasi","title":"किशोर संन्यासी","description":"\u003cp\u003eभगवान बुद्ध, संत ज्ञानेश्वर आणि स्वामी विवेकानंद या तीन महान संन्यासी व्यक्तिमत्त्वांनी जनमानसात खोलवर रुजलेल्या धारणांपासून लोकांना मुक्त करून जीवनाचे खरे उद्दिष्ट प्राप्त करण्याची प्रेरणा दिली आहे. आजही ज्यांना सत्य प्राप्तीसाठी संन्यास घ्यावासा वाटेल, त्यांना हिमालयात जाऊन राहण्याची आवश्यकता नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून ते तीन संन्यासी लोकांसमावेत राहून संन्यस्त जीवन कसे जगता येईल, याबद्दल योग्य मार्गदर्शन करतील. आध्यात्मिक मार्गावरून चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्रोत ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879324803,"sku":"BK00731","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Teen_Sanyasi_Cover_Front.jpg?v=1759387762"},{"product_id":"bandhkam-kshetrachi-garudzep","title":"Bandhkam Kshetrachi Garudzep","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती, वास्तुरचना यांच्याबरोबरच मानवी जीवन सुलभ व्हावे यासाठी गृहनिर्मिती व बांधकामनिर्मितीमध्ये काळानुसार बदल होत गेले. त्यामध्ये रेल्वेमार्ग, बोगदे, विमानतळ यापासून ते पर्यावरणपूरक घरांची रचना, निवासव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन यांसह अगदी कचरा व्यवस्थापन ते आरामदायी जीवनशैली यासाठी बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचा वापर केला गेला. हा बदल नेमका कसा झाला, याची अतिशय रंजक आणि वाचकांना सदैव उपयुक्त ठरणारी माहिती पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबांधकाम विश्वाशी संबधित अनेक नव्या कल्पना गेल्या काही वर्षात विकसित झाल्या. तरीही प्राचीन बांधकाम शैली आणि निर्मितीमधील सर्वसामान्य जिज्ञासा कायम राहिली. उंच पिरॅमिड, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, चायनाची भिंत याविषयीचे औत्सुक्य आजही कायम आहे. तसेच अलीकडच्या काळात उभारण्यात आलेला भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी, बुर्ज-अल-अरब कसे उभारले गेले, याविषयीही उत्सुकता असते. त्याविषयी दिलेली माहिती ज्ञानामध्ये भर घालणारी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकाने सोप्या आणि ओघवत्या भाषेत हे लेखन केले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक संकल्पना नवोदित अभियंत्यांपासून सर्वसामान्य वाचकांना सहजपणे समजतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"56\" data-end=\"531\"\u003eAlong with sky-touching buildings and architectural designs, construction and housing have evolved over time to make human life easier. This evolution includes developments ranging from railways, tunnels, and airports to eco-friendly housing designs, residential planning, transport management, and even waste management—ultimately contributing to a more comfortable lifestyle. This book presents an engaging and highly useful account of how these changes have taken place.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"533\" data-end=\"1048\"\u003eIn recent years, many new ideas related to the world of construction have emerged. Yet, the curiosity about ancient construction styles and structures continues to remain strong. There is still great fascination about towering pyramids, the Statue of Liberty in America, and the Great Wall of China. Similarly, there is keen interest in understanding how modern marvels like India’s Statue of Unity and the Burj Al Arab were constructed. The information provided about these adds significantly to one’s knowledge.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1050\" data-end=\"1228\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe author has written in a simple and fluent style, making various concepts in the field of construction easy to understand for both budding engineers and general readers alike.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885428334723,"sku":"BK00616","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00616.jpg?v=1763721137"},{"product_id":"key-for-practical-construction","title":"Key for Practical Construction","description":"\u003cp\u003eTHIS BOOK CONTAINS  5 CHAPTERS :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1)CONSTRUCTION MATERIALS\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2)VERSATILE  CONCRETE \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3) CONSTRUCTION MACHINERIES\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4) BUILDING TECHNOLOGIES\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5) TECHNOLOGIES FOR CITY INFRASTRUCTURE\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eTHIS BOOK IS USEFUL FOR ALL CIVIL ENGINEERS,ARCHITECTS,INTERIOR DESIGNERS,RCC DESIGNERS,BUILDERS,DEVELOPERS AND CONTRACTORS WORKING IN CONSTRUCTION FIELD. \u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885429448835,"sku":"BK00579","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00579-1.jpg?v=1763717341"},{"product_id":"safar-coffee-vishwachi","title":"Safar Coffee Vishwachi","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e‘सफर कॉफी विश्वाची’ हे मृणाल तुळपुळे लिखित पुस्तक जगभरातल्या कॉफीविषयी अतिशय मनोरंजनपर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगणारे महत्त्वाचे पुस्तक आहे. रोजच्या जगण्यात चहा किंवा कॉफी हे पेय केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर घेतले जाते. कॉफी हे पेय लेखिकेच्या विशेष आवडीचे आहे, त्यामुळे त्यांनी कॉफीचे मूळ, तिचा प्रवास, कॉफीचे विविध प्रकार, तिचे फायदे तोटे, कॉफी संस्कृती, कॉफी डिकॉक्शन इत्यादी विषय या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे आणि सखोलपणे मांडले आहे. कॉफीपानाचे वैविध्यपूर्ण किस्सेही या पुस्तकात लेखिकेने दिले आहेत. देशोदेशीच्या कॉफी विश्वाची सफर घडवणारे हे अनोखे पुस्तक कॉफीप्रेमी वाचकांना अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e“Journey Through the World of Coffee,”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e written by \u003c\/span\u003e\u003cspan\u003eMrinal Tulpule\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, is an important book  that presents highly engaging and well-researched information about coffee from around the world.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eIn everyday life, tea or coffee is consumed not only in India but across the globe. Coffee,  being the author’s special interest, has been explored in depth in this book. She has effectively and comprehensively discussed topics such as the origin of coffee, its journey across the world, different types of coffee, its advantages and disadvantages, coffee culture, and coffee decoction.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe book also includes a variety of interesting anecdotes related to coffee drinking. This  unique work, which takes readers on a tour of the global coffee world, will undoubtedly be very useful for coffee lovers.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46250589782147,"sku":"BK00916","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/SafarCoffeeBookFrontCover.jpg?v=1765802976"},{"product_id":"sarvajanik-granthalaye-aarthik-vikas","title":"Sarvajanik Granthalaye : Aarthik Vikas","description":"\u003cp class=\"MsoNormal\" style=\"text-align: justify;\"\u003e\u003cspan lang=\"EN-IN\" style=\"font-family: 'Mangal','serif';\"\u003e'राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता' यांच्याकडून सार्वजनिक ग्रंथालयांना प्राप्त होणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये सन २००९-१० पासून वाढ झाली आहे. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारतीचा विस्तार करण्यासाठी सध्याची अर्थसहाय्य मर्यादा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय रुपये दोन कोटी, जिल्हा\/विभागीय ग्रंथालय रुपये एक कोटी, तालुका\/शहर व मुन्सिपल ग्रंथालय रुपये ५० लाख आणि ग्रामीण ग्रंथालयासहित इतर ग्रंथालये रुपये २५ लाख अशी आहे. इतरही योजना अर्थसहाय्यातंर्गत ही वाढ झाली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\" style=\"text-align: justify;\"\u003e\u003cspan lang=\"EN-IN\" style=\"font-family: 'Mangal','serif';\"\u003eया पुस्तकात 'समान निधी योजना-७' व 'अ-समान निधी अर्थसहाय्य योजना-४' अशा एकूण ११ निधी योजना समाविष्ट केल्या आहेत. ग्रामीण ग्रंथालय कर्मचाऱ्यांना कोणाचीही मदत न घेता प्रतिष्ठानच्या कोणत्याही अर्थसाह्य योजनेचा प्रस्ताव तयार करता यावा, हा उद्देश विचारात घेऊन त्याविषयीची संपूर्ण माहिती सदर पुस्तकात देण्यात आलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\" style=\"text-align: justify;\"\u003e\u003cspan lang=\"EN-IN\" style=\"font-family: 'Mangal','serif';\"\u003eप्रतिष्ठानकडून अर्थसहाय्य प्राप्त होण्यासाठी राज्य शासनाने प्रतिष्ठानकडे वर्ग केलेल्या रकमेमधील रुपये ४५,५६,८७,६८९\/- इतकी राज्य शासनाची रक्कम प्रतिष्ठानकडे शिल्लक आहे. प्रतिष्ठानकडे रक्कम कशी शिल्लक राहिली आणि तशी ती राहू नये म्हणून इतर राज्यांनी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती असणारे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण लेख या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003cspan lang=\"MR\" style=\"font-size: 12.0pt; mso-ansi-font-size: 11.0pt; line-height: 107%; font-family: 'Mangal','serif';\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\" style=\"text-align: justify;\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"0\" data-end=\"499\"\u003eThe financial assistance provided by the \u003cstrong data-start=\"41\" data-end=\"91\"\u003eRaja Ram Mohan Roy Library Foundation, Kolkata\u003c\/strong\u003e to public libraries has increased since the year 2009–10. The current financial assistance limits for expanding library buildings are as follows: Rs. 2 crore for state central libraries, Rs. 1 crore for district\/divisional libraries, Rs. 50 lakh for taluka\/city and municipal libraries, and Rs. 25 lakh for rural and other libraries. Other schemes have also seen similar increases in financial assistance.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"501\" data-end=\"827\"\u003eThis book includes a total of 11 fund schemes, such as \u003cstrong data-start=\"556\" data-end=\"581\"\u003e‘Equal Fund Scheme-7’\u003c\/strong\u003e and \u003cstrong data-start=\"586\" data-end=\"636\"\u003e‘Non-Equal Fund Financial Assistance Scheme-4’\u003c\/strong\u003e. The book provides complete information with the goal that rural library staff can prepare proposals for any financial assistance scheme of the Foundation without needing help from anyone.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"829\" data-end=\"1189\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eTo receive financial assistance from the Foundation, the state government has a balance of Rs. 45,56,87,689\/- with the Foundation from the amounts allocated by it. The book contains useful and important articles detailing how this balance remained with the Foundation and the efforts made by other states to ensure such a balance does not remain in the future.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46307791175811,"sku":"BK00971","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/SarvajanikGranthalye-Front.jpg?v=1766826102"},{"product_id":"sharad-pawar-ani-pulodcha-prayog","title":"Sharad Pawar ani 'Pulod'cha Prayog","description":"\u003cp\u003eशरद पवार आणि पुलोद चा प्रयोग हे माहितीपर पुस्तक आहे.\u003cbr\u003eपुस्तकात शरद पवार पक्षांतराचा, ‘पुलोद’च्या निर्मितीचा, काँग्रेसमधील वाटचालीचा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. \u003cbr\u003eराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांना मिळणारा आदर, त्यांची राजकीय दृष्टी, निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण काम करण्याची वृत्ती याचे चित्रण पुस्तकात प्रभावीपणे केले आहे.\u003cbr\u003eपुस्तकातील मांडणीत शरद पवार यांच्या सर्व निर्णयांच्या केंद्रस्थानी समाजाचा विकास आणि लोककल्याण हे ध्येय कसे कायम राहिले, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.\u003cbr\u003eतत्कालीन राजकीय परिस्थिती, नेत्यांमधील समीकरणे, राजकीय बदलांची कारणमीमांसा आणि महाराष्ट्र व देशाच्या राजकारणावर त्यांचे परिणाम यांचे संतुलित विश्लेषण पुस्तकात दिलेले आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"65\" data-end=\"132\"\u003e\u003cstrong data-start=\"65\" data-end=\"106\"\u003eSharad Pawar and the Pulod Experiment\u003c\/strong\u003e is an informative book.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"134\" data-end=\"342\"\u003eThe book presents an in-depth study of Sharad Pawar’s party transitions, the creation of \u003cem data-start=\"223\" data-end=\"230\"\u003ePulod\u003c\/em\u003e, his journey within the Congress party, and the subsequent formation of the Nationalist Congress Party (NCP).\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"344\" data-end=\"519\"\u003eIt effectively portrays the respect Sharad Pawar commands at the national and international levels, his political vision, decision-making ability, and consistent work ethic.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"521\" data-end=\"654\"\u003eThe book emphasizes how, at the core of all his decisions, the development of society and public welfare remained the central goal.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"656\" data-end=\"861\"\u003eIt provides a balanced analysis of the political circumstances of the time, the equations between leaders, the reasons behind political changes, and their impact on the politics of Maharashtra and India.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46330886750339,"sku":"BK01208","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_SharadPawar_Pulod_101225_a.jpg?v=1767418152"},{"product_id":"ase-hote-dr-cheema","title":"Ase Hote Dr. Cheema","description":"\u003cp\u003e\"असे होते डॉ. चीमा\" हे पुस्तक भारतीय उद्यानविद्येचे पितामह डॉ. गेंदासिंग चीमा यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि ध्येयवेड्या जीवनकार्याचा सविस्तर मागोवा घेते. देशातील उद्यान पिकांमध्ये घडलेल्या सुप्त क्रांतीमागील संशोधन, सरकारी धोरणे आणि शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन यांचा पाया डॉ. चीमा यांनी कसा घातला, हे पुस्तक स्पष्टपणे मांडते. पेरू, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, भाजीपाला व फूल पिकांतील दर्जेदार वाणनिर्मिती आणि त्यांचा आजच्या शेतीवर झालेला दीर्घकालीन प्रभाव या पुस्तकात ठळकपणे अधोरेखित केला आहे.\u003cbr\u003eसंशोधक, प्रशासक, शिक्षक आणि विस्तारक म्हणून डॉ. चीमा यांनी बजावलेल्या बहुआयामी भूमिकांचे वास्तवदर्शी चित्रण या पुस्तकात आढळते. उद्यानविद्या शाखेतील शास्त्रज्ञ, विद्यार्थी व शेतीप्रेमींसाठी हे पुस्तक केवळ चरित्र नसून प्रेरणा, इतिहास आणि मार्गदर्शन देणारा मौल्यवान संदर्भग्रंथ आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e“Ase Hote Dr. Cheema”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e (This Was Dr. Cheema) is a detailed account of the visionary and dedicated life work of Genda Singh Cheema, regarded as the father of Indian horticulture. The book clearly explains how Dr. Cheema laid the foundation for the silent revolution in  India’s horticultural crops through research, government policies, and a farmer-centric approach. It highlights his significant contributions to the development of high-quality varieties of crops such as guava, grapes, pomegranate, custard apple, vegetables, and flowers, along with their long-term impact on modern agriculture.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe book also presents a realistic portrayal of Dr. Cheema’s multifaceted roles as a  researcher, administrator, teacher, and extension worker. For scientists, students, and agriculture enthusiasts in the field of horticulture, this book is not just a biography but a valuable reference that offers inspiration, historical insight, and practical guidance.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46334528061571,"sku":"BK01221","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_Dr.Chima_030126_a.jpg?v=1767590898"},{"product_id":"bharatiya-veerangana","title":"Bharatiya Veerangana","description":"\u003cp\u003eHere’s a long, polished paragraph in Marathi based on your text:\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e‘भारतीय वीरांगना’ या पुस्तकात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांतील बारा महत्त्वाच्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त परंतु प्रभावी आढावा घेतला आहे. या पुस्तकातून भारत देशाला वीरता, शौर्य आणि आत्मनिर्भरताची एक अखंड परंपरा लाभलेली आहे, याची जाणीव वाचकांना होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले असल्यामुळे हे पुस्तक माहितीपूर्ण असून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे साधन ठरते आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायक ठरते. सोप्या, सरळ आणि प्रवाही भाषेत मांडलेले हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांचे मन आणि विचार प्रबोधित करते. स्त्री जीवनाचे विविध पैलू, त्यांचे संघर्ष, सामर्थ्य आणि प्रेरक कथा गोष्टीरूपात उलगडून दाखवण्यात सदर पुस्तक यशस्वी ठरले आहे. वाचक या पुस्तकातून केवळ माहिती घेणार नाहीत, तर त्यांच्यात आत्मविश्वास, प्रेरणा आणि आपल्या कर्तव्याबद्दलची जाणीवही निर्माण होईल. अशा रीतीने हे पुस्तक समाजातील स्त्री सक्षमीकरणाचे आणि प्रेरणादायी जीवनचरित्रांचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eThe book \u003cem\u003eBharatiya Veerangana\u003c\/em\u003e provides a concise yet impactful overview of the contributions of twelve remarkable women across various fields, including social, cultural, educational, and political spheres. Through this book, readers gain an understanding of India’s continuous tradition of courage, bravery, and self-reliance. Written for school students, the book is informative and serves as a guiding resource for learners while also inspiring teachers. Presented in simple, clear, and flowing language, it engages readers of all age groups and encourages reflection. The book successfully portrays different aspects of women’s lives, highlighting their struggles, strengths, and inspiring stories in a narrative format. Readers not only gain knowledge but also develop confidence, motivation, and a deeper sense of responsibility. In this way, the book emphasizes the importance of women’s empowerment and showcases the value of inspiring life stories.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46338589950083,"sku":"BK01018","price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_BhartiyaVirangana_21062025_a.jpg?v=1767702321"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/collections\/informative.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}