{"title":"Marathi","description":"","products":[{"product_id":"college-to-corporate-via-interview","title":"मुलाखतीद्वारे महाविद्यालय ते कॉर्पोरेट","description":"\u003cp\u003eकरिअरची सुरुवात पहिल्या नोकरीने होते... आणि या कॉर्पोरेट जगात प्रवेश करायचा तर पहिली पायरी असते मुलाखत.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\n\u003cli\u003e नोकरीसाठी उमेदवाराची निवड करताना काय बघितलं जातं? बायोडाटात काय काय लिहावं?\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e मुलाखतीची तयारी कशी करावी? मुलाखतीत नेमके काय प्रश्न विचारले जातात? मुलाखतीत कसे वागावे?\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e आजपर्यंत जे अभ्यास केला आहे त्याबद्दल विचारले जाईल की त्याव्यतिरिक्त काही?\u003c\/li\u003e\n\n\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e हे पुस्तक याचंच मार्गदर्शन करणारं आहे.\u003cbr\u003e कॉलेजचे शिक्षण संपवून कॉर्पोरेट जगात नव्याने प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने नोकरीसाठी, करिअरसाठी स्वतःला कसे तयार करावे, त्यात यशस्वी कसे व्हावे यासाठी वाचायलाच हवे असे पुस्तक म्हणजे 'कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्ह्यू'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003cstrong\u003eलेखकाबद्दल:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ आहेत.  त्यांना या क्षेत्रात तब्बल २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी अनेक मोठ्या भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले आहे.\u003cbr\u003e ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून कार्यरत आहेत.\u003cbr\u003e विनोद बिडवाईक हे मानव संसाधन, मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे. भारतीय आणि बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये उच्च पदांवर काम करण्याचा तब्बल २५ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते ए पी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपच्या पीपल आणि कल्चर विभागाचे समूह संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अल्फा लावलमध्ये उपाध्यक्ष – एच आर, तसेच डी एस एम इंडियामध्ये संचालक – एच आर म्हणून कार्यरत होते. त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा, सेम्पेरिट ग्रुप, इंडियन स्टीलमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. या सर्व संस्थांमध्ये ते व्यवस्थापन मंडळाचे सदस्य राहिले आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e त्यांनी मनुष्यबळ विकास, मानव संसाधन, बिझनेस स्ट्रॅटेजी, टॅलेंट मॅनेजमेंट, संस्थेची पुनर्रचना, एचआर परिवर्तन, नेतृत्व विकास यासारख्या जटिल विषयांवर काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत ३ मराठी आणि ४ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e ते नियमितपणे व्यवस्थापनविषयक नियतकालिके आणि मासिकांमध्ये लेखन करतात. ते बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन, एनआयपीएम आणि एनएचआरडीचे आजीवन सदस्य असून विविध मंचांवर नियमित वक्ते आहेत. ते इंग्रजी आणि मराठी दैनिके आणि मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखकही आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45714924142723,"sku":"1","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/4986-thickbox_default.jpg?v=1763633147"},{"product_id":"akki-a-journey-of-will-son-click","title":"अक्की: इच्छाशक्ती, मुलगा आणि क्लिकची एक यात्रा","description":"\u003cp\u003eजीवन हा एक संघर्ष आहे आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या रूपात येतो, पण काही लढे असे असतात जे केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण कुटुंबाचे असतात. अक्षय परांजपे याची गोष्टही अशीच आहे. विल्सन नावाच्या गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यावर आघात झाला. या आजाराने अक्षयचं बालपणच नव्हे; तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. असं घडूनही अक्षय आणि त्याचे कुटुंब पाय रोवून विल्सनशी लढायला उभे ठाकले. या संघर्षातून अक्षयच नाही तर त्याचं कुटुंबही तावून सुलाखून बाहेर पडलं आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून अक्षय स्वतःच्या पायावर उभा राहिला. विल्सन हा आजार, कर्णबधीरत्व, त्याच्या आईचा कॅन्सर या सगळ्या आघाड्यांवर लढताना आलेले अनुभव यासाठी वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे. अक्षयचे जिगरी दोस्त, सिनेविश्वातील सेलेब्रिटी - महेश मांजरेकर, सचिन पिळगांवकर, प्रवीण तरडे, संदीप पाठक, श्रीरंग देशमुख, गुरू ठाकूर, वैभव जोशी या सगळ्यांनीच अक्षयविषयी लिहिलेले त्यांचे अनुभव या पुस्तकाला रंजक करतात.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45714935382147,"sku":"BK01040","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Akki.jpg?v=1763619388"},{"product_id":"anubhave-ale","title":"अनुभव आले","description":"\u003cp\u003eसुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रताप पवार यांच्या जीवनानुभवांवर आधारित लेखमाला 'सकाळ'च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.  समाजाकडे तटस्थपणे बघून त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. विविध सामाजिक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत असताना अनेक व्यक्तींबाबतचे अनुभव त्यांनी सहज, ओघवत्या भाषेत मांडले आहेत. जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच पुस्तकेही खूप काही शिकवत असतात, याविषयीचे अनुभव लक्षवेधी आहेत. देश-विदेशात प्रवास करताना त्या-त्या ठिकाणचे अनुभव त्यांनी अत्यंत रंजक पद्धतीने मांडले आहेत. त्यातून समाजासाठी एक प्रकारचा सकारात्मक संदेशही दिला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45714968477827,"sku":"BK00855","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Anubhave_ale_front_cover.jpg?v=1759378595"},{"product_id":"shashwat-naisargik-sheti","title":"शाश्वत नैसर्गिक शेती","description":"\u003cp\u003eनैसर्गिक शेती म्हणजे निसर्गातील अनेक घटकांचा जैवभार, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील असेंद्रिय द्रव्ये, एकात्म विचाराने, त्यांच्या सेंद्रिय जोडण्यांना सूक्ष्म जीव, वनस्पती, पाणी, कीटक, पक्षी आदींचा जराही धक्का न लावता, त्यांच्या वैशिष्ट्यांचे आणि मर्यादांचे आदर करून केली जाणारी शेती!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e निसर्गात एकाच जमिनीत एकाच वेळी वेगवेगळी झाडे-झुडपे-गवते आणि वेगवेगळे जीवजंतू असतात. सर्वांना सारखे महत्त्व असणारे विविधतेचे हे सूत्र नैसर्गिक शेतीतही असते; म्हणूनच नैसर्गिक शेतीमध्ये एकपीक पद्धती अनुस्यूत नाही. नैसर्गिक शेती बहुपीक आणि बहुस्तरीय असते. केवळ शेतीच नव्हे तर त्याबरोबर आपली जीवनशैलीही निसर्गाला अनुसरून असणे अपेक्षित आहे. थोडक्यात, ही केवळ शेती नाही तर जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e राजेंद्र भट या पुस्तकात नैसर्गिक शेती पद्धतीचे बहुस्तरीय रूप उलगडून दाखवत तिचे सखोल आणि सर्वांगीण विवेचन प्रस्तुत करतात. प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि चिंतन यातून साकार झालेले त्यांचे हे लेखन अधिक मौल्यवान आणि उपयुक्त ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e शेतकरी, अभ्यासक, शिक्षक, पर्यावरण आणि परिसंस्थेचे रक्षण करणारे, अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003cstrong\u003eलेखकाबद्दल:\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e राजेंद्र श्रीकृष्ण भट्ट, बी.एस्सी. (कृषी)\u003cbr\u003e सेंद्रिय कृषीभूषण निसर्गमित्र फार्म, बदलापूर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e पहिल्या पिढीतील शेतकरी यांनी १९९० मध्ये बदलापूरजवळ बेंडशिळ गावात (तालुका अंबरनाथ, जिल्हा: ठाणे) शेती विकत घेऊन सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. १९९० पासूनच मृदा आणि जल संधारण, १९९३ मध्ये वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\n\u003cli\u003e आपल्या जेवणाच्या ताटातील जास्तीत जास्त पदार्थ आपल्याच शेतात पिकवण्याचा प्रयत्न करा.\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e भात पिकापासून मोहरीपर्यंत आणि नारळापासून मिरीपर्यंत बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीची शेती.\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e सदस्य, नैसर्गिक शेती विषयक राष्ट्रीय सल्लागार समिती\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e कृषी आधारित ग्रामीण विकासासाठी एका एनजीओमध्ये आठ वर्षे तज्ञ सल्लागार म्हणून काम.\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्राचार्य म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e कृषी सल्लागार, कृषी पर्यटन आणि कृषी प्रशिक्षण या क्षेत्रांत कार्यरत\u003c\/li\u003e\n\n\u003cli\u003e आजवर १९५ सेंद्रिय आणि नैसर्गिक कृषी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत.\u003c\/li\u003e\n\n\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन, पुस्तके, 'निसर्गमित्र' नावाचे यू-ट्यूब चॅनल अशा विविध प्रसारमाध्यमांतून पर्यावरण व सेंद्रिय शेती संवर्धनासाठी कार्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e २०१२-१३ चा विभागीय सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार; २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या दहा व्यक्तींमध्ये नामांकन.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45714983223427,"sku":"BK01068","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BookCover_Front_Shashwat_Naisargik_Sheti.png?v=1759750537"},{"product_id":"sarvansathi-career-planning","title":"सर्वानसाठि करियर नियोजन","description":"\u003cp\u003e* करिअर संदर्भातील भ्रम, अज्ञान, पूर्वग्रह तसेच विविध शंका आणि प्रश्नांचे अनुभवी तज्ञांनी सहज संवाद साधत केलेले निरसन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e * पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांची स्वप्ने आणि प्रचलित शिक्षणपद्धती यांतील वास्तवतेतून करिअरचे नेमके उद्दिष्ट कसे साध्य करायचे आणि करिअरबाबत योग्य निर्णय कसा घ्यायचा, याविषयी मुद्देसूद मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e * पालकांसाठी, करिअर समुपदेशकांसाठी, शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योग्यता, रुची आणि व्यक्तिमत्व चाचण्या, शारीरिक आणि मानसिक क्षमता, योग्य महाविद्यालयाची निवड, करिअरचे नवीन मार्ग इत्यादींबाबत माहिती देणारे एक मौलिक संदर्भ पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45715054887043,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Career1.jpg?v=1759298676"},{"product_id":"avkash-shodh-antaralacha","title":"अवकाश: शोध अंतरालाचा","description":"\u003cp\u003eया पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयी मांडलेला पट निश्चितच उपयुक्त ठरणारा असेल. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी... आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे 'अवकाश' हे पुस्तक...\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717791670403,"sku":"BK01125","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Avkash_Front_Cover.jpg?v=1759378599"},{"product_id":"sangharshachi-kahani","title":"संघर्षाची कहाणी","description":"स्वप्न, संघर्ष आणि सिद्धी — मेरी जॅक्सन, कॅथरीन जॉन्सन आणि डोरोथी वॉन यांची प्रेरणादायी कहाणी. ही आहे १९५०-६० च्या दशकातील अमेरिकेतील नासा (NASA) मध्ये काम करणाऱ्या तीन कृष्णवर्णीय महिलांची सत्यकथा — मेरी जॅक्सन, कॅथरीन जॉन्सन आणि डोरोथी वॉन — ज्यांनी आपल्या गणितीय प्रतिभेच्या बळावर केवळ अंतराळ इतिहासच घडवला नाही, तर सामाजिक अन्यायालाही आव्हान दिले.  संघर्ष आणि सामाजिक भेदभावाचा सामना: वर्णद्वेष (racism), लिंगभेद (sexism) आणि संस्थात्मक अडथळ्यांचा सामना करत त्यांनी नासामध्ये आपले स्थान निर्माण केले. गणिताची क्रांती: अवघड गणितीय गणनांद्वारे अंतराळ मोहिमा शक्य केल्या. कॅथरीन जॉन्सन यांनी अंतराळवीर जॉन ग्लेन यांच्या मोहिमेतील मार्गक्रमण गणना केल्या. डोरोथी वॉन ही पहिली कृष्णवर्णीय महिला सुपरवायझर बनली — संगणक विभागात नेतृत्व केले. मेरी जॅक्सन यांनी अभियंता म्हणून काम करत महिलांसाठी मार्गदर्शनाचे कार्यही केले. विज्ञान आणि स्त्री-सक्षमीकरण यांचा संगम: विज्ञानाच्या माध्यमातून समाज बदलण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. त्यांनी अनेक तरुणींना STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) क्षेत्रात प्रेरणा दिली. ही केवळ शास्त्रज्ञांची गोष्ट नाही — ही आहे स्वप्न, संघर्ष आणि सिद्धी यांची उज्जवल यात्रा.\u003cp\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810708611,"sku":"BK01138","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Book_Cover_Sangharshachi_Kahani_Front.jpg?v=1763525479"},{"product_id":"kakasaheb-chitale-pb","title":"काकासाहेब चितळे (पीबी)","description":"\u003cp\u003eकाकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक एका दूरदर्शी उद्योजक आणि सहृदय समाजसेवकाचे प्रेरणादायी जीवनचरित्र आहे. चितळे उद्योग समूहाचे आधारस्तंभ काकासाहेब चितळे (दत्तात्रय भास्कर चितळे) यांनी केवळ एक मोठा व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या आणि अनेक व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणली. या पुस्तकातून काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात: प्रेरणादायी उद्योजक: भिलवडीसारख्या छोट्या गावातून सुरुवात करून सातसमुद्रापार पोहोचलेल्या चितळे डेअरीच्या यशामागे काकांचा कसा मोलाचा वाटा होता, हे समजते. त्यांनी केलेले कठोर परिश्रम, त्यांची व्यवसायातील दूरदृष्टी आणि आधुनिक दृष्टिकोन यातून कशी धवलक्रांती घडली, याचा अनुभव येतो. समाजकारण आणि संवेदना: दुष्काळग्रस्त आटपाडीला चारा छावण्यांसाठी मदत असो, अंधश्रद्धेतून लोणारी समाजाला दुग्धव्यवसायाकडे वळवणे असो, वा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी युरोपमध्ये थेट निर्यात व्यवस्था उभी करणे असो, काकांनी नेहमीच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले. माणुसकीचे दर्शन: कर्जाने ग्रासलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला मदत करणे, होतकरू तरुणांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना उद्योजक बनवणे, वाचनालयाच्या विकासासाठी केलेले कार्य, स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय - अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणूसकी अधोरेखित होते. कला आणि अध्यात्म: या पुस्तकातून काकासाहेब हे केवळ उद्योजकच नव्हे, तर कलासक्त आणि सश्रद्ध व्यक्ती म्हणून कसे होते, हे अनुभवता येते. धार्मिक स्थळांची जपणूक असो वा शास्त्रीय संगीताला दिलेले प्रोत्साहन असो, यातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. कौटुंबिक मूल्ये: चितळे कुटुंबातील परंपरा, त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या जडणघडणीत काकांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, हेही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल. काकासाहेब चितळे - सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून, ते उद्यमशीलता, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि दूरदृष्टीचा एक अनुपम पाठ आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810839683,"sku":"BK01123","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kakasaheb_Chitale_Hard_cover_FC.jpg?v=1759387533"},{"product_id":"ikhita-japa-guru-mantra-by-sri-m-marathi","title":"लिखित जप - गुरु मंत्र, श्री एम द्वारा","description":"\u003cp\u003e'लिखित जप'चा सराव आणि 'ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः' या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या अधिक जवळ घेऊन जाते.  तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूच्या असीम कृपेने भरून जाते.  ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राचे पवित्र कंपन तुमच्या आत्म्यात प्रतिध्वनित होतात आणि गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो. या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नात्यासाठीचे आमंत्रण आहे.  विचारपूर्वक केलेली रचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ व्हावे आणि त्यांनी श्री एम यांच्या जीवन परंपरेचा आदर करावा, हाच या पुस्तकामागील ध्येय व उद्देश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810872451,"sku":"BK01115","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Likhita_Japa_Sri_M_F_cover.jpg?v=1759387571"},{"product_id":"family-budget","title":"कौटुंबिक अर्थसंकल्प","description":"\u003cp\u003eआवक-जावक, जमा-खर्च हे शब्द वरकरणी रूक्ष वाटले तरी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. संसाराचा गाडा सुरळीत चालवायचा म्हणजे जमाखर्चाचा ताळेबंद मांडायलाच हवा! घरातील कर्त्या व्यक्तींनी एकत्र बसून आर्थिक अंदाजपत्रक आखले पाहिजे. आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज आहे. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली बजेट असणे आणि त्यानुसार खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे. हे फॅमिली बजेट कसे आखावे, त्यासाठी नेमके कोणते मुद्दे विचारात घ्यावे, वयाच्या कोणत्या टप्प्यावर बचतीचा मार्ग निवडावा, खर्च करताना नेमके प्राधान्य कशाला द्यावे, कुटुंबातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य विमा कसा आवश्यक आहे, पारंपरिक बचतीच्या पर्यायांबरोबर नवीन उपाय कोणते, अशा विविध गोष्टींचे सखोल मार्गदर्शन देणारे हे पुस्तक आहे. याबरोबरच दिव्यांग व्यक्तींसाठी आर्थिक आखणी, आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुण-तरुणींसाठी आर्थिक नियोजन, ज्येष्ठ नागरिकांचे लिव्हिंग विल, त्यांच्या वाढत्या खर्चाचे नियोजन, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810905219,"sku":"BK01113","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/family_budget_Front.jpg?v=1759421240"},{"product_id":"brahmachaitanya-sant-gondawalekar-maharaj-charitra","title":"ब्रह्मचैतन्य - संत गोंदावलेकर महाराज चरित्र","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथील संतांच्या मांदियाळीत शोभून दिसतील असे संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!  त्यांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. ब्रह्मज्ञानाचे ध्येय गाठण्यासाठी वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांनी गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरू केले. येहळेगाव येथील नाथपंथी गुरु तुकामाईंकडे ते गेले. तुकामाईंनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे सांप्रदायिक नाव ठेवून रामदासी दीक्षा दिली. सद्\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810937987,"sku":"BK01112","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Brahmachaitanya_Cover_Front.jpg?v=1759378839"},{"product_id":"leader-as-a-coach-marathi","title":"एक प्रशिक्षक म्हणून नेता (मराठी)","description":"\u003cp\u003eआपले नेतृत्व, आपली टीम आणि आपले भविष्य कसे सक्षम करायचे? याविषयीचे योग्य मार्गदर्शन म्हणजे 'लीडर अॅज ए कोच'. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात प्रभावी नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या टीमला सक्षम करणे होय! त्यांच्या प्रतिभेला पोषक वातावरण देणे आणि त्यांच्या सहकार्याची संस्कृती निर्माण करणे, याविषयी मार्गदर्शन. हे पुस्तक नेतृत्वाचा एक नवाच दृष्टिकोन मांडते. प्रेरणादायी कोच कसे बनावे, टीमचे मनोबल कसे वाढवावे आणि उच्च कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शन कसे करावे, यावर भर दिला आहे. सुलभ आणि वाचनीय पुस्तकात प्रत्येकासाठी योग्य ठरणारे नेतृत्व मार्गदर्शन आहे. सर्वसमावेशकता आणि सहभागाच्या माध्यमातून नवोपक्रम कसे साध्य होतात, याविषयी विवेचन! आव्हानांना संधीमध्ये कसे रूपांतरित करता येते आणि यशस्वी व्यूव्हरचना कशी करता येते, हे या पुस्तकातून समजते. टीमला प्रेरित करणाऱ्या कोचिंग कौशल्यांचा विकास कसा करायचा, शाश्वत विकासाचा पाया कसा घालायचा आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित कसे करायचे, हे शिकण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तुम्ही अनुभवी व्यावसायिक असाल किंवा नेतृत्व क्षेत्रात नवे पाऊल टाकत असाल, हे पुस्तक तुम्हाला उच्च-कार्यक्षम टीम तयार करण्यात आणि आजच्या काळात आवश्यक असलेल्या आधुनिक नेतृत्वशैलीत रूपांतरित करण्यात मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717810970755,"sku":"BK01109","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Leader_as_a_Coach_Marathi_Cover_Front.jpg?v=1759387570"},{"product_id":"garja-maharashtra-demi-size","title":"गर्जा महाराष्ट्र (डेमी साइज़)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळातील मानव, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट आदी राजघराण्यांपासून ते शहाजी, शिवाजी आणि भोसले राजघराणे, पेशवे, शिंदे-होळकर यांपासून पुढे आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात 'महाराष्ट्र' कसा घडला याचा इतिहास. राजारामशास्त्री भागवत, इतिहासचार्य वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर, मान्यवर इतिहासकार जदुनाथ सरकार, विविध ब्रिटिश इतिहासकार आदींच्या इतिहासलेखनाचा आढावा घेत, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींना स्पर्श करणारे लेखन. ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी आंतरविद्याशाखीय बैठक आणि तौलनिक दृष्टी यांचा आधार घेत सिद्ध केलेला मौलिक संदर्भग्रंथ. डॉ. यशवंत सुमंत यांच्या विवेचक प्रस्तावनेसह.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Paperback","offer_id":46277835456643,"sku":"BK01108","price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Garja_Maharashtra.jpg?v=1759387389"},{"product_id":"the-friend","title":"द फ्रेंड (मराठी)","description":"\u003cp\u003eआध्यात्मिक गुरु श्री एम यांच्याशी पत्रकार मोहिनी केंट यांनी 'द फ्रेंड' या पुस्तकात मन, शरीर, आत्मा आणि स्वास्थ्य या विषयांवर संवाद साधला आहे. 'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरु आणि त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब आणि शिकवण यापासून सुरुवात केली आहे. प्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई आणि आपल्या अस्तित्वाचे फिरते चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे. मृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदे अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717811069059,"sku":"BK01106","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/The_Friend_Cover_Front.jpg?v=1759387759"},{"product_id":"banking-classroom-bhag-2","title":"बँकिंग क्लासरूम - भाग २","description":"\u003cp\u003e'बँकिंग क्लासरूम' म्हणजे बँकिंगविषयक प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे, ही एक प्रकारची 'बँकिंग साक्षरता'च आहे.  याचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे हा आहे. लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे आणि फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे हाही या साक्षरतेचा एक भाग आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत.  यामुळे यातील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून 'तज्ज्ञांचे मत' (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत. बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहचविण्याची कृती आणि कार्य या 'बँकिंग क्लासरूम'मधून साध्य होईल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717811101827,"sku":"BK01104","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Banking_Classroom_2_cover_Front.jpg?v=1759378835"},{"product_id":"nisarg-ani-manus-jal-swarajyatoon-shashwat-samruddhikade","title":"निसर्ग आणि माणूस: जल स्वराज्यातून शाश्वत समृद्धीकडे","description":"\u003cp\u003eपाणी व्यवस्थापन आणि जल संधारणाची मूलतत्त्वे कोणती? ती आचरणात कशी आणता येतील? भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायचे? पाण्याचा योग्य वापर म्हणजे नेमके काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह 'तरुण भारत संघ' या संस्थेद्वारे ५० वर्षं काम करत आहेत. लोकशिक्षण आणि लोकसहभाग, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रे यांची सांगड घालून अथक प्रयत्नांद्वारे रखरखीत, शुष्क प्रदेशात त्यांनी पाणी आणले; हिरवाई फुलवली. चंबळच्या खोऱ्यातील अनेकांना आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळवून दिली. अनेक कुटुंबांची आयुष्ये समृद्ध केली. हे सारे सांगणारे वाचनीय, प्रेरणादायी आणि संग्राह्य पुस्तक म्हणजे 'निसर्ग आणि माणूस: जल स्वराज्यातून जल समृद्धीकडे'.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717811134595,"sku":"BK01094","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Nisarga_Ani_Manus_1.jpg?v=1759752856"},{"product_id":"kahat-kabir","title":"कहत कबीर","description":"\u003cp\u003eअर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांतून करणारे कवीहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत. मुस्लिम कुटुंबात वाढलेले कबीर रामनामात इतके दंग होते की, त्यांनी विणलेले वस्त्रही त्यांच्या भक्तिरंगात रंगून जात असे. कबीरदासांच्या आयुष्यातील घटनांचा आधार घेऊन लिहिलेली ही भावपूर्ण चरित्रात्मक कादंबरी कबीरांच्या संतत्वापर्यंतचा प्रवास चित्रित करते. त्याचबरोबर धर्माधर्मातील भेदभाव नष्ट करण्यासाठी कबीरांनी केलेल्या प्रयत्नांचा वेधही या चरित्रात्मक कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824405635,"sku":"BK01079","price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kahat_Kabeer_-_Front_Cover.jpg?v=1759387538"},{"product_id":"dnyanranjak-kavyakodi","title":"ज्ञानरंजक काव्यकोडी","description":"\u003cp\u003eएकनाथ आव्हाड आता सुंदर सुंदर काव्यकोडी घेऊन बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत. उमलत्या वयातील मुलामुलींना एकमेकांना कोडी घालायला आणि कोडी सोडवायला खूप आवडते. कोडी ऐकताना किंवा वाचताना ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. ही चमक उत्कंठेची असते, उत्सुकतेची असते, जाणून घेण्याची असते. काव्यकोडी तशी कमीच लिहिली जातात. जी लिहिली आणि छापली जातात, ती फारशी रंजक आणि उत्कंठावर्धक असतात, असेही नाही. ही अडचण लक्षात घेऊन आव्हाड यांनी जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उत्तमोत्तम काव्यकोडी लिहिली आहेत. या कोड्यांमध्ये विषयांची विविधता आहे. विविध खेळ आणि खेळाडू, समाजसुधारक आणि शास्त्रज्ञ, संशोधक आणि क्रांतिकारक, लेखक आणि कवी, गडकिल्ले आणि शहरे, पशुपक्षी आणि फुलेफळे, धान्य आणि खाद्यपदार्थ, व्याकरणातील रूक्ष आणि अवघड संकल्पना, आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्याविषयीची रंजक माहिती कोड्यांच्या माध्यमातून सांगितली आहे. म्हणी आणि वाक्प्रचारही यातून सुटले नाहीत. आयते ज्ञान मिळण्याच्या या काळात कोड्यांचा मनोरंजक खेळ दुर्मीळ होत चालला आहे. अशा कालखंडात या कोड्यांच्या माध्यमातून मनोरंजन आणि ज्ञान जिवलग मित्रांसारखे हातात हात घालून आले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824569475,"sku":"BK01061","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kavyakodi_FC.jpg?v=1759387539"},{"product_id":"gharbhar-darvalnara-sugandh","title":"घरभर दरवळणारा सुगंध","description":"\u003cp\u003eअनेकदा बालसाहित्यकार आपल्या बालपणीच्या अनुभवांवरच लिहीत राहतात. पण इथे लेखक सतत मुलांच्या सान्निध्यात असल्यामुळे बदलत्या पिढीनुसार त्यांच्या कथा बदलत गेलेल्या दिसतात. यातील कथांमधून भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण यांसारख्या नात्यांचा गौरव केला आहे. तर, 'गर्वाचे घर'मध्ये बालवयात नकळत निर्माण झालेल्या अहंकाराचा प्रभाव लेखक सहजतेने दाखवून देतो. 'माझ्यासाठी तीच विठाई'मध्ये मुलांमधला उपजत समजूतदारपणा दिसतो. 'थिरकले चिमुकले पाऊल'मध्ये वारली नृत्याविषयीची आस्था निर्माण होईल असे केले आहे. प्राणिजीवन, भूतदया, निसर्गाकडे बघायचा निकोप दृष्टिकोन याकडेही लेखक चिमुकल्यांचे लक्ष वेधतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतानाच वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाविषयी सतत बोललं जात असतं. अत्यंत संवेदनशील अशा बालवयात 'बालवाचक' निर्माण करायचं महत्त्वाचं काम एकनाथ आव्हाडांच्या हातून होत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824602243,"sku":"BK01060","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/gharbhar_darvalnara_sugandh_cover_FC.jpg?v=1763526395"},{"product_id":"mani-vase-te-swapni-dise","title":"मनी वसे ते स्वप्नी दिसे","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003eलहान मुलांना गोष्टी सांगणे किंवा ऐकवणे म्हणजे फक्त थोरामोठ्यांच्या अनुभवांची, सल्ल्यांची किंवा त्यांचा जीवनप्रवास कसा गेला याची माहिती देणे एवढंच नसतं. खऱ्या अर्थाने, घरच्या कुटुंबात घडणाऱ्या साध्या, रोजच्या, अगदी छोट्या वाटणाऱ्या प्रसंगांतूनही मुलांना खूप काही शिकायला मिळतं, आणि त्यातून त्यांचे मनोविकार, कुतूहल आणि बौद्धिक जिज्ञासा विकसित होते. हेच एकनाथ आव्हाड यांच्या कथांमधून स्पष्टपणे जाणवतं. या पुस्तकात आपण आपल्या घरात, अंगणात किंवा शेजारील परिसरात घडणाऱ्या छोटे-मोठे प्रसंग पाहतो; यामध्ये गंमतकोडी आहेत, रोजच्या जीवनातील साध्या घटना आहेत आणि अनेक वेळा कथेत हलक्या-फुलक्या पद्धतीने काव्यओळींचा समावेश करून त्या अधिक रंगतदार बनवलेल्या आहेत. मुलं या कथा वाचताना किंवा ऐकताना कथेत रंगून जातील; कधी खळखळून हसतील, तर कधी गंभीरतेने विचार करतील. कथांमधील पात्रांशी स्वतःची ओळख निर्माण होते आणि वाचक स्वतःला त्या पात्रांच्या भूमिकेत शोधतो. ही कथा फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाहीत, तर मुलांच्या जीवनातील नैतिकता, सहानुभूती, संवेदनशीलता आणि सामाजिक कौशल्यांना देखील आकार देतात. तसेच, या पुस्तकाचा आनंद फक्त लहान मुलांपुरता मर्यादित नाही; त्यांच्या पालकांनीही या कथांबरोबर वेळ घालवून मुलांसोबत वाचनाचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे, घरातील साध्या घटना, खेळ, कोडी आणि लहानसे काव्य यांच्या माध्यमातून मुलांचा मन आणि बुद्धी या दोन्हींचा विकास साधणारे हे पुस्तक खऱ्या अर्थाने वाचनप्रिय आणि जिवंत ठरतं.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"85\" data-end=\"702\"\u003eTelling or reading stories to young children is not just about sharing the experiences, advice, or life journey of elders. In fact, even the simple, everyday incidents that happen within a family can teach children a great deal and help develop their curiosity, intellect, and emotional awareness. This is clearly reflected in the stories of \u003cstrong data-start=\"427\" data-end=\"443\"\u003eEknath Avhad\u003c\/strong\u003e. In this book, readers encounter small and large events that take place in homes, yards, or nearby surroundings; it includes fun riddles, everyday happenings, and even verses of poetry subtly woven into the narratives to make them more lively and engaging.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"704\" data-end=\"1146\"\u003eWhile reading or listening to these stories, children become absorbed in the tales; sometimes they laugh out loud, while at other times they reflect deeply. The stories are so relatable that readers often find themselves identifying with the characters, imagining they are part of the story. These narratives do more than entertain—they also nurture values like empathy, sensitivity, moral understanding, and social skills in young readers.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1148\" data-end=\"1541\"\u003eMoreover, the enjoyment of this book is not limited to children alone; parents can also share in the reading experience, spending quality time with their children while enjoying the stories together. In this way, through simple everyday events, playful riddles, and small poetic touches, the book fosters both the mind and heart of children, making it truly engaging, educational, and alive.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824700547,"sku":"BK01059","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/mani_vase_te_swapni_dise_FC.jpg?v=1759387617"},{"product_id":"rajyog","title":"राजयोग","description":"\u003cp\u003eशेकडो वर्षांपासून मानवजातीने अस्तित्वाच्या असामान्य आणि अलौकिक परिमाणांचे आकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी विवेकानंद 'राजयोग'ला या प्रयत्नांचा परिपाक म्हणून मांडतात. ज्यामध्ये देवप्राप्तीसाठी एक पद्धतशीर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविला आहे. एकाग्रता आणि ध्यानाच्या तंत्राद्वारे, हा ग्रंथ वाचकांना मनावर प्रभुत्व मिळविण्यासाठी आणि उच्च चेतनास्थिती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 'राजयोग' हे मनाचे नियंत्रण आणि आत्मसाक्षात्कार याविषयीचे एक सखोल अध्ययन आहे, ज्यामध्ये प्राचीन योगाचे तत्त्वज्ञान आणि पद्धती अत्यंत व्यावहारिक आणि सुलभ भाषेत मांडल्या आहेत. स्वामी विवेकानंदांनी १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यूयॉर्क शहरात दिलेल्या व्याख्यानांवर हे पुस्तक आधारित आहे. आध्यात्मिक प्रबोधन शोधणाऱ्या साधकांसाठी 'राजयोग' शाश्वत ज्ञान प्रदान करते. आधुनिक जगात आध्यात्मिक मार्ग शोधणाऱ्यांसाठी स्वामी विवेकानंदांची शिकवण एक प्रकाशस्तंभ आहे, जी मार्गदर्शन करते आणि प्रेरणाही देते.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824798851,"sku":"BK01058","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Raja_Yoga_Cover_FC.jpg?v=1759387712"},{"product_id":"dnyanyog","title":"ज्ञानयोग","description":"\u003cp\u003e'ज्ञानयोग' हा ज्ञानाच्या मार्गाचा एक उत्कृष्ट अभ्यास आहे. वेदान्ताच्या तत्त्वज्ञानाची सखोल अंतर्दृष्टी देण्याचे आणि विवेकाच्या माध्यमातून त्याचा व्यावहारिक उपयोग सांगण्याचे काम 'ज्ञानयोग' करतो. स्वामी विवेकानंदांनी १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यूयॉर्क शहरात दिलेल्या व्याख्यानांवर आधारित हे पुस्तक आहे. वेदान्ताच्या गहन सत्याचे आकलन करून घेण्याची उत्सुकता असणाऱ्या विविध पार्श्वभूमीतील साधकांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. 'ज्ञानयोग' हे केवळ सैद्धांतिक पुस्तक नाही; जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या साधकांसाठी ते एक व्यावहारिक मार्गदर्शक पुस्तक आहे. वेदान्ताच्या तत्त्वज्ञानातील गहन तत्त्वे सोपी करून प्रभावीपणे व्यक्त करण्याची स्वामी विवेकानंदांची क्षमता 'ज्ञानयोग'ला एक अमर कलाकृती बनवते. तसेच ती पिढ्यांपिढ्यांना ज्ञानप्रकाश आणि आत्मसाक्षात्कार शोधण्यासाठी प्रेरित करत राहिली आहे.  हे पुस्तक केवळ आध्यात्मिक साधकांसाठीच नाही तर तत्त्वज्ञान आणि वेदान्ताच्या विद्यार्थ्यांसाठीही एक बहुमूल्य ठेवा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824831619,"sku":"BK01057","price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Dnyan_Yoga_FC.jpg?v=1759387319"},{"product_id":"bhaktiyog","title":"भक्तियोग","description":"\u003cp\u003e'भक्तियोग' हा प्रेम, भक्ती आणि समर्पण या मार्गाचा एक परिपूर्ण अभ्यास आहे. स्वामी विवेकानंदांनी १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यू यॉर्क शहरात दिलेल्या व्याख्यानांवर आधारित 'भक्तियोग' हे पुस्तक आहे. प्राचीन भारतीय ज्ञान आधुनिक जगासमोर आणण्याच्या स्वामी विवेकानंदांच्या प्रयत्नांमध्ये 'भक्तियोग'ने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्राचीन ग्रंथांमधून मिळालेली आध्यात्मिक अंतर्दृष्टी स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवांतून स्पष्ट आणि व्यावहारिक पद्धतीने मांडली आहे. हा केवळ भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही, तर रोजच्या जीवनात भक्तीचा समावेश करण्यासाठीचा एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे. प्रेम आणि समर्पणाच्या मार्गाने चालण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी, 'भक्तियोग' हा एक अनमोल मार्गदर्शक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824864387,"sku":"BK01056","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Bhakti_Yoga_Front_Cover.jpg?v=1759378837"},{"product_id":"isap-sendriy-shetipaddhatine-kapus-lagwad","title":"इसप सेंद्रिय शेतीपद्धतीने कापूस लागवड","description":"\u003cp\u003eकापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. शेतकरी प्रचलित १६ सेंद्रिय शेती पद्धतीनुसार कापूस लागवड करतात, परंतु त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नाही. कृषी विद्यापीठांनी मृदा विज्ञान (Soil Science), पीक विज्ञान (Crop Science) या आधारे कापसासह सर्व पिकांच्या लागवड पद्धती दिल्या आहेत. परंतु पुस्तकात शास्त्रज्ञांनी दुर्लक्षित केलेल्या जगातील ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या बायोडायनामिक विज्ञानाचा समावेश करत 'इसाप' (ISAP-Integrated Sustainable Agricultural Practices) 'एकात्मिक शाश्वत शेती तंत्रज्ञान' दिले आहे. कापसासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीपासून, वाणाची निवड, बीटी कापूस का नको, पेरणी पद्धत, बियाणे संस्कार, योग्य आंतरपिके, त्याचे पीकपोषण, पीकसुरक्षा, तण व्यवस्थापन, वेचणी या कामांचा तपशील व त्याचे बायोडायनामिक (बी.डी.) कॅलेंडरप्रमाणे वेळापत्रक, संपर्क पत्ते यांचा समावेश पुस्तकात केला आहे. शेतकरी, शेती अभ्यासक, विद्यार्थी, सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते यांच्यासाठी 'कापूस लागवड' हे उपयुक्त पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824897155,"sku":"BK01055","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BookCover_Front_Kapus_Lagwad.png?v=1759750616"},{"product_id":"banking-classroom-bhag-1","title":"बँकिंग क्लासरूम - भाग १","description":"\u003cp\u003e'बँकिंग क्लासरूम' म्हणजे बँकिंगविषयक प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत दिलेली उत्तरे, ही एक प्रकारची 'बँकिंग साक्षरता'च आहे.  याचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या पैशांवर नियंत्रण मिळवून देणे हा आहे. लोकांचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक व कर्जाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्यांना सक्षम बनवणे आणि फसवणूक व आर्थिक शोषणापासून संरक्षण देणे हाही या साक्षरतेचा एक भाग आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही या पुस्तकातून स्पष्ट केले आहेत.  यामुळे यातील उत्तरांचे दाखले अनेक न्यायालयीन निवाड्यांमधून 'तज्ज्ञांचे मत' (Expert Opinion) म्हणून नोंदवले आहेत. बँका, वित्तीय संस्था, त्यांच्या सेवा, सुविधा, त्या संदर्भातील कायदे व नियम यांची सुस्पष्ट, समजण्याजोगी व परिणामकारक माहिती सामान्य जनतेला पोहचविण्याची कृती आणि कार्य या 'बँकिंग क्लासरूम'मधून साध्य होईल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824929923,"sku":"BK01054","price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Banking_Classroom_Part_1_cover_Front.jpg?v=1759378835"},{"product_id":"the-homecoming-and-other-stories-marathi","title":"द होमकमिंग अँड अदर स्टोरीज (मराठी)","description":"\u003cp\u003e'द होमकमिंग अँड अदर स्टोरीज' हा श्री एम. लिखित निवडक कथासंग्रह मानवी मनाच्या अंतरंगात डोकावून त्यांच्या कृतींचा अर्थ समजून घेण्यास प्रवृत्त करतो.  अगदी भय कथांपासून, धक्कादायक आणि हृदयस्पर्शी कथांचाही यात समावेश आहे.  त्यामुळे 'माणसे असे का वागतात?' याची झलक पाहण्यास या कथा उद्युक्त करतात.  एखाद्या आजीवन शिष्यत्व पत्करलेल्या शिष्याला त्याच्या गुरूचे एखादे गुप्त रहस्य कळते तेव्हा काय होते?... एखादा चोर त्याच्या जीवनमार्गात सुधारणा घडवून आणू शकतो का?... या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांची आध्यात्मिक दृष्टिकोनातून उकल करणाऱ्या या कथासंग्रहात 'प्रत्येकासाठी काही ना काहीतरी' आहेच. प्रत्येक मनुष्याच्या ठायी असलेल्या चांगुलपणाचे संगोपन करण्याचे कार्य हा कथासंग्रह सहज सोप्या पद्धतीने करतो.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825060995,"sku":"BK01091","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/homecoming_cover_Front.jpg?v=1759387409"},{"product_id":"man-shuddhichi-perni","title":"मन शुद्धीची पेरणी","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील वारकरी संतांनी अध्यात्मसाधनेत मनावर संयम राखण्यावर महत्वपूर्ण भर दिला. देवाच्या प्राप्तीसाठी आणि आत्मिक शांतीसाठी मनाचे नियमन महत्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या अभंगातून आणि ओवीतून वारंवार सांगितले. संतांची हीच वैचारिक परंपरा पुढे नेण्याचे महत्वाचे काम डॉ. इंद्रजीत देशमुख (काकाजी) करत आहेत. प्रस्तुत 'मनशुद्धीची पेरणी' या पुस्तकात काकाजींनी 'मन माझे चपळ' या मनाच्या प्राथमिक स्तरापासून ते 'मन हे मीचि करी' या मनाच्या अंतिम पायरीवर पोहचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध प्रयोगांचा समावेश केला आहे. हे सर्व प्रयोग अर्थातच संतवचनांवर आधारित आहेत. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत कबीर, संत तुकाराम या संत मांदियाळीबरोबरच मिल्टन, शेक्सपियर या पाश्चात्त्य अभ्यासकांचे अनेक दाखले आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. संतांच्या मार्गाने, मन या साधनाने याच शाश्वत आनंदाचा काकाजींनी घेतलेला शोध वाचण्यासारखा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825093763,"sku":"BK01043","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Book_Cover_Manshuddhichi_Perni_Front.jpg?v=1763527163"},{"product_id":"dhyanswasthya","title":"ध्यानस्वास्थ्य","description":"\u003cp\u003eयोगशास्त्रातील ध्यानाचा संबंध केवळ अध्यात्माशी आहे, वैद्यकीय आणि वैज्ञानिक निकषांवर ते टिकणार नाही असा चुकीचा समज पसरवला जात असताना मनोज पटवर्धन यांनी ध्यानावर होत असलेल्या जागतिक संशोधनाकडे लक्ष वेधले आहे.  चांगले छंद ही ध्यानाची पूर्वतयारी आहे याची जाणीव करून देत असताना 'काहीही न करणे म्हणजे ध्यान', या ध्यानाच्या अतिशय महत्त्वाच्या व्याख्येची ओळख त्यांनी करून दिली आहे. 'योगनिद्रा' हे योगशास्त्राने दिलेले एक अद्भुत वरदान आहे. या अतिशय प्रभावी, योग्य प्रक्रियेविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्याच्या पूर्वतयारीपासून ते योगनिद्रेतून हळुवारपणे बाहेर येण्याच्या स्थितीपर्यंत सर्वच पायऱ्या त्यांनी छान समजावून सांगितल्या आहेत. मनोज पटवर्धन यांनी आजवर केलेली योगसाधना, त्यांचे चौफेर वाचन, सखोल अभ्यास या साऱ्याला असलेली मननाची आणि चिंतनाची जोड यांमुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळे परिमाण लाभले आहे. साधी सोपी भाषा, अवघड विषय सोपा करून सांगण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे विषयाबाबतची तळमळ यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825126531,"sku":"BK01041","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Dhyaanasvaasthy_Front.jpg?v=1759387319"},{"product_id":"dhasudi-aswastha-manatil-goshti","title":"धसुडी: अस्वस्थ मनातील गोष्टी","description":"\u003cp\u003eएकाच विषयावर दोन-अडीचशे पाने लिहावीत इतक्या गहन अर्थाचे विषय धसुडी या पुस्तकात मांडले आहेत.  सध्याच्या धावपळीच्या जगात वाचकांकडे वाचनासाठी असलेला वेळ लक्षात घेता, अवघ्या एका पानात एका विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातून तुम्हाला चाळीसहून अधिक ज्वलंत विषयांवरील वास्तववादी विचार वाचायला मिळणार आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात प्रेरणा देणारे महापुरुष व महान स्त्रियांच्या चरित्रालाही सद्यस्थितीशी जोडून त्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. धसुडी हे पुस्तक सर्व वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यार्थी, युवक-युवती, नोकरदार, कामगार, शिक्षक, महिला, वृद्ध, शेतकरी, उद्योजक या सर्वांसंबंधीच्या लेखांनी धसुडी लेखसंग्रह समृद्ध झाला आहे.  या धसुडी वाचताना हजारो श्रोत्यांना या निमित्ताने विशाल गरड यांच्या लेखनाचा एक आगळावेगळा अनुभव मिळेल. शिवाय या धसुडी सर्वांना रुचतील आणि रुजतील अशा असल्याने सर्वांच्या हृदयाचा ठाव घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825224835,"sku":"BK01039","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Dhasudi_Cover_Front.jpg?v=1759387318"},{"product_id":"chavhata","title":"चाव्हटा","description":"\u003cp\u003eचार रस्ते जिथे एकत्र येतात, ती जागा म्हणजे चव्हाटा.  याचा अधिक गंभीर अर्थ म्हणजे सार्वजनिक हिताच्या विषयांवर चर्चा होणारे सामूहिक चर्चाविश्व (पब्लिक स्फीअर). भारतीय निसर्ग-पर्यावरणाचा असा चव्हाटा त्यासंबंधीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय पैलूंच्या मार्गांनीच साकारतो. आपल्या सभोवतालच्या परिसराची समग्र समजून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. अशा चव्हाट्यावरील चर्चा रोखठोक असतात. विषयाच्या एरवी कुणीतरी, कुठेतरी लपवू पहात असलेल्या काही बाजू तिथे निश्चितपणे उघड होतात. चारही रस्त्यांनी आलेल्या माहितीची देवाणघेवाण होऊन प्रश्नांचे वस्तुनिष्ठ आकलन होते. त्यातील प्रश्नांचे सहज न समजणारे काही पैलू चव्हाट्यावर भीडभाड न बाळगता सामोरे येतात. हे पुस्तक भारतीय निसर्ग-पर्यावरणातील काही ज्वलंत प्रश्न, त्यामागील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय गुंतागुंत अशाच रोखठोक पद्धतीने चव्हाट्यावर आणते. भारतीय निसर्गातील बऱ्याच सकारात्मक गोष्टी, सौंदर्यही सामोरे आणते. सजग वाचकांना अधिक विचारप्रवृत्त आणि कृतीशील होण्यासाठी महत्त्वाचे संदर्भ पुरवते.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825290371,"sku":"BK01037","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Chavhata.png?v=1758790433"},{"product_id":"yoga-also-for-the-godless","title":"निरीश्वरवाद्यांसाठीही योग","description":"\u003cp\u003eयोगशास्त्र भारतात उदयाला आले असले तरी, योगाभ्यास करण्यासाठी हिंदू असणे आवश्यक नाही.  हे योगाभ्यासकांसाठी समाधानाची बाब आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री एम यांनी 'योगा ऑल्सो फॉर गॉडलेस' या पुस्तकातून हेच अधोरेखित केले आहे.  कोणत्याही धर्माचे असणे किंवा देवावर विश्वास नसणे या गोष्टी कोणालाही योगी होण्यात अडथळा आणू शकत नाहीत. नास्तिकांसाठीही उपयुक्त ठरणारे योगशास्त्र म्हणजे हे पुस्तक! योगाभ्यासाच्या सरावातून आस्तिक प्रमाणेच नास्तिकही परमानंद व आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतो, हेच यात नमूद केले आहे. पतंजलींच्या योगसूत्रांवर श्री एम यांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सिद्धांत व प्रत्यक्ष सराव यांविषयी क्रमवार माहिती देणारी मार्गदर्शिकाच आहे. श्वास, शरीर व आसने या अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना श्री एम यांनी स्पष्ट व सुबोध भाषेत आणि योगासनांच्या छायाचित्रांच्या मदतीने संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगितल्या आहेत. योगाभ्यास करणार्‍यांबरोबरच नवोदितांसाठीही हे उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825388675,"sku":"BK01035","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Yoga_Cover_front.jpg?v=1759387891"},{"product_id":"shirdi-sai-baba-an-inspiring-life","title":"शिर्डी साई बाबा: एक प्रेरणादायी जीवन","description":"\u003cp\u003eशिर्डी साईबाबांचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही पसरलेले आहेत. हे सर्व भक्त त्यांच्याकडे आले ते आध्यात्मिक ओढ आणि शिर्डी साईंच्या प्रेमळपणा, साधेपणामुळे. या पुस्तकात शिर्डी साईंच्या जीवनाचा बांधेसूद आणि शक्य तितक्या कालक्रमानुसार दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात काही प्राथमिक स्रोत आणि कागदपत्रे वापरली आहेत, जी आजपर्यंत उजेडात आली नव्हती! त्यामुळे लोकांच्या मनात बाबांशी संबंधित प्रश्नांबद्दल काही गृहीतके रेंगाळत राहिली. ही कागदपत्रे लेखकाने विविध स्रोतांद्वारे एकत्रित केली आहेत. अतिवर्णनात्मकता टाळून लेखकाने सरळ, साध्या शैलीत साईबाबांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिर्डी साईबाबांचे दिव्य व्यक्तिमत्त्व, उदात्त हेतू, तत्त्वज्ञान हे भक्तांच्या, वाचकांच्या आणि इतर संशोधकांच्या सहज समोर येते. शिर्डी साईबाबांवर भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांवरील पहिले पुस्तक श्री साईसच्चरित हे १९२९ मध्ये श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनी प्रकाशित केलेले पुस्तक मुख्य संदर्भ म्हणून वापरले आहे. आपल्या भक्तांना संकुचित विचारसरणी, कट्टरतावाद आणि पूर्वग्रह यातून बाहेर काढण्याचे शिर्डी साईबाबांचे नवनवे मार्ग होते. अगदी खोड्या काढताना, विनोद करतानाही ते आपल्या भक्तांना एक आश्वासक, संरक्षक आणि सांत्वन देणारा अर्थ द्यायचे. शिर्डीच्या साईबाबांचा स्पर्श, दृष्टिक्षेप, शब्द भेटणाऱ्यांवर जादुई परिणाम करायचा! हे पुस्तक वाचताना साई बाबांचे हेच व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825421443,"sku":"BK01034","price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Shirdi_Sai_baba_cover_Front.jpg?v=1759388072"},{"product_id":"relations-nata-tutatana-ani-navyane-julavtana","title":"संबंध: नाता तुटाताना आणि नव्याने जुळताना","description":"\u003cp\u003eकोणतेही नाते जोडताना ते तोडण्याचा विचार कोणी करत नाही, पण 'जमलं तर टिकवा नाही तर मिटवा' ही वस्तुस्थिती स्वीकारून स्टेटस टाकून आपलं तुटलेलं नातं जगजाहीर करणाऱ्या 'जनरेशन झी' त्याचे सेलिब्रेशनही करते, त्यांच्यासाठी रिलेशन्स : नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना! नातं तोडणं एवढं सोपं असतं का? नातं तोडताना सूडबुद्धी असेल तर काय होतं? तुटलेल्या नात्यांचा मुलांवर काय परिणाम होतो? कशी हाताळावी ही परिस्थिती? 'ब्रेकअप'मधून बाहेर पडल्यावर एकटचं राहावं, की नव्याने नातं जोडावं? मनाचं मनाशी असलेले नातंही तुटतं का? कसं सावरायचं ते? या प्रश्नांची उत्तरे! प्रत्येकाला पटणारं, दिशा दाखवणारं--डोळ्यात पाणी आणणारं आणि भावणारं मानसशास्त्रीय समुपदेशन!\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825650819,"sku":"BK01028","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/relations__nata_tutana_cover_Front.jpg?v=1759387712"},{"product_id":"relations-nata-nibhavtana","title":"संबंध: नाता निभावताना","description":"\u003cp\u003eप्रत्येक नातं महत्त्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं नातं, आपलं आपल्याच मनाशी असलेलं नातं... याचं विश्लेषण म्हणजे रिलेशन्स : नातं निभावताना! सर्व नाती निभावणं वाटतं तितकं सोपं नसतं, नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी? नाती कशी टिकवायची? नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? याचं प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून सहज-सोप्या भाषेत केलेलं विवेचन! नाती निकोप आणि मजबूत करण्यासाठी सर्वंकष समुपदेशन!\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825716355,"sku":"BK01027","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/relations__nata_nibhavtana_cover_Front.jpg?v=1759387711"},{"product_id":"marco-pollo","title":"मार्को पोलो","description":"\u003cp\u003eही कथा आहे मार्को पोलो या प्रवाशाची, ज्या काळात प्रवास ही कल्पनाच मुळात साहसाच्या कक्षेत येत होती. व्यापार आणि प्रवास करताना त्याने अनेक संकटांना आणि कठीण आव्हानांना तोंड दिले. अनेक वाहनांचा, साधनांचा उपयोग करून त्याने रस्ते, वाळवंट आणि समुद्र यांतूनही प्रवास पूर्ण केला. व्हेनिससारख्या युरोपीय शहरातून बीजिंग, नानकिंग, जावा, सुमात्रा, मलाया, व्हिएतनाम, सिलोन करत त्याने भारतालाही भेट दिली. हजारो मैलांचा प्रवास करताना हा साहसी वीर एक आश्चर्यकारक जीवन जगला. त्याच्या या प्रवासाचीच ही कथा. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांची एकमेकांशी ओळख करून देणाऱ्या मार्को पोलो या साहसी प्रवाशामुळे युरोपला एका नव्या जगाचा परिचय झाला. विविध प्रदेशात फिरताना त्याने अनेक भाषा आत्मसात केल्या. मार्को पोलोच्या प्रवासातील अद्भुत घटना, रोमांचक प्रसंग, त्या काळातील लढाया, राज्यांची आणि राज्यकर्त्यांची वर्णने वाचण्यासाठी, त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825880195,"sku":"BK01017","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Book_Cover_Marco_Polo__Front.jpg?v=1763528577"},{"product_id":"sant-surdas","title":"संत सूरदास","description":"\u003cp\u003eसंत सूरदास हे केवळ एका कवीचे नाव नाही, तर ते जगातील एका महान चमत्काराचे नाव आहे! ज्याने हे सिद्ध केले आहे की, अनन्य भक्ती एका व्यक्तीला इतकी शक्ती देऊ शकते की, जन्मांध असूनही ती आपल्या आराध्य देवतेचे सुंदर वर्णन करू शकते, जसे सूरदासांनी कृष्णलीलांचे केले आहे. ज्ञान आणि भक्तीने अंतःकरणाची दृष्टी कशी स्पष्ट होते, हे सूरदासांच्या मनोहर रचना वाचून समजते. सूरदासांनी वेद-पुराणात लिहिलेले कठिन ज्ञान आणि भक्तीचे वर्णन आपल्या सोप्या ब्रजभाषेत अशा प्रकारे व्यक्त केले आहे, जणू भक्त कृष्णाच्या नामात रंगूनच गेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825912963,"sku":"BK01016","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sant_Surdas_Front.jpg?v=1759400847"},{"product_id":"dhumasta-shejar-shejaril-deshntil-badalancha-dhandola","title":"धुमस्ता शेजार: शेजारील देशांतील बदलांचा धंदोला","description":"\u003cp\u003eभारताचे बहुतांश शेजारी देशांशी असलेले संबंध एका नाजूक वळणावर उभे आहेत. भारताच्या तुलनेत या छोट्या देशांना भारताला पूर्णपणे टाळणे शक्य नाही; मात्र ते भारतावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत, त्याचा आढावा! चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा, चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारताचे चीनशी बदलते संबंध, त्यात चीनमधील अंतर्गत बदल यांचा धांडोळा! भारताभोवतीच्या देशांमध्ये चीनचा वाढता रस आणि अमेरिका-रशियासारख्या देशांचे पारंपरिक हितसंबंध, त्यात नव्या जागतिक रचनेतील स्पर्धेचे पदर यांतून प्रामुख्याने दक्षिण आशियातील राजनयाची रूढ चाकोरी बदलते आहे. याचे विश्लेषण! भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' या पुस्तकात केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826044035,"sku":"BK00827","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Dhumasata_shejar_FC.jpg?v=1759387318"},{"product_id":"jag-badaltana-jagatik-nav-rachanche-antarang","title":"जग बदलताना: जागतिक नवनिर्माणाचे अंतरंग","description":"\u003cp\u003eजग एकदुसऱ्याशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, 'जग बदलताना' हे पुस्तक! जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदलले आहेत. ते कसे याची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826109571,"sku":"BK00826","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Jag_Badaltana_front_cover.jpg?v=1759387463"},{"product_id":"mazi-atmakatha","title":"माझी आत्मकथा","description":"\u003cp\u003eडॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र हे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या संघर्षाचे प्रतीक आहे.  त्याचा हा संक्षिप्त आढावा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या प्राप्त केल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. डॉ. आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी वैचारिक प्रबोधन कार्यात सहभागी झाले.  'मूकनायक' (३१ जानेवारी १९२०), 'बहिष्कृत भारत' (३ एप्रिल १९२७), 'जनता' (२४ नोव्हेंबर १९३०, पहिला अंक) 'प्रबुद्ध भारत' (४ फेब्रुवारी १९५६) ही समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे त्यांनी प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.  त्यामुळे डॉ. आंबेडकरांची २०१२ मध्ये 'द ग्रेटेस्ट इंडियन' या सर्वेक्षणात 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826175107,"sku":"BK00680","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Majhi_Atmakatha_FC.jpg?v=1759387609"},{"product_id":"karmayog","title":"कर्मयोग","description":"\u003cp\u003eस्वामी विवेकानंदांची उत्कट इच्छा होती की भारताने आपले पूर्वीचे गौरवाचे स्थान पुनः प्राप्त करावे.  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते नेहमी आपल्या व्याख्यानांतून 'कर्मयोगा'चे महत्त्व सांगत असत. हे पुस्तक कर्मयोगावर  १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यू यॉर्क शहरात दिलेल्या त्यांच्या प्रसिद्ध व्याख्यानांचा संग्रह आहे.  मनुष्याला निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे. 'ऋग्वेदा'तील 'आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च' या श्लोकाचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी आत्मज्ञान आणि लोकहित हे दोन्ही साधावे, असे स्वामी विवेकानंदांना अगदी मनापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे.  त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण; म्हणूनच त्यांच्या शब्दांत अपार शक्ती साठलेली आहे. स्वामी विवेकानंदांची मार्गदर्शक ठरणारी दिव्य आणि ओजस्वी वाणी यांचा अनुभव पुस्तकरूपाने वाचकांना मिळणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826240643,"sku":"BK00675","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/KarmaYog_Cover_Marathi_FC.jpg?v=1759387534"},{"product_id":"aitihasik-wade-ani-gharane","title":"ऐतिहासिक वाडे आणि घराणी","description":"\u003cp\u003eकार्ला येथील आत्मसंतुलन ग्राम येथे, सं तुलन क्रिया योग हा जगभरातून येणाऱ्या लोकांच्या दैनिक दिनचर्येचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि संधिवात यांसारख्या आजारांपासून ते दमा, त्वचारोग, मानसिक ताण, निद्रानाश, नैराश्य आणि इतर अनेक गंभीर वैद्यकीय समस्यांवर उपचार करण्यासाठी, सं तुलन क्रिया योगाच्या तंत्रांनी उत्कृष्ट परिणाम दिले आहेत.  ही पुस्तिका सं तुलन क्रिया योग - SKY ची इंग्रजीतील पहिली सर्वसमावेशक आवृत्ती आहे, जी अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717850783875,"sku":"BK01013","price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Aitihasik_Wade_V_Gharane_FC.jpg?v=1759378598"},{"product_id":"shuddhipatra","title":"शुद्धिपत्र","description":"\u003cp\u003eज्या घटकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला, त्या घटकांना न्याय्य वागणूक मिळावी, म्हणून भारतीय संविधानाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पारित केला. अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठीही विशेष कायदे करण्यात आले. त्यामुळे त्या त्या समाज घटकांचे अवमानकारक उल्लेख आपोआपच कायद्याच्या कचाट्यात आले. पण शब्दकोशासारख्या भाषिक वैभवामध्ये जातिवाचक उल्लेख अर्थासहित दिल्याने कोणाचा अपमान होऊ शकतो? भावना दुखावतात? भाषांवर निरतिशय प्रेम असलेल्या एका तज्ज्ञाने शब्दकोशातील 'ते' सहा शब्द वगळले जाऊ नयेत, म्हणून दिलेल्या कायदेशीर लढ्याचे चित्रण करणारी ही सामाजिक कादंबरी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717850816643,"sku":"BK01012","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Shuddhipatra_Front.jpg?v=1759388073"},{"product_id":"akher-sapadli-waat","title":"आखेर सपाडली वाट","description":"\u003cp\u003eमोठ्यांबरोबरच लहान मुलांवरही सध्या माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे.  आपल्याकडे येणाऱ्या माहितीतील काय घ्यायचे, काय नाही, याचा विचार करायलाही कोणालाच वेळ मिळत नाही. त्याचबरोबर मुलांनी काय बघावे, वाचावे, ऐकावे, यावर नियंत्रण शिक्षक किंवा पालकांकडे राहिलेले नाही. त्यामुळे अनेकदा नको ती माहिती, जगभरात विविध देशांत चालू असलेली युद्धजन्य परिस्थिती हे सगळंच मुलांच्या कानावर पडत आहे. हे चित्र पाहताना मुलांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते किंवा वास्तवाची जाणीव त्यांना अस्वस्थ करू शकते. अशा वेळी, आशावादी कथा त्यांना दिलासा देऊ शकतात. अर्थात, त्यामध्ये वास्तवाचा अंतर्भाव असायलाच हवा. कारण मुलं वास्तव पाहतात, ऐकतात, अनुभवतात. अशा कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या या कथा आहेत.  त्यात कोठेही खिन्न, विषादपूर्ण असा सूर नाही. तो प्रयत्नवादी, आशावादी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851013251,"sku":"BK01003","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/akher_sapdali_wat_FC.jpg?v=1759378599"},{"product_id":"pracheen-bharatiya-khagolvidnyan","title":"प्राचीन भारतीय खगोलविज्ञान","description":"\u003cp\u003e'भारत विद्या' अर्थात 'इंडॉलॉजी' हा विषय अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठीही नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या माहितीविषयी बहुसंख्य वाचकांना उत्सुकता असते. त्यामुळेच पुस्तके, व्याख्याने, इंटरनेट अशा विविध माध्यमांतून प्राचीन संस्कृतीतील ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील अभ्यासक करत असतात. प्रस्तुत पुस्तकात रामायण आणि महाभारत या मानवजातीच्या 'इतिहास ग्रंथां'तील खगोलशास्त्रीय पुराव्यांची थोडक्यात मांडणी केली आहे; ऋग्वेद, सूर्यसिद्धान्त आदी ग्रंथांसोबतच नद्यांचा भूगोल आणि त्यांच्या प्रवाहातील बदलांचा अभ्यास, प्राचीन वास्तूंचा अभ्यास यातून भारतीय ज्ञानसंस्कृतीचा आवाका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. इंडॉलॉजीच्या अभ्यासातील रूढीवादी दृष्टिकोनापासून मुक्त होऊन, प्राचीन भारतीय ज्ञानविश्वाचा अभ्यास मुळातून करण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन प्राचीन भारतीय खगोलशास्त्र या पुस्तकामुळे मिळेल, याची खात्री वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851046019,"sku":"BK01001","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Prachin_Bharatiya_Khagolvidnyan-_Front_Cover.jpg?v=1759387688"},{"product_id":"sakaljanawadi-chhatrapati-shivray","title":"सकळजनावाडी छत्रपती शिवराय","description":"\u003cp\u003eशिवाजी महाराजांची जीवनकथा शांततावादी, मानवतावादी आणि सामाजिक न्यायाची दृष्टी विकसित करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना बळ देणारी आणि ताकद देणारी आहे. या पातळीवर हे शिवचरित्र नवे आकलन घडवते. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य हे राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रव्यापी होत जाते. हा प्रवाह या चरित्राचा आशय आणि विषय आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या सकलजनवादी जीवनकार्याचे विविध कंगोरे सात विभागांत मांडले आहेत. स्वराज्य स्थापना व पूर्वपीठिका, स्वराज्याचा विस्तार, हिंदुस्थान आणि शिवराय, जग आणि शिवराय, राजकीय अर्थकारण, परंपरा आणि नवता, सकलजनवादी मूल्य व्यवहार.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851111555,"sku":"BK01000","price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sakaljanawadi_ShriShivaji_-_Front.jpg?v=1759388059"},{"product_id":"upanishad-katha-vedanche-saar-kathanmadhoon","title":"उपनिषद कथा : वेदांचे सार कथानकातून","description":"\u003cp\u003eभारतीय तत्त्वज्ञान उपनिषदांमधून सांगितले गेले आहे. वेद आणि ब्राह्मण ग्रंथ हे यज्ञसंस्कृतीला पूरक असे साहित्य आहे; यज्ञांत म्हटली जाणारी सूक्ते वेदांमध्ये होती आणि त्या सूक्तांचा कोणत्या यज्ञात कधी उपयोग करायचा हे सांगण्यासाठी ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली; परंतु नंतरच्या काळात मनुष्य केवळ कर्मकांडांत न रमता संसारातून थोडा बाजूला होऊन अरण्यात राहून जगाच्या निर्मितीविषयी विचार करू लागला, तेव्हा उपनिषदांची निर्मिती झाली. उपनिषदांमध्ये वेदांचे सार आहे. त्यामुळेच उपनिषदे, वेदवाङ्\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851144323,"sku":"BK00999","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/UPANISHAD_Front_Cover.jpg?v=1763529846"},{"product_id":"yogiyancha-rana","title":"योगियांचा राणा","description":"\u003cp\u003eशेगावचे संत गजानन महाराज हे भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया होते. ते शेगावातील एका सद्गृहस्थाला उकिरड्यावर टाकलेले अन्न आणि गढूळ पाणी पिताना दिसले.  चांगले अन्न व पाणी त्यांच्यासमोर ठेवले असताही, निर्मोही वृत्तीने त्यांनी सर्व अन्न एकत्र करून खाल्ले आणि गढूळ व स्वच्छ पाणी असा भेद आमच्या ठायी नाही, सारे काही एकच आहे, असा अद्वैताचा बोध त्यांनी केला.  त्यांनी लोककल्याणासाठी केलेले असंख्य चमत्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण, तसेच त्यांच्या भक्तांना आलेले प्रत्यक्ष अनुभव या जीवनचरित्रात समाविष्ट केले आहेत. देहत्याग केल्यानंतरही गजानन महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गजानन महाराज संस्थानचे कार्यही या चरित्रग्रंथात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851177091,"sku":"BK00998","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Yogiyancha_Rana_-_Front.jpg?v=1759387893"},{"product_id":"parikshesathi-pariksheadhi","title":"परीक्षेसाठी... परीक्षेसाठीच!","description":"\u003cp\u003eखूप अभ्यास केला पण परीक्षेत मार्क मिळाले नाहीत, अभ्यास केला पण लक्षातच राहिलं नाही, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास कसा करायचा?, आयक्यू टेस्टमध्ये आयक्यू कमी आला आहे म्हणजे माझी बुद्धी कमी आहे का? परीक्षा ही आपली शत्रू नाही, तिच्याशी युद्ध करायला, मग परीक्षेला सामोरं कसं जायचं, या आणि अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं देणारं पुस्तक. मुलांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी!\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851570307,"sku":"BK00988","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Parikshesathi_Parkisheadhi_FC.jpg?v=1759387689"},{"product_id":"kasa-huin-ta-hun-mai","title":"# कसा हुइन ता हुन मै","description":"\u003cp\u003eग्रामीण जीवनाविषयी सर्वांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. त्यातही ग्रामीण भागातील इतर कोणापेक्षाही बाईचे जीवन कसे चालते हे विशेषत्वाने जाणून घेण्याची सर्वांनाच आवड असते. ग्रामीण कष्टकरी महिलेचे जीवन आजही चूल-मूल आणि भाकरी या त्रिकोणातच बंदिस्त आहे. सुनांच्या कामाविषयी बोलताना तर \"#कसं_हुईन_तं_हू_माय\" हे वाक्य ग्रामीण भागातील सासूबाई दिवसातून दहा वेळा उच्चारतात. या सुनेमुळे माझ्या मुलाचे कसे होईल - असा याचा सरळ साधा अर्थ. आपल्या मुलाची काळजी करताना ते आई-वडील, घरदार सगळं सोडून आलेल्या सुनेची अजिबातच काळजी करत नाहीत. या पुस्तकात अशाच जीवन जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचे जीवन डोळ्यासमोर उभे राहतेच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील जीवनाचा पट उलगडून दाखवणारे हे पुस्तक वाचण्यासारखेच आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851635843,"sku":"BK00987","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kasa_Huin_Tan_Hu_Mai..._1.jpg?v=1759423863"},{"product_id":"samarth-ramdas-rachit-dasbodhatil-guntawnuk-bodh","title":"समर्थ रामदास रचित दासबोधातील गूढार्थबोध","description":"\u003cp\u003eआधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका ।।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्य सांसारिकांनी आधी प्रपंच व्यवस्थितपणे करावा आणि तो करत असतानाच परमार्थाचे ध्यान करावे, अशी निःसंदिग्ध शिकवण देणारे समर्थ रामदास ! समर्थांनी आपल्या 'दासबोध' ग्रंथातून जीवनाचे सार्थक नेमके कशात आहे, याबाबत सर्वांना जे मार्गदर्शन केले आहे, ते आजही तितकेच मोलाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअस्मानी सुलतानी संकटांनी गांजून गेलेल्या तत्कालीन भयग्रस्त समाजाला परमेश्वरी चिंतनाची, आध्यात्मिक स्तरावर एकत्र येण्याची जशी गरज होती, तसेच संसार फोल न मानता आनंदाने तडीस नेण्याचीही आवश्यकता होती. त्यासाठी सांसारिकांनी व्यावहारिक शहाणपण जपत काय केले पाहिजे, हे समर्थांनी दासबोधात अगदी चारकाईने सांगितले आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे 'गुंतवणूक'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमर्थांचे समकालीन संत तुकाराम महाराजांनीही म्हणून ठेवले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी ॥\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणजेच संसारासाठी धन मिळवावे, पण ते खर्चताना फक्त स्वतःचा, कुटुंबाचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविचार करू नये, असा उपदेश संतांनी केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदासबोधात समर्थांनी गुंतवणूक या विषयावर जो उपदेश केला आहे, तो एकत्रित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वरूपात अर्थासहित मांडणार विनायक कुळकर्णी लिखित 'समर्थ रामदास रचित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदासबोधातील गुंतवणूक बोध' हे पुस्तक सर्वाना मार्गदर्शक ठरेल, हे निश्चित !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"57\" data-end=\"130\"\u003e“First manage worldly affairs properly, then take up spiritual wisdom.”\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"132\" data-end=\"487\"\u003eThis is the clear teaching of \u003cstrong data-start=\"162\" data-end=\"180\"\u003eSamarth Ramdas\u003c\/strong\u003e. Ordinary people should first attend to their worldly responsibilities carefully, and even while doing so, keep in mind the higher purpose of spiritual reflection. In his text \u003cem data-start=\"357\" data-end=\"366\"\u003eDasbodh\u003c\/em\u003e, Samarth Ramdas provides precise guidance on what makes life meaningful—a guidance that remains invaluable even today.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"489\" data-end=\"871\"\u003eAt that time, society was terrified and troubled by political and social crises, creating a great need for divine contemplation and spiritual unity. At the same time, people needed to face worldly life with courage and joy, without being overwhelmed by it. To achieve this, Samarth Ramdas advised practical wisdom for everyday life. One key topic he emphasized was \u003cstrong data-start=\"854\" data-end=\"868\"\u003einvestment\u003c\/strong\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"873\" data-end=\"955\"\u003eSamarth’s contemporary saint, \u003cstrong data-start=\"903\" data-end=\"922\"\u003eTukaram Maharaj\u003c\/strong\u003e, also expressed similar views:\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"957\" data-end=\"1012\"\u003e\u003cem data-start=\"957\" data-end=\"1010\"\u003e“Jodoniyā dhan uttam vevārē, udās vichārē vec karī”\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1014\" data-end=\"1149\"\u003eThis means one should earn wealth for worldly life, but while spending it, the focus should not be merely on oneself or one’s family.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1151\" data-end=\"1409\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe teaching on investment given by Samarth in \u003cem data-start=\"1198\" data-end=\"1207\"\u003eDasbodh\u003c\/em\u003e has been thoughtfully compiled and explained with context by Vinayak Kulkarni in his book \u003cstrong data-start=\"1298\" data-end=\"1353\"\u003e“Samarth Ramdas Rachit Dasbodhātīl Guntavanūk Bodh”\u003c\/strong\u003e. This book will serve as a valuable guide for everyone\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851701379,"sku":"BK00986","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Samarth_Ramdas_Front.jpg?v=1763632781"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/collections\/marathi.oembed?page=11","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}