{"title":"कादंबरी","description":"","products":[{"product_id":"kahat-kabir","title":"कहत कबीर","description":"\u003cp\u003eअर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांतून करणारे कवीहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत. मुस्लिम कुटुंबात वाढलेले कबीर रामनामात इतके दंग होते की, त्यांनी विणलेले वस्त्रही त्यांच्या भक्तिरंगात रंगून जात असे. कबीरदासांच्या आयुष्यातील घटनांचा आधार घेऊन लिहिलेली ही भावपूर्ण चरित्रात्मक कादंबरी कबीरांच्या संतत्वापर्यंतचा प्रवास चित्रित करते. त्याचबरोबर धर्माधर्मातील भेदभाव नष्ट करण्यासाठी कबीरांनी केलेल्या प्रयत्नांचा वेधही या चरित्रात्मक कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824405635,"sku":"BK01079","price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kahat_Kabeer_-_Front_Cover.jpg?v=1759387538"},{"product_id":"marco-pollo","title":"मार्को पोलो","description":"\u003cp\u003eही कथा आहे मार्को पोलो या प्रवाशाची, ज्या काळात प्रवास ही कल्पनाच मुळात साहसाच्या कक्षेत येत होती. व्यापार आणि प्रवास करताना त्याने अनेक संकटांना आणि कठीण आव्हानांना तोंड दिले. अनेक वाहनांचा, साधनांचा उपयोग करून त्याने रस्ते, वाळवंट आणि समुद्र यांतूनही प्रवास पूर्ण केला. व्हेनिससारख्या युरोपीय शहरातून बीजिंग, नानकिंग, जावा, सुमात्रा, मलाया, व्हिएतनाम, सिलोन करत त्याने भारतालाही भेट दिली. हजारो मैलांचा प्रवास करताना हा साहसी वीर एक आश्चर्यकारक जीवन जगला. त्याच्या या प्रवासाचीच ही कथा. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांची एकमेकांशी ओळख करून देणाऱ्या मार्को पोलो या साहसी प्रवाशामुळे युरोपला एका नव्या जगाचा परिचय झाला. विविध प्रदेशात फिरताना त्याने अनेक भाषा आत्मसात केल्या. मार्को पोलोच्या प्रवासातील अद्भुत घटना, रोमांचक प्रसंग, त्या काळातील लढाया, राज्यांची आणि राज्यकर्त्यांची वर्णने वाचण्यासाठी, त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825880195,"sku":"BK01017","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Book_Cover_Marco_Polo__Front.jpg?v=1763528577"},{"product_id":"sadebara-lakhanchi-khandani-sattasangharsha","title":"सदेबारा लाखणची खांडणी (सत्संगर्ष)","description":"\u003cp\u003eसंजय सुखटणकर लिखित 'साडेबारा लाखांची खंडणी' ही कादंबरी कॉर्पोरेट जगतातील सत्य घटनांवर आधारित आहे! कंपनीचा पर्सनल मॅनेजर हा कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यांतून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची माहिती मिळते. कादंबरीत एक रंजकता असूनही सत्य घटनांवर ती आधारित असल्याने तिचे संदर्भ आजच्या स्थितीतही लागू होतात.  इ.स. १९८० च्या दशकात कामगार चळवळीत राजकारणी आणि सामाजिक अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला आणि कामगार संघटना आक्रमक झाल्या. त्यांच्याबरोबर काम करणे व्यवस्थापनासाठी अत्यंत अवघड बनले. तो संघर्ष कसा होता? याचे वर्णन यात वाचायला मिळते. एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यांतून 'शह-काटशह'चा खेळ वाचकाला स्तब्ध करतो. कॉर्पोरेट विश्वाची ओळख करून देताना या क्षेत्रातील अधिकाऱ्याच्या भाषेत कादंबरी लिहिली असल्याने तिचे कथानक वाचकाला भावते. सहज आणि ओघवत्या शैलीतील कादंबरीचे कथानक वाचकांच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717854027907,"sku":"BK00880","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00880.jpg?v=1763616934"},{"product_id":"shunya","title":"शून्य","description":"\u003cp\u003eकेरळच्या एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला 'शून्य' म्हणतो, झिरो. पण तो नक्की कोण आहे? एक वेडा माणूस? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लफंगा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष? सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या मागच्या अंगणातील छोट्या झोपडीत राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मनमोहक संगीत निर्माण करते. कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला त्याच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून 'शून्य' एकाएकी नाहीसा होतो.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879947395,"sku":"BK00695","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Shunya_-_Front_Cover.jpg?v=1759388082"},{"product_id":"chigur","title":"Chigur","description":"\u003cp\u003eकिल्लारी परिसरातील एका लहानशा खेड्याच्या पार्श्वभूमीवर, एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारा भूकंपाचा अनुभव रेखाटणारी कादंबरी\u003cbr\u003eगावातील लहान-मोठी माणसे, त्यांचे रोजचे जगणे; आणि भूकंपामुळे काही क्षणांत बदलून गेलेले त्यांचे जगणे, भितीवर मात करत पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करण्याचा लहानमोठ्या सर्व गावकऱ्यांचा हा प्रवास, असा वेगळाच जीवनानुभव मुलाच्या नजरेतून आणि त्याच्याच भाषेतून\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"60\" data-end=\"226\"\u003eA novel set against the backdrop of a small village in the \u003cstrong data-start=\"119\" data-end=\"137\"\u003eKillari region\u003c\/strong\u003e, portraying the harrowing experience of an earthquake through the eyes of a young boy.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"228\" data-end=\"590\"\u003eIt captures the lives of the villagers—their daily routines, the sudden upheaval caused by the earthquake, and how, despite the fear, they gradually begin to rebuild their lives with renewed hope. This journey of the entire village, both young and old, is presented as a unique life experience, seen through the perspective and in the words of the boy himself.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885426139267,"sku":"BK00668","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00668-1.jpg?v=1763722437"},{"product_id":"kahihi-hou-shakata","title":"Kahihi Hou Shakata","description":"\u003cp\u003eअपयशाची आवर्तनं आणि त्यातून आलेले निराशेचे भोवरे यांतून  तरून गेल्या नंतर,  यशांच्या विविध शिखरां पर्यंत झालेल्या कोणा एकाच्या खडतर प्रवासाची ही सुरस गाथा आहे. शालांत परिक्षेची अटक ओलांडताना धडपडलेल्याला नायकाला पुढे  आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यावृत्त्या प्राप्त होणं, अशुद्ध भाषेचा ठपका मिरवणाऱ्या त्याच्या हातून राज्य पुरस्कार प्राप्त साहित्य निर्मिती होणं,अशा कादंबरीतच शोभणाऱ्या पण खऱ्याखुऱ्या घटनांचं हे प्रांजळ निवेदन म्हणजे ही आत्मचारित्रात्मक कादंबरी होय. \u003cbr\u003eमुळातून स्वतःची घडण करणाऱ्या आणि स्वतःतला आशावाद टिकवून ठेवणाऱ्या माणसाची ही एक वाचनीय गोष्ट आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46307646603395,"sku":"BK00981","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/FC_KahihiHouSakate.jpg?v=1766820126"},{"product_id":"sati","title":"Sati","description":"\u003cp\u003e‘सती: संघर्ष तिच्या अस्तित्वाचा' या कादंबरीत कादंबरीकार दीपा गायतोंडे यांनी सतीप्रथेची समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  सतीप्रथेमागील सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक पैलू उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिकेने या कादंबरीत केला आहे. १९८७ साली ‘राज कुंवर’ ही युवती सती गेल्यावर झालेल्या चर्चा ऐकल्यानंतर या कादंबरीचं बीज लेखिकेच्या मनात पडलं. त्यानंतर अनेक वर्षांनी सती प्रथेचा सांगोपांग अभ्यास करून लेखिकेने ही कादंबरी रचली आहे.  या कादंबरीतला काळ एकोणिसाव्या शतकातला असून तत्कालीन जीवनाचं कसदार चित्रण लेखिकेनं यात केलं आहे.  ‘उमा’ या पात्राच्या नजरेतून कथन करण्यात आलेली ही कादंबरी वाचनीय असून वास्तवाचा दाहक आविष्कार करणारी आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe novel \u003c\/span\u003e\u003cspan\u003eSati: Sangharsh Tichya Astitvacha\u003c\/span\u003e\u003cspan\u003e by Deepa Gayatonde attempts to explore and expose the problem of the Sati practice. The author has admirably highlighted the social, cultural, and psychological aspects behind this practice. The seed for this novel was planted in the author’s mind in 1987, after hearing discussions about the young woman \u003c\/span\u003e\u003cspan\u003eRaj Kunwar\u003c\/span\u003e\u003cspan\u003e who had committed Sati. Many years later, after a thorough study of the Sati tradition, the author wrote this novel. The story is set in the 19th century, and the author provides a vivid portrayal of life during that period. Narrated from the perspective of the character \u003c\/span\u003e\u003cspan\u003eUma\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, this novel is highly readable and presents a stark and powerful depiction of reality.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46335228149891,"sku":"BK00683","price":349.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sati-Frontcover.jpg?v=1767610650"},{"product_id":"jaab-ek-nirbhay-aawaj","title":"Jaab : Ek Nirbhay Aawaj","description":"\u003cp\u003e‘जाब’ ही कादंबरी समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांचे वास्तववादी जीवन मांडते; तसेच उच्चभ्रू समाजातील कौटुंबिक ताणतणाव आणि मूल्यसंघर्षही उघड करते. जागतिकीकरणाच्या काळातही टिकून असलेला सामाजिक भेदभाव, जातीय विषमता आणि त्याविरोधातील मानवी मूल्यांची लढाई कादंबरीत ठळकपणे प्रतिबिंबित होते. प्रा. वसंत कांबळे, नयना, निरंजन, राधामावशी, पटवर्धन दाम्पत्य आदी पात्रांमधून संघर्ष, त्याग, माणुसकी आणि सामाजिक भान यांचे विविध पैलू उलगडले आहेत. अवयवदान, वृद्धाश्रमातील समस्या, परदेशस्थ अपत्यांचे पालकांकडे दुर्लक्ष, भ्रष्टाचार, दारिद्र्य, शिक्षणातील असमानता यांसारख्या ज्वलंत विषयांचा संवेदनशीलपणे ऊहापोह केला आहे. कादंबरी केवळ कथानकापुरती मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारी, मानवता, समता आणि सलोखा यांचा आग्रह धरत वाचकांना आत्मपरीक्षण व परिवर्तनासाठी प्रेरित करते.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46352172613763,"sku":"BK00980","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Jaab_Cover_a.jpg?v=1768283436"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/collections\/novel.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}