{"product_id":"apatya-janmache-samajbhan","title":"अपात्य जन्माचे समाजभान","description":"\u003cp\u003eस्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ म्हणून डॉ. किशोर अतनूरकर प्रसिद्ध आहेत. रुग्णांशी संवाद साधण्याच्या कौशल्यामुळे डॉ. अतनूरकरांकडे अनुभवांचा मोठा साठा आहे. त्यामुळे ते अपत्यजन्माकडे केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया या दृष्टिकोनातून बघत नाहीत. 'अपत्यजन्म ही एक गांभीर्याने घेण्याची बाब आहे,' या त्यांच्या विचारातून 'अपत्यजन्माचे समाजभान' या पुस्तकाचा जन्म झाला आहे! अपत्यजन्माच्या वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, भौगोलिक, कायदेविषयक आणि रूढी-परंपराविषयक पैलूंचाही विचार लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. गर्भधारणा ही पूर्वनियोजितच असावी, असा डॉ. अतनूरकर यांचा आग्रह आहे. गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या बाबतीत जनमानसावर ज्या पारंपरिक प्रथांचा प्रभाव आहे, त्यातील कोणत्या प्रथा सोडल्या पाहिजेत, याचे तर्कशुद्ध विश्लेषण लेखकाने केले आहे. नॉर्मल प्रसूती की सिझेरियन आणि पुरुष नसबंदीबद्दलचे समाजभान हा कशा प्रकारे एक चिंतेचा विषय आहे; अशा विविध मुद्द्यांना पुस्तकात स्पर्श करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853634691,"sku":"BK00901","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Apatya_Front_cover.jpg?v=1759378596","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/apatya-janmache-samajbhan","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}