{"product_id":"awakening-your-bliss-marathi-paperback","title":"आपल्या आनंदाला जागृत करा (मराठी - पेपरबॅक)","description":"\u003cp\u003eआनंद म्हणजे नेमकं काय, हे शोधताना कस्तुरीमृगाची गोष्ट आठवते. स्वतःच्या नाभीमध्ये दडलेल्या कस्तुरीच्या सुगंधाच्या शोधात तो सगळीकडे सैरावैरा पळतो. पण त्याला काही केल्या त्या सुगंधाचे उगमस्थान सापडत नाही. म्हणतात ना, \"तुझे आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी!\" आज प्रत्येकाला काय हवे आहे, याचे निश्चित उत्तर देता येते का? उत्तरादाखल आपण काही भौतिक गोष्टींची यादी वाचली, आणि त्या मिळाल्या तरी आपण खरेच कायमस्वरूपी आनंदी राहू शकू, याची खात्री वाटते का? याचे उत्तर नकारार्थी येते. कारण केवळ उपभोगामध्ये काळ व्यतीत करणे यात मनुष्यजन्माचे सार्थक नाही. मनाला कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल, जीव आनंदस्वरूप कसा होईल, हे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच सर्वप्रथम आनंदाचे खरे स्वरूप समजून घेतले पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717854388355,"sku":"BK00864","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Awakening_M_-_Front_cover.jpg?v=1759378597","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/awakening-your-bliss-marathi-paperback","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}