{"product_id":"gagabhattkrut-shivrajabhishekprayog","title":"Gagabhattkrut Shivrajabhishekprayog","description":"\u003cp\u003eछत्रपती शिवाजीमहाराज हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. शिवाजीमहाराज आणि त्यांचा राजाभिषेक हा आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय आहे. शिवाजीमहाराजांच्या अफाट पराक्रमामुळे आनंदनाम संवत्सर, शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध १३, ६ जून १६७४ या आनंदमय दिवशी हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. रायगडावर वेदमंत्रांच्या पवित्र घोषात झालेल्या राजाभिषेकविधीने शिवाजीराजे 'छत्रपती सिंहासनाधीश्वर महाराज' म्हणून अजरामर झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशतकानुशतके आपल्याच मायभूमीवर गुलामीचे जीवन जगणाऱ्या प्रजेसाठी ही स्वातंत्र्याची पहाट होती. हा राजाभिषेक म्हणजे आपल्या भारतभूमीवरील फार मोठी ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, राजनैतिक सांस्कृतिक अशी क्रांतिकारी घटना होती. सुवर्णाक्षरात नमूद करण्याजोग्या युगप्रवर्तक अशा या शिवराजाभिषेकविधीसाठी काशीस्थित प्रकाण्ड्पण्डित गागाभट्ट यांनी श्रुति, स्मृति, धर्म, पुराण, राजनीती विषयक ग्रंथांमधील विश्वकल्याणात्मक परंपरांवर आधारित अद्वितीय असा प्रयोगग्रंथ रचला. आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत 'गागाभट्टकृत-शिवराजाभिषेकप्रयोगः पुस्तकात अभिषेक, राजाभिषेक या संकल्पनांचा विकास, सात-आठ दिवस चाललेल्या अभिषेकविधीतील महत्त्वपूर्ण असे गौण व मुख्य विधी, त्यांतील आशयघन मंत्र यांवर पूर्णतः प्रकाश टाकणारा उपोद्घात, मूळ संस्कृत प्रयोगग्रंथाचे चिकित्सक संपादन आणि मराठी अनुवाद सादर केला आहे. तसेच जुन्या शकावली, बखरी इत्यादीतील अधिकृत तपशीलही दिल्यामुळे या संस्कृत ग्रंथाला ऐतिहासिक बाजही लाभून, शिवराजाभिषेकविषयक समग्र माहिती इथे एकत्रित स्वरूपात दिली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47526180290691,"sku":"BK01306","price":1500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Gagabhattkrut_Shivrajabhishekprayog_front_cover_page.png?v=1783677773","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/gagabhattkrut-shivrajabhishekprayog","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}