{"product_id":"genome-te-om","title":"Genome te OM","description":"\u003cp\u003eआपलं मूळ, आपली उत्पत्ती, आपली ओळख, आपली उद्दिष्ट, उत्क्रांतीतून सतत बदलत जाणारं मानवतेचं भविष्य, अशा आयुष्यातील प्रचंड गूढ वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर इथंच मिळाली तर? 'जिनोम ते ॐ' हा असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे, जो विश्वाच्या उत्पत्तीचा संबंध, स्वयम आणि अंतिम सत्य, यांच्याशी लावतो. हे प्रेरणादायी पुस्तक, आधुनिक विज्ञानाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जनुकांचं विस्मयकारी जग आणि 'ॐ' चा नाद, यांत खोल झिरपतं. जीवनाच्या आध्यात्मिक साराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वैश्विक 'हम्म' या नादाचा शोध, हे त्याचंच प्रतिबिंब आहे. हे पुस्तक वाचकाला, मृत्युच्या सीमांच्या पलीकडे नेतं. जनुकं, पर्यावरण, चेतना यांच्यातील नाजूक परस्परसंबंधांचा ते शोध घेतं. कृत्रिम बुद्धिमत्तेची आणि जनुकीय अभियांत्रिकीची नैतिक आव्हाने, मानवी मन आणि चित्त यांची रहस्यं उलगडणं, केवळ विचार करण्यापेक्षा अधिक खोलात जाऊन, अंतर्ज्ञान प्राप्त करणं, हे आधुनिक पेच 'जिनोम ते ॐ' व्यक्त करतं. 'जिनोम ते ॐ', हे केवळ वाचनीयच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन, मानवतेच्या भविष्याकडे, ऐक्य, शांती आणि वैश्विक कल्याण साधण्याकडे नेणारं लिखाण आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47413074591875,"sku":"BK01071","price":599.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Genometoomcover_Front.jpg?v=1782995399","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/genome-te-om","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}