{"product_id":"haripath-manthan","title":"हरिपथ मंथन","description":"\u003cp\u003eहरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे. त्याच्या प्रत्येक शब्दातून अनेक अर्थ एकाच वेळी प्रकट होतात. हरिपाठ हा जीवनाला आणि आनंदाला समृद्ध करणारा साधना मार्ग आहे. हरिपाठ सोपा आहे, सर्वसामान्य लोकांसाठी आहे, परंतु हरिपाठ समजण्यासाठी त्याचा अभ्यास आवश्यक आहे. त्यातील सूत्रे समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवे, असे हे पुस्तक सांगते. हरिपाठ एका विचारसरणीचे नाव आहे. सिद्धांतांचा समूह म्हणजे हरिपाठ. हरिपाठ मंथन या पुस्तकात मोजक्या सिद्धांतांवर चिंतन केले आहे. अभ्यासूंना, विचारवंतांना हे पुस्तक दिशा देते, मार्गदर्शन करते. हरिपाठाची रचना दिसायला सहज, सोपी आहे परंतु समजायला कठीण आहे. सहज आणि सोप्या निरूपणामुळे हरिपाठातील अभंग समजून घेणे सहज शक्य होते. ओघवती भाषा, हरिपाठातील अभंग, भगवद्गीतेतील श्लोकांचा आधार आणि 'सार असार विचार' ही ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली हरिपाठाची व्याख्या या सर्वांचा आधार घेत लेखकाने हरिपाठ समजावून सांगितला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717854257283,"sku":"BK00871","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00871.jpg?v=1763615946","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/haripath-manthan","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}