{"product_id":"jaab-ek-nirbhay-aawaj","title":"Jaab : Ek Nirbhay Aawaj","description":"\u003cp\u003e‘जाब’ ही कादंबरी समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांचे वास्तववादी जीवन मांडते; तसेच उच्चभ्रू समाजातील कौटुंबिक ताणतणाव आणि मूल्यसंघर्षही उघड करते. जागतिकीकरणाच्या काळातही टिकून असलेला सामाजिक भेदभाव, जातीय विषमता आणि त्याविरोधातील मानवी मूल्यांची लढाई कादंबरीत ठळकपणे प्रतिबिंबित होते. प्रा. वसंत कांबळे, नयना, निरंजन, राधामावशी, पटवर्धन दाम्पत्य आदी पात्रांमधून संघर्ष, त्याग, माणुसकी आणि सामाजिक भान यांचे विविध पैलू उलगडले आहेत. अवयवदान, वृद्धाश्रमातील समस्या, परदेशस्थ अपत्यांचे पालकांकडे दुर्लक्ष, भ्रष्टाचार, दारिद्र्य, शिक्षणातील असमानता यांसारख्या ज्वलंत विषयांचा संवेदनशीलपणे ऊहापोह केला आहे. कादंबरी केवळ कथानकापुरती मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारी, मानवता, समता आणि सलोखा यांचा आग्रह धरत वाचकांना आत्मपरीक्षण व परिवर्तनासाठी प्रेरित करते.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46352172613763,"sku":"BK00980","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Jaab_Cover_a.jpg?v=1768283436","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/jaab-ek-nirbhay-aawaj","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}