{"product_id":"karmayog","title":"कर्मयोग","description":"\u003cp\u003eस्वामी विवेकानंदांची उत्कट इच्छा होती की भारताने आपले पूर्वीचे गौरवाचे स्थान पुनः प्राप्त करावे.  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते नेहमी आपल्या व्याख्यानांतून 'कर्मयोगा'चे महत्त्व सांगत असत. हे पुस्तक कर्मयोगावर  १८९५-९६ च्या हिवाळ्यात न्यू यॉर्क शहरात दिलेल्या त्यांच्या प्रसिद्ध व्याख्यानांचा संग्रह आहे.  मनुष्याला निष्क्रिय करणाऱ्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे. 'ऋग्वेदा'तील 'आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च' या श्लोकाचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी आत्मज्ञान आणि लोकहित हे दोन्ही साधावे, असे स्वामी विवेकानंदांना अगदी मनापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे.  त्यांचे स्वतःचे जीवन म्हणजे या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण; म्हणूनच त्यांच्या शब्दांत अपार शक्ती साठलेली आहे. स्वामी विवेकानंदांची मार्गदर्शक ठरणारी दिव्य आणि ओजस्वी वाणी यांचा अनुभव पुस्तकरूपाने वाचकांना मिळणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826240643,"sku":"BK00675","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/KarmaYog_Cover_Marathi_FC.jpg?v=1759387534","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/karmayog","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}