{"product_id":"kasa-huin-ta-hun-mai","title":"# कसा हुइन ता हुन मै","description":"\u003cp\u003eग्रामीण जीवनाविषयी सर्वांच्या मनात नेहमीच कुतूहल असते. त्यातही ग्रामीण भागातील इतर कोणापेक्षाही बाईचे जीवन कसे चालते हे विशेषत्वाने जाणून घेण्याची सर्वांनाच आवड असते. ग्रामीण कष्टकरी महिलेचे जीवन आजही चूल-मूल आणि भाकरी या त्रिकोणातच बंदिस्त आहे. सुनांच्या कामाविषयी बोलताना तर \"#कसं_हुईन_तं_हू_माय\" हे वाक्य ग्रामीण भागातील सासूबाई दिवसातून दहा वेळा उच्चारतात. या सुनेमुळे माझ्या मुलाचे कसे होईल - असा याचा सरळ साधा अर्थ. आपल्या मुलाची काळजी करताना ते आई-वडील, घरदार सगळं सोडून आलेल्या सुनेची अजिबातच काळजी करत नाहीत. या पुस्तकात अशाच जीवन जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचे जीवन डोळ्यासमोर उभे राहतेच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील जीवनाचा पट उलगडून दाखवणारे हे पुस्तक वाचण्यासारखेच आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851635843,"sku":"BK00987","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kasa_Huin_Tan_Hu_Mai..._1.jpg?v=1759423863","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/kasa-huin-ta-hun-mai","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}