{"product_id":"marco-pollo","title":"मार्को पोलो","description":"\u003cp\u003eही कथा आहे मार्को पोलो या प्रवाशाची, ज्या काळात प्रवास ही कल्पनाच मुळात साहसाच्या कक्षेत येत होती. व्यापार आणि प्रवास करताना त्याने अनेक संकटांना आणि कठीण आव्हानांना तोंड दिले. अनेक वाहनांचा, साधनांचा उपयोग करून त्याने रस्ते, वाळवंट आणि समुद्र यांतूनही प्रवास पूर्ण केला. व्हेनिससारख्या युरोपीय शहरातून बीजिंग, नानकिंग, जावा, सुमात्रा, मलाया, व्हिएतनाम, सिलोन करत त्याने भारतालाही भेट दिली. हजारो मैलांचा प्रवास करताना हा साहसी वीर एक आश्चर्यकारक जीवन जगला. त्याच्या या प्रवासाचीच ही कथा. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांची एकमेकांशी ओळख करून देणाऱ्या मार्को पोलो या साहसी प्रवाशामुळे युरोपला एका नव्या जगाचा परिचय झाला. विविध प्रदेशात फिरताना त्याने अनेक भाषा आत्मसात केल्या. मार्को पोलोच्या प्रवासातील अद्भुत घटना, रोमांचक प्रसंग, त्या काळातील लढाया, राज्यांची आणि राज्यकर्त्यांची वर्णने वाचण्यासाठी, त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825880195,"sku":"BK01017","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Book_Cover_Marco_Polo__Front.jpg?v=1763528577","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/marco-pollo","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}