{"product_id":"nisargapremi-jane-goodall","title":"निसर्गप्रेमी जेन गुडॉल","description":"\u003cp\u003eजेन गुडॉल, एका सर्वसामान्य घरातील तरुणीला एक असाधारण, पण फार मोठं स्वप्न पडलं होतं; ते म्हणजे केनियात जाऊन चिंपांझींचा अभ्यास करण्याचं! औपचारिक संशोधन क्षेत्राचा अनुभव नसणं, भाषा आणि संस्कृतीच्या मर्यादा आणि स्त्रीत्वाचा शिक्का; या सर्वांवर मात करून आपल्या उराशी जपलेल्या या अवघड ध्येयाचा पाठलाग करणारी जेन ही नंतर अनेकांचा आदर्श बनली. मानवाच्याच नव्हे; तर सर्व जैवघटकांच्या प्राथमिक गरजा निसर्गच पूर्ण करत असतो. निसर्गातील विविध घटकांच्या अस्तित्वावर मानवी जीवन अवलंबून आहे. यांपैकी एका घटकाचंही संतुलन बिघडलं तर मानवजातीचं आयुष्यच धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच सहकार्य आणि सहजीवन महत्त्वाचं ठरतं. हेच जाणून जेनने चिंपांझींच्या संरक्षण, संवर्धन आणि संगोपनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या अज्ञात आयुष्यावर तिने प्रथमच प्रकाश टाकला. जगभरच चिंपांझींबाबत तिने जागरूकता निर्माण केली. त्यासाठी संशोधन व अभ्यास केंद्राची निर्मिती केली. आपली पृथ्वी सुंदर आहे आणि प्रत्येक प्रजातीसाठी ती तशीच असायला हवी, हेच या चरित्रातून व्यक्त होतं.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717854126211,"sku":"BK00878","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00878.jpg?v=1763616433","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/nisargapremi-jane-goodall","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}