{"product_id":"paryavaran-shlokmala","title":"पर्यावरण श्लोकमाला","description":"\u003cp\u003eबोधिसत्व खंडेराव यांनी सहा वर्षाच्या वयात सामाजिक वनीकरण कार्याची सुरुवात केली. विविध प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, स्वयं सहायता गट, ग्रामपंचायती, उन्हाळी शिबिरे, एनसीसी व एनएसएस शिबिरे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी जाऊन पाचशेहून अधिक सामाजिक वनीकरण कार्यशाळांचे आयोजन केले. बोधिसत्व यांनी सामूहिक वृक्षारोपणाच्या रॅप्ड सीडबॉल पद्धत, ग्रीन पाउच पद्धत, पर्ण-बीज पद्धत, मॅजिक सॅक्स पद्धत अशा चार नवीन पद्धती विकसित केल्या. या पद्धतींद्वारे हजारो विद्यार्थ्यांसोबत वनीकरणचा प्रयत्न केला.  त्यांचे नाव 'सर्वात कमी वयाचे पर्यावरण कार्यकर्ता' 'द यंगेस्ट एन्व्हायरमेंटल अँक्टिव्हिस्ट' म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये पर्यावरण आणि त्याच्या रक्षणाविषयी उत्तम आणि महत्त्वाची माहिती आहे. वृक्षांचे औषधी गुण आणि त्यांचे महत्त्वही ग्रंथांमध्ये आहे. अशाच प्रकारच्या श्लोकांचा शोध बोधिसत्व यांनी लावला. याच श्लोकांचा परिचय आपणास या पुस्तकात वाचायला मिळेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717854191747,"sku":"BK00877","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00877_1.jpg?v=1763616244","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/paryavaran-shlokmala","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}