{"product_id":"santulan-kriyayog-demi-size","title":"संतुलन क्रियायोग (डेमी साइज़)","description":"\u003cp\u003e'संतुलन क्रियायोग' हा सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येण्यासारखा एक सोपा योगाभ्यास आहे. 'योग' शब्दाचा अर्थ आहे जोडणे-एकात्म करणे, म्हणून योगाच्या अभ्यासाने शरीर व मन तसेच मेंदूच्या डाव्या व उजव्या बाजूच्या कार्यात समन्वय स्थापित होतो. 'क्रिया' हा शब्द जीवनातील मुख्य क्रिया श्वास व मन या दोहोंशी निगडित आहे. म्हणून क्रियायोगाच्या अभ्यासाने आसन व प्राणायाम या दोघांचे एकत्रित परिणाम मिळतात. संतुलन क्रियायोगाच्या अभ्यासाने शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर परिणाम साधले जातात. अनेक वर्षांच्या सखोल संशोधनाचा परिपाक आहे 'संतुलन क्रियायोग'. अनेक रुग्णांवरही याचे उत्कृष्ट परिणाम मिळालेले आहेत. 'संतुलन क्रियायोग' शिकणे सोपे असून त्यात आसने, प्राणायाम व क्रियांचा अनोखा संगम आहे. याच्या अभ्यासाने शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर परिणाम मिळतात. आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये व जगभरातील अनेक लोक याचा नियमित अभ्यास करतात. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा, त्वचारोग, मानसिक ताण, निद्रानाश, नैराश्य व इतर अनेक गंभीर समस्यांवर अत्यंत फायदेशीर सिद्ध झालेली पद्धती म्हणजे 'संतुलन क्रियायोग-स्काय'.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717852618883,"sku":"BK00948","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Santulan_Kriyayog_Marathi_cover_FC.jpg?v=1759388048","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/santulan-kriyayog-demi-size","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}