{"product_id":"shunya","title":"शून्य","description":"\u003cp\u003eकेरळच्या एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला 'शून्य' म्हणतो, झिरो. पण तो नक्की कोण आहे? एक वेडा माणूस? काळी जादू करणारा मांत्रिक? कोणी एक लफंगा? की एक अवधूत, एक साक्षात्कारी महापुरुष? सामी नावाने ओळखली जाणारी ही व्यक्ती एका स्थानिक ताडी विक्री केंद्राच्या मागच्या अंगणातील छोट्या झोपडीत राहू लागते. तिथे ती व्यक्ती बोधकथा सांगते, आशीर्वाद देते, शिव्याशाप देते, काळ्या चहाचे असंख्य पेले रिचवते आणि सर्वार्थाने मुक्त असे आयुष्य जगते. क्वचित प्रसंगी आपल्या बांबूच्या जुन्या बासरीतून मनमोहक संगीत निर्माण करते. कालांतराने, ज्या गूढ प्रकारे तो अवतरला त्याच पद्धतीने एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून 'शून्य' एकाएकी नाहीसा होतो.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879947395,"sku":"BK00695","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Shunya_-_Front_Cover.jpg?v=1759388082","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/shunya","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}