{"product_id":"vidyarthyansathi-ved","title":"Vidyarthyansathi Ved","description":"\u003cp\u003eआजच्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श नाही, मूल्ये कशी जपावीत, हे त्यांना माहीत नाही, अशी ओरड नेहमी केली जाते. पण पुस्तके, ग्रंथ हे विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक होऊ शकतात, हे पालकांच्या आणि मुलांच्या मनावर बिंबवणे जास्त आवश्यक आहे. कारण इतके महान ग्रंथ आपल्या आजूबाजूला आहेत, ते जर मुलांनी समजून घेतले तर त्यांच्यावर वेगळे संस्कार करण्याची गरजच भासणार नाही. या उद्देशाने रेणू दांडेकर या प्रसिद्ध लेखिकेने प्राचीन ज्ञानवारशातील काही ग्रंथांचे विद्यर्थ्यांसाठी सोपीकरण करायचे ठरवले आणि त्यातील एक भाग म्हणजे मुलांसाठी वेद हे पुस्तक. वेद हे सर्वाधिक जुने मौखिक साहित्य समजले जाते. वेदांची निर्मिती कुणा एका ऋषींची नसून ती पिढ्यान पिढ्या चालत आलेली सांस्कृतिक देणगी आहे. सात्त्विक जीवन जगण्याठीची सूत्रे वेद आपल्याला सांगतात. निसर्गाशी एकरूपता साधल्यास निसर्ग आपली काळजी घेईल हे ऋषींना माहिती होते. म्हणून निसर्गातील प्रतिकांना त्यांनी दैवत्वाचा दर्जा दिला. त्यांची पूजा, त्यांचे गुणगान आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे यज्ञयाग अशा विविध गोष्टी वेदांमध्ये समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना जुने ते टाकाऊ न वाटता जुन्यातील चांगले ते वेचता येण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये विकसित व्हावी, यासाठी मुलांसाठी वेद हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47312664854659,"sku":"BK01064","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/VedVidyarthyasnsathi_Front.jpg?v=1781938188","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/vidyarthyansathi-ved","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}