{"product_id":"yoga-also-for-the-godless","title":"निरीश्वरवाद्यांसाठीही योग","description":"\u003cp\u003eयोगशास्त्र भारतात उदयाला आले असले तरी, योगाभ्यास करण्यासाठी हिंदू असणे आवश्यक नाही.  हे योगाभ्यासकांसाठी समाधानाची बाब आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री एम यांनी 'योगा ऑल्सो फॉर गॉडलेस' या पुस्तकातून हेच अधोरेखित केले आहे.  कोणत्याही धर्माचे असणे किंवा देवावर विश्वास नसणे या गोष्टी कोणालाही योगी होण्यात अडथळा आणू शकत नाहीत. नास्तिकांसाठीही उपयुक्त ठरणारे योगशास्त्र म्हणजे हे पुस्तक! योगाभ्यासाच्या सरावातून आस्तिक प्रमाणेच नास्तिकही परमानंद व आत्मज्ञानाच्या शिखरापर्यंत पोहचू शकतो, हेच यात नमूद केले आहे. पतंजलींच्या योगसूत्रांवर श्री एम यांनी केलेल्या सखोल अभ्यासावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सिद्धांत व प्रत्यक्ष सराव यांविषयी क्रमवार माहिती देणारी मार्गदर्शिकाच आहे. श्वास, शरीर व आसने या अत्यंत गुंतागुंतीच्या कल्पना श्री एम यांनी स्पष्ट व सुबोध भाषेत आणि योगासनांच्या छायाचित्रांच्या मदतीने संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगितल्या आहेत. योगाभ्यास करणार्‍यांबरोबरच नवोदितांसाठीही हे उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717825388675,"sku":"BK01035","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Yoga_Cover_front.jpg?v=1759387891","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/yoga-also-for-the-godless","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}