{"product_id":"yogiyancha-rana","title":"योगियांचा राणा","description":"\u003cp\u003eशेगावचे संत गजानन महाराज हे भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले अवलिया होते. ते शेगावातील एका सद्गृहस्थाला उकिरड्यावर टाकलेले अन्न आणि गढूळ पाणी पिताना दिसले.  चांगले अन्न व पाणी त्यांच्यासमोर ठेवले असताही, निर्मोही वृत्तीने त्यांनी सर्व अन्न एकत्र करून खाल्ले आणि गढूळ व स्वच्छ पाणी असा भेद आमच्या ठायी नाही, सारे काही एकच आहे, असा अद्वैताचा बोध त्यांनी केला.  त्यांनी लोककल्याणासाठी केलेले असंख्य चमत्कार आणि त्यांनी दिलेली शिकवण, तसेच त्यांच्या भक्तांना आलेले प्रत्यक्ष अनुभव या जीवनचरित्रात समाविष्ट केले आहेत. देहत्याग केल्यानंतरही गजानन महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गजानन महाराज संस्थानचे कार्यही या चरित्रग्रंथात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717851177091,"sku":"BK00998","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Yogiyancha_Rana_-_Front.jpg?v=1759387893","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/yogiyancha-rana","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}