{"product_id":"chhatrapati-sambhaji-maharajanchi-rajniti","title":"Chhatrapati Sambhaji Maharajanchi Rajniti","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\"राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य\"\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ध्येयाने प्रेरित होऊन छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर औरंगजेब पाच लक्ष मुघलांची फौज घेऊन संपूर्ण हिंदुस्थान हिंदुस्थान जिंकण्याच्या जिंकण्याच्या हेतूने दख्खनमध्ये उतरला. त्याच्याशी अव्याहतपणे सामना करीत मराठ्यांच्या राज्याचे संरक्षण करण्याचे कर्तव्य संभाजी महाराजांनी प्राणपणाने पार पाडले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत राज्याच्या सर्व आघाड्यांवर लक्ष देत प्रजेच्या रक्षणाबरोबर तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांची राजनीती ही वेगवेगळ्या राजनैतिक, प्रशासकीय, आर्थिक, लष्करी अशा पैलूंनी व्यापलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंभाजी महाराजांची राजनीती हा व्यापक विषय असून या विषयावर विस्तृत संशोधनाची आवश्यकता होती. तरुण इतिहास संशोधक डॉ. केदार महादेवराव फाळके यांनी संभाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास करून 'छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ मुख्यतः प्राथमिक साधनांवर आधारलेला आहे संभाजी महाराज Spirit - અથ साधनांवर आधारलेला आहे, संभाजी महाराजांच्या काळातील साधनांची खूप कमी प्रमाणात चिकित्सा झाली आहे. महाराजांच्या कारकीर्दीतील राजकीय घडामोडी आणि युद्धशास्त्रीय घटनांव्यतिरिक्त इतर घटकांचा कमी प्रमाणात अभ्यास झाला आहे संशोधनाच्या दुर्लक्षित झालेल्या  पैलूंचा अभ्यास करण्यावर डॉ. डॉ. फाळके यांनी ग्रंथामध्ये यांनी ग्रंथामध्ये मुख्य भर दिला आहे. या ग्रंथामध्ये प्रामुख्याने संभाजी महाराजांची राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगधंदे, चलनव्यवस्था, वतने आणि इनामे, धार्मिक घोरणे आणि बलिदान अशा विविध घटकांचा समावेश झाला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47526124159107,"sku":"BK01307","price":950.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Chhatrapati_Sambhaji_Maharajanchi_Rajniti_front_cover_page.png?v=1783678032","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/chhatrapati-sambhaji-maharajanchi-rajniti","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}