{"product_id":"druapadi","title":"Druapadi","description":"\u003cp\u003eसंस्कृत परंपरेत किंवा अभिजात काव्यपरंपरेत म्हणू, भारतोत्तर काळात जे स्त्रियांचे वर्ग आढळतात आणि त्यांची ज्या प्रकारची वर्णने केलेली आढळतात, त्यांच्यापेक्षा द्रौपदी अगदी निराळी आहे. ती साधारण नायिका नाही आणि तिचे असाधारण व्यक्तित्व महाभारतकारांनी संपूर्णपणे अनावृत केलेले नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाभारतातली द्रौपदी असाधारण असण्यात तिच्या जन्माचे, नावाचे, व्यक्तित्वाचे आणि चरित्राचे अनेक घटक कार्यरत आहेत. शिवाय त्या घटकांनी भारतीकथेतल्या इतर अनेक लहानसहान तपशिलांशी, घटितांशी आणि व्यक्तींशी संबंध जोडले आहेत. कधी ते पृष्ठस्तरीय आहेत, थेट आणि दृश्य आहेत, पण बहुतेक ते भूमिगत, अंतःस्तरीय आणि सूक्ष्म आहेत. काही अदृश्य आणि संदिग्ध किंवा सूचकही आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैव, वैष्णव आणि शाक्त परंपरांचा समन्वय करत दैवी संकेतांचा, शापांचा आणि वरांचा, गूढाचा आणि अद्भुताचा हात धरत उक्त-अनुक्ताच्या सीमेवर महाभारतातली द्रौपदी उभी आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47748715380867,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/DruapadiFC.png?v=1785504507","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/druapadi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}