{"product_id":"kumaonchi-kanya-mana-radha-bhat","title":"Kumaonchi Kanya Mana : Radha Bhat","description":"\u003cp\u003eउत्तराखंडातलं कुमाऊँ असो की तिथली ही माना असो, वाचता वाचता वाटतं की इथंही कोकणात, विदर्भात, मराठवाड्यात थोड्याफार फरकानं हेच तर अनुभवाला येतं आहे! प्रदेश बदलला, निसर्ग बदलला, थोडे रीतरिवाज बदलले तरी सान्या भारतभर, मुलीबाबतची, स्त्रीबाबतची उपेक्षा आणि अनास्था आहेच! आज तर अस म्हणावस वाटत की, आधी मुलींना जन्माला येण्याची संधी तर द्या आणि त्या जन्मू शकल्या तर त्यानं तर त्यांचं अस्तित्व टिकून उजळत राहाण्यासाठीची संधीही द्या! शहरांपासून दूरच्या अंतर्भागात, विशेषतः मुलींसाठी हा शिक्षणाचा प्रकाश पोचण्यात अनेक अडथळे येतात! असं असलं तरी, अनेकानेक अडसरांनी बंद असलेली जुनी दार आता करकरत, कुरकुरत का होईना हळूहळू किलकिली होऊ लागली आहेता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षणाच्या प्रकाशवाटेवरून चालताना, आत्मनिर्भर होत आत्मसन्मान जपणारी आणि इतर तमाम मुलींना या वाटेकडे घेऊन जाणारी माना आपल्याला ओळखीची वाटते. वेगळ असूनही आपलंसं वाटणं हे या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकीना 'माना' आपली मोठी बहीण वाटू शकेल, असं ही कादंबरी वाचताना माझ्या मनात आलं.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885608001667,"sku":"BK00152","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kumaonchi_Kanya_Mana.jpg?v=1763547034","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/kumaonchi-kanya-mana-radha-bhat","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}