{"product_id":"lakudtodyachya-goshti","title":"Lakudtodyachya Goshti","description":"\u003cp\u003eलाकूडतोड्याच्या या देशोदेशीच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या लाकूडतोड्याचं भावनिक गुणवर्णन करणाऱ्या नाहीत. अनेकदा तो मूर्ख ठरावा इतका वेडेपणा करताना दिसतो आणि त्याचा हा मूर्खपणा या कथा लपवत नाहीत. तो भोळसट आहे, त्याच्याकडे व्यावहारिक ज्ञान नाही, त्यामुळे तो कुणावरही सहज विश्वास ठेवतो. नको तेव्हा नको ते बोलतो. त्याला छक्केपंजे कळत नाहीत आणि मिळालेल्या बक्षिसांचा हुशारीने उपयोग करणंही त्याला अनेकदा जमत नाही. ‘शहाणा मूर्ख’ या जागतिक परिभाषेत चपखल बसेल असा हा त्याचा मूर्खपणा आहे. भारतीय संज्ञा वापरायची झाली, तर तो ‘बालबुद्धी’चा आहे. या पुस्तकातल्या कथा विविध देशांमधल्या कथांवर आधारलेल्या आहेत. नावं भारतीय असली, तरी मूळ गोष्टी विविध देश आणि भाषांमधल्या आहेत; वेगळे प्रदेश, वेगवेगळा भूगोल आणि अनेकविध संस्कृतींचा प्रवास करत आल्या आहेत. लहान आणि मोठे, विद्वान आणि कथाकथनकार अशा सर्वांनाच गुंतवून ठेवेल असं हे पुस्तक आहे. लोककथांमधली कुऱ्हाड आणि जंगल यांच्या अबोल शहाणिवेचा स्वर ऐकण्यासाठी आणि लाकूडतोड्याच्या व्यक्तिरेखेमध्ये दडलेली, आपण माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवणारी, प्रामाणिकपणा आणि भोळसटपणा या दोन ठळक रंगांनी रेखलेली आकृती ओळखण्यासाठी या कथा वाचायलाच हव्यात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"654\" data-start=\"0\"\u003eThese folktales about woodcutters from different countries are distinctive because they do not attempt to glorify the woodcutter emotionally. In many stories, he behaves so foolishly that he may even seem ridiculous, and the tales do not hide this aspect of his character. He is naïve and lacks practical wisdom, which makes him trust others too easily. He often says the wrong things at the wrong time. He does not understand tricks or schemes, and he frequently fails to make wise use of the rewards he receives. His foolishness perfectly fits the global archetype of the “wise fool.” In Indian terms, he possesses a childlike innocence and simplicity.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"899\" data-start=\"656\"\u003eThe stories in this book are based on folktales from various countries. Although the characters bear Indian names, the original tales come from different nations and languages, having traveled through diverse regions, landscapes, and cultures.\u003c\/p\u003e\n\u003cp data-is-only-node=\"\" data-is-last-node=\"\" data-end=\"1323\" data-start=\"901\"\u003eThis book is engaging for readers of all ages—children and adults alike, scholars and storytellers. These stories must be read to hear the quiet wisdom of the axe and the forest that echoes through folklore, and to discover within the woodcutter’s character a lesson on how human beings should live. Drawn in the two vivid shades of honesty and innocence, his character offers timeless insights into life and human nature.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46936334172291,"sku":"BK01066","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Lakudtodyacover_Front.jpg?v=1775716931","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/lakudtodyachya-goshti","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}