{"product_id":"vishwagunadarshchampu","title":"Vishwagunadarshchampu","description":"\u003cp\u003eसंस्कृत साहित्यात गद्य आणि पद्य दोन्ही शैलींचा वापर करणाऱ्या काव्याला चंपूकाव्य म्हणतात. विश्वगुणादर्शचंपू हे संस्कृत साहित्यातील एक अपूर्व चंपूकाव्य आहे. मध्ययुगीन भारताचे वर्णन करणारे ते एक प्रवासवर्णन आहे. हया काव्यात दोन गंधर्व भारतातील विविध तीर्थक्षेत्रांचे, प्रदेशांचे, प्रादेशिक वैशिष्ट्यांचे तसेच रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांसारख्या महान आचार्यांचे वर्णन करतात. सर्वसामान्यपणे संस्कृत काव्य हे रामायण, महाभारत वा पुराणातील एखादया कथेवर किंवा काल्पनिक कथेवर बेतलेले असते. पण या कल्पनेला छेद देत ह्या काव्यामध्ये कवी वेंकटाध्वरी याने आपल्या आजूबाजूच्या समाजाचे वर्णन केले आहे. तत्कालीन भारतातील परकीय आक्रमणाविषयी म्हणजेच यवनांच्या शासनाविषयी देखील हे काव्य भाष्य करते, जी संस्कृत साहित्यात सहसा न आढळणारी गोष्ट आहे. नव्याने भारतात वावरू लागलेल्या ब्रिटिशांविषयीचे निरीक्षणही त्याने नोंदविले आहे. काशी नगरी, जगन्नाथपुरी, गुजरात, महाराष्ट्र हया प्रदेशांचे वर्णन विशेष वाचनीय आहे. खास करून येथील लोकांची वैशिष्ट्ये त्याने मार्मिकपणे नोंदविली आहेत. ह्या काव्याची रचना दोन गंधर्वांमधील चर्चा अशा स्वरूपात करण्यात आल्याने कुठल्याही विषयाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आजपासून ३५० ते ४०० वर्षे आधीच्या भारतातील विविध शैव, वैष्णव संप्रदाय, त्यांचे आचार, परस्परांशी त्यांचे असलेले संबंध, साम्याचे आणि फरकाचे विविध मुद्दे याविषयीच्या रंजक माहितीचा हा खजिना आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47338292314243,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Vishavagunadarshachampufrontcover.jpg?v=1782218732","url":"https:\/\/sakalpublications.com\/products\/vishwagunadarshchampu","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}