श्रीराम पवार हे प्रसिद्ध पत्रकार व राजकीय विश्लेषक असून, त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पदांवर २८ वर्षे काम पाहिले आहे. सध्या सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे, तसेच देशभरातील निवडणुकांचे दीर्घकाळ अभ्यासपूर्ण वार्तांकन केले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत.
श्रीराम पवार यांनी 'मंथन', 'जागर', 'पॉवर पॉइंट', 'करंट अंडरकरंट'इत्यादी वृत्तपत्रीय स्तंभांसाठी केलेले अभ्यासपूर्ण स्तंभलेखन वाचकप्रिय ठरले आहे.धुमाळी- 'करंट- अंडरकरंट’, राजपाठ 'वेध राष्ट्रीय घडामोडींचा, ‘जगाच्या अंगणात’ - वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा', 'मोदीपर्व', 'ड्रॅगन उभा दारी' या राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरीलघटना-घडामोडीचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे लेखन तसेच, 'संवादकांती' या तंत्रज्ञानावर आधारित नवमाध्यमांतील आशयनिर्मितीवरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.
Shriram Pawar is a renowned journalist and political analyst who has worked for 28 years in various positions in the field of journalism. He is currently serving as the Editor-Director of the Sakal Media Group. He has extensively reported on major events at both the state and national levels, as well as covering elections across India with in-depth analysis.
He regularly writes on topics including politics, society, cooperative movements, economy, urbanization, environment, and terrorism, and is well-known for his investigative journalism and analytical writing. His columns for newspapers such as “Manthan,” “Jagar,” “Power Point,” and “Current Under Current” have been widely appreciated by readers for their research-based insights.
He is the author of books analyzing state, national, and international events, including:
“Dhumali – Current Under Current”
“Rajpath – Vedh: National Events”
“Jagachya Anganat – Vedh: International Events”
“Modi Parva”
“Dragon Ubha Dari”
In addition, he has edited the book “Samvadkanti”, which focuses on content creation in new media based on technology