Skip to product information
Navya Vicharancha Dinvishesh
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Navya Vicharancha Dinvishesh

Author(s):  Mrunalini Kulkarni

सन २०२२ या वर्षात 'प्रहार' या मराठी वृत्तपत्रात छापून आलेल्यातील फक्त २७ दिनविशेषांवरचे हे पुस्तक आहे. 'व्यक्तिविशेष' या विभागात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, रवींद्रनाथ टागोर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सारी जागतिक स्तरावर त्यांच्या विचार आणि कार्यामुळे प्रसिद्ध असलेली भारतीय व्यक्तिमत्त्वे भेटतात ! त्यांची ओळख करून देताना मुख्यत्वे त्यांचे विचार आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. त्यांच्या विचारातून आपला दृष्टिकोन आणि दृष्टिकोनातून आपले आयुष्य बदलते.

'दिनविशेष' आणि 'सणसमारंभ' या विभागांत लेखिकेने आपली संस्कृती जपत प्रत्येक दिनामागचे या आंतरिक सौंदर्य, सामर्थ्य आणि त्यामागचा इतिहास सांगत नव्या युगाशी सांगड घातली आहे.

लेखांतील सकारात्मकता प्रेरणा देते. शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा, व्याख्याने, निबंध अशा ठिकाणी या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. 'नव्या विचारांचा दिनविशेष' या पुस्तकातून माझे हेच सांगणे आहे, की स्वतःसाठी वेगळी वाट तयार करा...!

Book Format

Paperback
Out of Stock
₹199.00
Published on 15-10-2026 | 114 Pages

Mrunalini Kulkarni

शिक्षण, लेखन आणि समाजप्रबोधन या क्षेत्रांत कार्यरत.

बी.एस्सी., बी.एड. पदवी तसेच डिप्लोमा इन एज्युकेसन टेक्नॉलॉजी अशी शैक्षणिक पात्रता.

प्रारंभी अॅनालिटिकल केमिस्ट म्हणून पाच वर्षे कार्यरत.

आदर्श विद्यालय, गोरेगाव (प.) येथे सलग २७-२८ वर्षे सहाय्यक शिक्षिका. इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन. नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे सलग दोन वर्षे दहावीच्या वर्गाचा निकाल १०० टक्के.

वॉर्डस्तरीय विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा यांत सहभाग आणि प्रथम क्रमांकाची हॅट्टिक.

विज्ञान प्रदर्शनात सूत्रसंचालन, शिक्षणविषयक दोन कृती संशोधन प्रबंधांचे लेखन, रचनावाद व शैक्षणिक नवोपक्रमांवर मार्गदर्शक व्याख्याने, तसेच राज्य व वॉर्ड पातळीवरील शिक्षक कार्यशाळांत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सक्रिय भूमिका.

दै. 'लोकसत्ता'मध्ये 'शालेय विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र आणि उपाय' हा लेख दोन भागांत प्रसिद्ध. 'सकाळ' ('प्रेरणा' सदर), 'नवाकाळ', 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकप्रभा' यांसारख्या वृत्तपत्रे व नियतकालिकांत लेखन आणि पुस्तक परीक्षण प्रसिद्ध.

पर्यटनविषयक लेखनासाठी 'विश्वभ्रमंती' दिवाळी अंकात सलग पाच वर्षे योगदान, तसेच विविध दिवाळी अंकांतून वैविध्यपूर्ण लेखन.

७ नोव्हेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत दै. 'प्रहार'मध्ये दर रविवारी 'गुलदस्ता' या सदरात शंभरहून अधिक लेख प्रसिद्ध. या लेखांतून पर्यटन, सामाजिक विषय, तरुणांसाठी प्रेरणादायी विचार तसेच दिनविशेष व व्यक्ती यांवर नव्या दृष्टिकोनातून भाष्य.

सेवानिवृत्तीनंतरही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग. विविध महाविद्यालये, एनएसएस कॅम्प, महिला मंडळे, वाचनालये, शालेय कार्यक्रम येथे प्रमुख पाहुण्या, वक्त्या व परीक्षक म्हणून सहभाग.

आकाशवाणी कार्यक्रमांतून नाटिका, पुस्तक परीक्षण, लेखवाचन, तसेच लहान मुलांसाठी गोष्टींचे ऑडिओ सादरीकरण.

कोरोनाकाळात 'फुलोरा' या यू ट्यूब चॅनेलवरून सव्वा वर्ष तरुणांसाठी प्रेरणादायी लेखांचे नियमित वाचन.

विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, शिक्षणातील बदल, ताणतणाव व्यवस्थापन आणि मूल्याधिष्टित शिक्षण या विषयांवर विशेष अभ्यास. छोट्या गोष्टींतूनही तरुण पिढीला 'तू हे करू शकशील' हा विश्वास देणे, हाच लेखनाचा आणि कार्याचा केंद्रबिंदू.

बुलढाण्यात महाराष्ट्र शासनाच्या विदर्भातील लोकसंस्कृती या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात पुस्तकातील चित्रावर स्वतः लिहिलेल्या मजकुराचे वाचन.

रेडिओ मधुबनमध्ये पर्यावरणार मुलाखत.

Publisher

Sakal Prakashan

Author

Mrunalini Kulkarni

Language

Marathi

ISBN

9788169355421

Binding
  • Paperback
Pages

114

Publication Year

15-10-2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.