Skip to product information
Vishwagunadarshchampu
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Vishwagunadarshchampu

Author(s):  Samira Gujar - Joshi

संस्कृत साहित्यात गद्य आणि पद्य दोन्ही शैलींचा वापर करणाऱ्या काव्याला चंपूकाव्य म्हणतात. विश्वगुणादर्शचंपू हे संस्कृत साहित्यातील एक अपूर्व चंपूकाव्य आहे. मध्ययुगीन भारताचे वर्णन करणारे ते एक प्रवासवर्णन आहे. हया काव्यात दोन गंधर्व भारतातील विविध तीर्थक्षेत्रांचे, प्रदेशांचे, प्रादेशिक वैशिष्ट्यांचे तसेच रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांसारख्या महान आचार्यांचे वर्णन करतात. सर्वसामान्यपणे संस्कृत काव्य हे रामायण, महाभारत वा पुराणातील एखादया कथेवर किंवा काल्पनिक कथेवर बेतलेले असते. पण या कल्पनेला छेद देत ह्या काव्यामध्ये कवी वेंकटाध्वरी याने आपल्या आजूबाजूच्या समाजाचे वर्णन केले आहे. तत्कालीन भारतातील परकीय आक्रमणाविषयी म्हणजेच यवनांच्या शासनाविषयी देखील हे काव्य भाष्य करते, जी संस्कृत साहित्यात सहसा न आढळणारी गोष्ट आहे. नव्याने भारतात वावरू लागलेल्या ब्रिटिशांविषयीचे निरीक्षणही त्याने नोंदविले आहे. काशी नगरी, जगन्नाथपुरी, गुजरात, महाराष्ट्र हया प्रदेशांचे वर्णन विशेष वाचनीय आहे. खास करून येथील लोकांची वैशिष्ट्ये त्याने मार्मिकपणे नोंदविली आहेत. ह्या काव्याची रचना दोन गंधर्वांमधील चर्चा अशा स्वरूपात करण्यात आल्याने कुठल्याही विषयाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आजपासून ३५० ते ४०० वर्षे आधीच्या भारतातील विविध शैव, वैष्णव संप्रदाय, त्यांचे आचार, परस्परांशी त्यांचे असलेले संबंध, साम्याचे आणि फरकाचे विविध मुद्दे याविषयीच्या रंजक माहितीचा हा खजिना आहे.

Book Format

Paperback
Out of Stock
₹300.00
Published on October 2023 | 196 Pages

Samira Gujar - Joshi

लेखिकेचा परिचय

डॉ. समिरा गुजर जोशी

एम. ए. संस्कृत (२००५), एम. ए. मराठी (२००८)

भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव या विषयावर मुंबई विद्यापीठात संशोधन प्रबंध सादर करून पी एच. डी. पदवी प्राप्त. (२०११)

संस्कृत विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण (२०१२)

मराठी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण (२०२१)

२०१६ ते २०१९ या कालावधीत रामनारायण रुईया महाविद्यालयात संस्कृत विषयाचे अध्यापन

२०२१ ते २०२३ या कालावधीत श्रीमती चांदीबाई हिंमथलाल मनसुखानी महाविद्यालय, उल्हानगर येथे एम. ए.च्या विद्यार्थ्यांना साहित्यशास्त्र व मराठी नाटक या विषयाचे अध्यापन

सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध दैनिकांसाठी

डॉ. समिरा गुजर जोशी स्तंभलेखन आणि स्फुटलेखन

विविध व्याख्यानमालांमधून संस्कृत नाटक आणि मराठी साहित्यातील विविध पैलूंवर व्याख्याने

ह्या नाट्यानुभवाचे लेखन 'कालजयी सावरकर' ह्या लघुपटाचे लेखन (२०२२) 'मधुरव बोरू ते ब्लॉग' (२०२२), त्यासाठी म. टा. सन्मान आणि सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त

निवेदन क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या भारतविद्या ह्या डिजिटल व्यासपीठावरील डिजिटल संस्कृत लर्निंग कार्यक्रमात सहभाग

नाट्यशास्त्र आणि संस्कृत रंगभूमी संदर्भात विविध विषयावरील शोधनिबंध प्रसिद्ध

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या अनेक कार्यक्रमातून निवेदिका म्हणून सातत्याने सहभाग तसेच विविध मालिका आणि चित्रपटातून अभिनेत्री म्हणून कार्यरत

Author

Samira Gujar - Joshi

Language

Marathi

ISBN

9789392194214

Binding
  • Paperback
Pages

196

Publication Year

October 2023

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.