आज सातवी माळ! कालरात्री देवीची! सर्वांना मारणाऱ्या काळाची ही विनाशिका म्हणून ही कालरात्री! पार्वतीने आपल्या शरीरातून अंबिका (कौशिकी) देवीला बाहेर काढले. त्या सुंदर अंबिकेला पाहून शुंभ नावाच्या राक्षसाला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. त्याने चंड आणि मुंड नावांच्या आपल्या दूतांना अंबिकेला आणण्यासाठी पाठवले. गिरिराज हिमालयाच्या अत्युच्च सुवर्णमय शिखरावर सिंहावर आरुढ झालेल्या स्मितहास्य करणाऱ्या अंबिका देवीला उन्मत्त झालेले शुंभ-निशुंभ राक्षसांचे दूत चंड-मुंड हे आपल्या सैन्यासह देवीला पकडण्यासाठी आले तेव्हा देवी त्यांच्यावर अत्यंत क्रोधाविष्ट झाली.त्या वेळी क्रोधातिशयाने तिचे मुखकमल काळे-निळे झाले. क्रोधामुळे भुवया वक्र झाल्या. तिच्या कपाळातून एकदम अकराळ विकराळ मुखाची खड्ग- पाश धारण केलेली रौद्रस्वरूपी काली देवी बाहेर पडली. तिचे मुख शत्रूंना गिळण्यासाठी वासलेले होते. धारदार पात्याप्रमाणे लवलवणाऱ्या जिभेमुळे ती भीषण दिसत होती. तिने
नरमुंडमाला धारण केली होती. हत्तीचे चर्म परिधान केले होते. शरीरावरील मांस शुष्क झाल्यामुळे ती भीतिदायक वाटत होती. तिचे नेत्र आरक्त झालेले होते.असुर सेनेमध्ये त्वरित प्रवेश करून तिने महाबलाढ्य दैत्यांचा निःपात करायला सुरुवात केली. सैन्यच्या सैन्य भक्षण करणे, हत्तींना एका हाताने उचलून स्वतःच्या तोंडात टाकणे,योद्धे, घोडे,सारथी यांच्यासह रथच मुखी घालून दातांनी अतिशय दारुण प्रकारे चर्वण करून भक्षण करणे, काहींचे केस उपटून, काहींच्या माना आवळून,काहींना पायाने तुडवून, काहींना छातीने चेंगरून ठार मारणे, राक्षसांनी तिच्याभोवती आच्छादिलेल्या बाणांची चक्रे कालरात्रीच्या वासलेल्या मुखात प्रविष्ट होऊन जाणे,मोठमोठाले राक्षसच्या राक्षस गिळून टाकणे अशी असंख्य भयानक कामे कालरात्रीने राक्षसांबरोबर झालेल्या युद्धांमध्ये केली आहेत. तिने प्रथम चंड- मुंडांना मारून टाकले. चंड-मुंडांना मारले म्हणून तिचे नाव 'चामुंडा' झाले. त्यानंतर धूम्रलोचन राक्षसाचा वध तिने एका हुंकारासरशी केला.नंतर शुंभ राक्षसाने 'रक्तबीज' नावाच्या राक्षसाला देवीबरोबर युद्ध करण्यासाठी पाठवले.रक्तबीज दैत्याला असा वर मिळाला होता की, रक्तबीजाच्या जमिनीवर पडलेल्या, रक्ताच्या एका थेंबातून हजारो रक्तबीज तयार होत असत. अंबिकेसह सगळ्या देवता रक्तबीजाला मारून थकल्या, तेव्हा कालरात्री देवीने आपली जीभ एवढी मोठी केली की, संपूर्ण आकाश त्या जिभेने व्यापून गेले होते. कालरात्रीने रक्तबीजाला उचलून त्याच्या रक्ताचा एक थेंबही खाली न पडू देता त्याच्या शरीरातील सगळे रक्त पिऊन टाकले.रक्तच न उरल्याने रक्तबीजाचा मृत्यू झाला.
अशी ही कालरात्री देवी काळ्या रंगाची आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत. गळ्यात नरमुंडमाला आहे.तिला त्रिनेत्र आहेत.ती चतुर्भुज आहे.कालरात्री देवीच्या एका हातात तलवार, एका हातात लोखंडी काटा आणि दोन हात अभय व आशीर्वाद देणारे आहेत. कालरात्री देवीचे वाहन गाढव आहे. कारण ती साधकांच्या सगळ्या दुःखांची, संकटांची ओझी तिच्या गाढवावरून वाहून नेते. काळाचाही नाश करणारी रात्र म्हणजे कालरात्री ! काळ म्हणजे वेळ,मृत्यू व अंधार! तिचे दुसरे नाव 'शुभंकरी' असे आहे.ती दिसायला भयंकर असली तरी मनाने ती अतिशय मायाळू आणि सर्वांचे शुभ करणारी आहे. ती सहस्रार चक्राची देवता आहे. साधनेच्या परिपूर्ण अवस्थेनंतर भक्ताला ती मोक्ष प्रदान करते.ही कालरात्री व्यावहारिक अर्थाने मनुष्याला भूत-प्रेत, दुष्ट नजर, त्रास देणाऱ्या शक्तींपासून वाचवते.कालरात्रीच्या उपासनेने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते.फसवणूक, विनाकारण छळ आणि दुःख-संकटांतून मुक्तता होते. तिला असत्य, भांडण तंटा,नैवेद्यात कांदा-लसूण या गोष्टी अजिबात आवडत नाहीत.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची षोडशोपचारी पूजा करून नैवेद्यात तिला गूळ आणि गुळापासून रांधलेले तसेच दूध- दही हे पदार्थ अर्पण करावेत. कालरात्री देवीचा मंत्र असा आहे- 'एकवेणी जपाकर्णपूरा, नग्ना खरास्थिता।

लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी, तैलाभ्यक्त शरीरिणी।।
वामपादोल्लसल्लोह,लताकण्टक भूषणा।
वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर् भयंकरी।।'
आणि नाममंत्र असा आहे -ओम् क्लीं कालरात्रिदेव्यै नमः।
जीवनाची जशी शुभ,सुंदर, आनंदी आणि सुखाची एक सकारात्मक बाजू असते,तशीच काळी,दुःखद,संकटांची,मृत्यूची नकारात्मक अशी दुसरी बाजूही असते.व्यावहारिक,ऐहिक गोष्टी या अशाश्वत असतात,पण संकटांच्या काळात माणसाच्या हातून घडणारी चुकीची,पाप कर्मे,तसेच मृत्यू हे शाश्वत सत्य आहे,ते नाकारून चालत नाही,नाकारता येतच नाही.त्या दुःखद बाजूचा सामनाही मनुष्याला करावा लागतो,याचे कालरात्री देवी हे प्रतीक आहे. कालरात्री देवीला मनःपूर्वक वंदन करून हा लेख संपवते.

डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)
पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर
९८२४८८०७८९