Skip to product information
चाव्हटा
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

चाव्हटा

Author(s):  Santosh Shintre

चार रस्ते जिथे एकत्र येतात, ती जागा म्हणजे चव्हाटा. याचा अधिक गंभीर अर्थ म्हणजे सार्वजनिक हिताच्या विषयांवर चर्चा होणारे सामूहिक चर्चाविश्व (पब्लिक स्फीअर). भारतीय निसर्ग-पर्यावरणाचा असा चव्हाटा त्यासंबंधीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय पैलूंच्या मार्गांनीच साकारतो. आपल्या सभोवतालच्या परिसराची समग्र समजून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. अशा चव्हाट्यावरील चर्चा रोखठोक असतात. विषयाच्या एरवी कुणीतरी, कुठेतरी लपवू पहात असलेल्या काही बाजू तिथे निश्चितपणे उघड होतात. चारही रस्त्यांनी आलेल्या माहितीची देवाणघेवाण होऊन प्रश्नांचे वस्तुनिष्ठ आकलन होते. त्यातील प्रश्नांचे सहज न समजणारे काही पैलू चव्हाट्यावर भीडभाड न बाळगता सामोरे येतात. हे पुस्तक भारतीय निसर्ग-पर्यावरणातील काही ज्वलंत प्रश्न, त्यामागील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय गुंतागुंत अशाच रोखठोक पद्धतीने चव्हाट्यावर आणते. भारतीय निसर्गातील बऱ्याच सकारात्मक गोष्टी, सौंदर्यही सामोरे आणते. सजग वाचकांना अधिक विचारप्रवृत्त आणि कृतीशील होण्यासाठी महत्त्वाचे संदर्भ पुरवते.

Book Format

Paperback
In Stock
₹225.00
Published on 04/06/2025 | 150 Pages
Available on other Platform as well
AMAZON

चार रस्ते जिथे एकत्र येतात, ती जागा म्हणजे चव्हाटा. याचा अधिक गंभीर अर्थ म्हणजे सार्वजनिक हिताच्या विषयांवर चर्चा होणारे सामूहिक चर्चाविश्व (पब्लिक स्फीअर). भारतीय निसर्ग-पर्यावरणाचा असा चव्हाटा त्यासंबंधीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय पैलूंच्या मार्गांनीच साकारतो. आपल्या सभोवतालच्या परिसराची समग्र समजून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. अशा चव्हाट्यावरील चर्चा रोखठोक असतात. विषयाच्या एरवी कुणीतरी, कुठेतरी लपवू पहात असलेल्या काही बाजू तिथे निश्चितपणे उघड होतात. चारही रस्त्यांनी आलेल्या माहितीची देवाणघेवाण होऊन प्रश्नांचे वस्तुनिष्ठ आकलन होते. त्यातील प्रश्नांचे सहज न समजणारे काही पैलू चव्हाट्यावर भीडभाड न बाळगता सामोरे येतात. हे पुस्तक भारतीय निसर्ग-पर्यावरणातील काही ज्वलंत प्रश्न, त्यामागील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय गुंतागुंत अशाच रोखठोक पद्धतीने चव्हाट्यावर आणते. भारतीय निसर्गातील बऱ्याच सकारात्मक गोष्टी, सौंदर्यही सामोरे आणते. सजग वाचकांना अधिक विचारप्रवृत्त आणि कृतीशील होण्यासाठी महत्त्वाचे संदर्भ पुरवते.

Santosh Shintre

संतोष शिंत्रे यांनी एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे ते पर्यावरण पत्रकारितेकडे वळले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभ्यासाच्या विषयांची मांडणी कथात्म रूपात करायला सुरुवात केली आणि पर्यावरणकथा हा एक नवीनच प्रकार मराठीत सुरु झाला. पर्यावरण विषयातल्या अनेक सरकारी निर्णयांकडे धोरणांकडे चिकित्सक दृष्टीने बघून त्यावर अभ्यासपूर्ण आकडेवारीनिशी लिहिलेले संतुलित लेख हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
संतोष शिंत्रे यांचे कार्य अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारे आहे. वैज्ञानिकांना संशोधन-लेखनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आज्ञावलीपासून ते लेखनमित्रसारख्या लेखनकोशापर्यंत; शेल सिल्व्हरस्टाईनच्या कवितांपासून ते ‘राजा शिवछत्रपती’, ‘छत्रपतींचे आरमार’, ‘सरिता कोष’ अशा अनुवादांपर्यंत तर चालू शतकातले जागतिक व भारतीय निसर्ग पर्यावरण यासारख्या माहितीपूर्ण ग्रंथापासून ते ‘पिंक हेडेड डक’ किंवा ‘मनेर मानुषेर इंद्रजाल’ अशा कथनात्मक लेखनापर्यंत त्यांचा संचार आहे.

Santosh Shintre began his career as a microbiologist. Later, he turned toward environmental journalism. After that, he started presenting the subjects of his research in a narrative form, and this gave rise to a completely new genre in Marathi called environmental storytelling. His hallmark is balanced writing that examines many government decisions and policies in the environmental field with a critical eye and presents them with well-researched data.

Santosh Shintre’s work spans multiple fields. From guiding scientists in research and writing through manuals, to creating writing resources like Lekhanmitra; from translating Shel Silverstein’s poetry to works like Raja Shivchhatrapati, Chhatrapatīnche Aarmar, and Sarita Kosh; from informative books on global and Indian nature and environment to narrative writings like Pink Headed Duck and Maner Manushech Indrajaal, his contributions cover a wide spectrum.

Publisher

Sakal Prakashan

Author

Santosh Shintre

Language

Marathi

ISBN

9789349487116

Binding
  • Paperback
Pages

150

Publication Year

04/06/2025

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.