Skip to product information
Khakee Vardeeteel Yoddha
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Khakee Vardeeteel Yoddha

Author(s):  Vijay Raman, Rohan Naamjoshi

हे पुस्तक भारतीय पोलिस दलात विविधांगी जबाबदाऱ्या सांभाळलेल्या विजय रमन यांच्या तीन दशकांमधील आठवणी अत्यंत रोचक शेलीत वाचकांसमोर मांडते. हे एका खऱ्याखुऱ्या नायकाचे स्वतःचे अनुभव आहेत. विजय रमन यांची पोलिसी कारकीर्द अत्यंत गौरवशाली आहे. विविधांगी कामगिरी करणाऱ्या भारतीय पोलिस दलातील काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये विजय रमन यांचा समावेश होतो. चंबळच्या दुर्गम भागांपासून ते नक्षलग्रस्त आदिवासी भाग आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या प्रदेशांपर्यंत त्यांच्या कामाची व्याप्ती आहे. याशिवाय जम्मू सीमेवरचे कुंपण, चार पंतप्रधानांची सुरक्षा  एका अत्यंत अनुभवी अधिकाऱ्याच्या याअनुभवांतून हे पुस्तकभारतातल्या अंतर्गत सुरक्षेची व्याप्ती, समाजरचना, मानवी नातेसंबंध आदीचेएक खूप वेगळे आकलन वाचकांसमोर मांडते. 

Book Format

Paperback
Out of Stock
₹475.00
Published on 08/08/2026 | 475 Pages

हे पुस्तक भारतीय पोलिस दलात विविधांगी जबाबदाऱ्या सांभाळलेल्या विजय रमन यांच्या तीन दशकांमधील आठवणी अत्यंत रोचक शेलीत वाचकांसमोर मांडते. हे एका खऱ्याखुऱ्या नायकाचे स्वतःचे अनुभव आहेत. विजय रमन यांची पोलिसी कारकीर्द अत्यंत गौरवशाली आहे. विविधांगी कामगिरी करणाऱ्या भारतीय पोलिस दलातील काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये विजय रमन यांचा समावेश होतो. चंबळच्या दुर्गम भागांपासून ते नक्षलग्रस्त आदिवासी भाग आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या प्रदेशांपर्यंत त्यांच्या कामाची व्याप्ती आहे. याशिवाय जम्मू सीमेवरचे कुंपण, चार पंतप्रधानांची सुरक्षा  एका अत्यंत अनुभवी अधिकाऱ्याच्या याअनुभवांतून हे पुस्तकभारतातल्या अंतर्गत सुरक्षेची व्याप्ती, समाजरचना, मानवी नातेसंबंध आदीचेएक खूप वेगळे आकलन वाचकांसमोर मांडते. 

Vijay Raman

विजय रमन हे भारतीय पोलिस सेवेच्या १९७५च्या तुकडीचे मध्य प्रदेश केडरचे अधिकारी.केरळमध्ये बालपण घालवल्यानंतरत्यांनीबडोदा येथील एम.एस. विद्यापीठातून कायदा विषयाचे सुवर्णपदक मिळवल्यानंतर, संपूर्ण देशभरात त्यांची कारकिर्दघडली.पानसिंग तोमर आणि त्याच्या टोळीचा खात्मा करणारी चकमक; डाकू मलखान सिंग आणि फूलन देवी यांचे आत्मसमर्पण; कुख्यात दहशतवादी गाझी बाबाला कंठस्नानघालणारी मोहीम; मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याचा तपास; भोपाळमधील गॅस दुर्घटनेच्या भीषणतेचा सामना; स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या निवडक अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून चार भारतीय पंतप्रधानांची सुरक्षा हे त्यांच्या पोलिसी कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे. याशिवाय भारतीय बनावटीच्या कारमधूनपृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आहे!
विजय रमन यांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि त्यांना असणारी साहसाची आवड यांपेक्षा त्यांची सचोटी नेहमीच अधिक महत्त्वाची होती; अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतही कायद्याचे पालन करण्यास कटिबद्ध असणारे अधिकारी असा त्यांचा लौकीक होता. सन २०२३मध्ये त्यांचे निधन झाले.

Rohan Naamjoshi

रोहन नामजोशी हे दिल्लीस्थित मुक्त पत्रकार आहेत. ते गेल्या १३ वर्षापासून पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रात कार्यरत आहेत. सकाळ, बीबीसी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केल्यानंतर सध्या ते गुगलच्या एआय प्रकल्पावर काम करत आहेत. महाराष्ट्रातील आघाडीच्या प्रकाशन संस्थांसाठी लेखन करतात तसेच पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवतात. राजकारण, संस्कृती, भाषा, मल्याळम सिनेमे, पाककला या क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Vijay Raman and Rohan Naamjoshi

Language

Marathi

ISBN

9788169355643

Binding
  • Gate Fold
Pages

475

Publication Year

08/08/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.