Marathi

Krutrim Buddhimatta : Abhasakadun Vastavakade

bySundeep Waslekar

₹187.50 ₹250 In stock

25% off You save ₹62.50 on this book

Free delivery on orders above ₹399.

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications

Also available on Amazon

Author
Sundeep Waslekar
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
154
Published
1/7/2026
Dimensions
5.5 x 8.5

About this book

हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची आश्वासने, तिची शक्ती आणि तिच्याशी संबंधित गहन अनिश्चितता अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकते. हे पुस्तक वाचकाला जगभरातील विविध दृष्टिकोनांमधील एका व्यापक प्रवासावर घेऊन जाते. ग्लोबल साउथमथील शेतजमिनी आणि आरोग्यसेवा केंद्रांपासून, जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते, ते महासत्तांच्या धोरणात्मक सत्ताकेंद्रांपर्यंत, जिथे ती वैज्ञानिक वर्चस्व आणि भूराजकीय प्रभाव वाढविण्याचे माध्यम मानली जाते, असा हा प्रवास आहे.

भारतासारख्या देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आरोग्यसेवा, शेती, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांचे रूपांतर घडवून आणणारे साधन म्हणून पाहिले जाते. तर अमेरिका आणि चीन यांसारखे देश तिला वैज्ञानिक शोध आणि जागतिक वर्चस्वाचे शक्तिशाली इंजिन मानतात. मात्र या महत्त्वाकांक्षांच्या पाठीमागे एक अधिक गंभीर आणि अस्वस्थ करणारी चिंता दडलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातील काही अग्रणी आणि संस्थापक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या मते, प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताप्रणाली मानवसभ्यतेच्या सातत्यालाच धोका निर्माण करू शकतात.

खऱ्या अथनि जागतिक दृष्टिकोन सादर करणारे हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेची परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आणि तिच्याशी संबंधित अस्तित्वगत (Existential) जोखमी यांचा सखोल आणि संतुलित आढावा घेते. तांत्रिक आकलन, भूराजकीय विश्लेषण आणि नैतिक चिंतन यांची सांगड घालत हे पुस्तक अखेरीस भारतासाठी एक धाडसी आणि व्यावहारिक धोरणात्मक मार्ग सुचवते.

लेखकाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुरक्षेशी संबंधित जगातील सर्वात महत्त्वाच्या चर्चामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका स्विस राजदूतासोबत संयुक्तपणे तीन वर्षे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्य राष्ट्रांदरम्यान अणुक्षेत्रातील जबाबदार आचारसंहितांवर संवाद प्रक्रियेचे सह-अध्यक्षपद भूषविले. २०२५ पासून ते अत्यंत कृत्रिम बुद्धिमत्ताजोखमांच्या (extreme Al risks) प्रशासनासाठी जागतिक करार (Global Compact) घडवून आणण्याच्या उद्देशाने 

आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक एकमत निर्माण करण्याच्या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. या सर्व अनुभवांमधून हे पुस्तक साकारले आहे.

शास्त्रज्ञ जेफ्री हिंटन यांच्याबरोबर झालेल्या भेटीतून कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करण्यासाठी प्रेरित होऊन, लेखक जगाच्या भविष्यास दिशा देण्यासाठी सत्तरहून अधिक देशांबरोबर सहकार्य करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विचारमंचाचे (थिंक टँकचे) नेतृत्व करतात.

About the author

Sundeep Waslekar

Sundeep Waslekar is a thought leader on the global future. He has worked with more than 70 countries, the United Nations, and the European Council under the auspices of the Strategic Foresight Group, an international think tank he cofounded in 2002.
He is the author of A World without War, published by HarperCollins India (2022) and published in French as Entre Guerre et Paix by CNRS Editions (2023), in Spanish as Un mundo sin guerra by Nola Editores (2025), and in Marathi as Yudhha Nakarnare Jag by Rajhans Prakashan (2025). He is the author of Eka Dishecha Shodh, a best-selling book in his native Marathi language, with 26 editions and translations in Hindi and Urdu.
He has been a practitioner of Track Two diplomacy since the 1990s. He has mediated in geopolitical conflicts in South Asia, those between Western and Islamic countries on deconstructing terror, trans-boundary water conflicts in Africa and the Middle East, and nuclear risk reduction between the five permanent members of the UN Security Council. Since the beginning of 2025, he has been involved in Track Two processes to shape global ‘extreme AI risks’ governance.
He was invited to address the United Nations Security Council session 7818 on water, peace, and security. His policy concepts have been discussed in the UN Alliance of Civilisations, the World Economic Forum at Davos, Quai d’Orsay, European Parliament, Indian Parliament, UK House of Commons and House of Lords. He has been quoted in more than 3,000 media articles from 80 countries.
Waslekar read philosophy, politics and economics (PPE) at Oxford University from 1981 to 1983. He was conferred D. Litt. (Honoris Causa) of Symbiosis International University by the President of India in 2011.

सुनीप वासलेकर हे जागतिक भविष्यविषयक विचारवंत, धोरणविशारद आणि आंतरराष्ट्रीय शांतता प्रक्रियेतील महत्त्वाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी २००२ मध्ये सह-स्थापन केलेल्या स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप (Strategic Foresight Group) या आंतरराष्ट्रीय विचारमंचाच्या माध्यमातून ७० हून अधिक देश, संयुक्त राष्ट्रसंघ आणि युरोपियन परिषद यांच्यासोबत जागतिक शांतता, सुरक्षा, जलव्यवस्थापन, संघर्ष निवारण आणि भविष्यातील धोरणात्मक आव्हानांवर व्यापक कार्य केले आहे.

ते ‘A World Without War’ (२०२२) या जागतिक स्तरावर चर्चिल्या गेलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाचे फ्रेंच भाषेत Entre Guerre et Paix (२०२३), स्पॅनिश भाषेत Un Mundo Sin Guerra (२०२५) आणि मराठी भाषेत युद्ध नाकारणारे जग (२०२५) या नावांनी भाषांतर व प्रकाशन झाले आहे. याशिवाय त्यांचे ‘एका दिशेचा शोध’ हे मराठीतील अत्यंत लोकप्रिय पुस्तक असून त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाचे हिंदी आणि उर्दू भाषांमध्येही भाषांतर झाले आहे.

१९९० च्या दशकापासून ते अनौपचारिक राजनय (Track-II Diplomacy) या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी दक्षिण आशियातील भू-राजकीय संघर्ष, पाश्चात्त्य आणि इस्लामी राष्ट्रांमधील दहशतवादविरोधी संवाद, आफ्रिका व मध्यपूर्वेतील आंतरराष्ट्रीय जलविवाद तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील पाच स्थायी सदस्य राष्ट्रांमधील अण्वस्त्र जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण मध्यस्थी केली आहे. २०२५ च्या प्रारंभापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) गंभीर जागतिक धोक्यांच्या नियमनासाठी सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक-टू प्रक्रियेत सहभागी आहेत.

पाणी, शांतता आणि सुरक्षा या विषयावरील संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या ७८१८व्या अधिवेशनात त्यांना विशेष निमंत्रित वक्ते म्हणून संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या धोरणात्मक संकल्पनांवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्रालय (Quai d'Orsay), युरोपियन संसद, भारतीय संसद, ब्रिटनची हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स यांसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठांवर चर्चा झाली आहे. त्यांच्या विचारांचा उल्लेख ८० हून अधिक देशांतील ३,००० पेक्षा अधिक वृत्तपत्रे, संकेतस्थळे आणि दूरचित्रवाहिन्यांमध्ये करण्यात आला आहे.

१९८१ ते १९८३ या कालावधीत त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र (PPE – Philosophy, Politics and Economics) या विषयांचा अभ्यास केला. २०११ मध्ये सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांना डी.लिट. (मानद) ही सर्वोच्च मानद पदवी प्रदान केली. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.

जागतिक शांतता, भविष्यदृष्टी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानवी कल्याण यांसाठी केलेल्या त्यांच्या दूरदर्शी कार्यामुळे सुनीप वासलेकर यांना समकालीन भारतातील अग्रगण्य जागतिक विचारवंत म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹399. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

Krutrim Buddhimatta : Abhasakadun Vastavakade₹187.50

Complete your shelf

Frequently bought together

  • Sale price₹187.50Regular price ₹250 Save 25%

Total for 1 book

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.