Skip to product information
Bhagvan Buddha : Sirshree
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Bhagvan Buddha : Sirshree

Author(s):  Sir Shree

सरश्रींचं बेस्ट सेलर पुस्तक
भगवान बुद्ध

'बुद्ध' हे नाव, आडनाव किंवा टोपणनाव नसून ती एक प्रकारची अवस्था आहे. यात ' मी कोण' याचं आकलन माणसाला होतं. या जगात काही जण बुध्दू न राहता बुद्ध होतात. बुद्ध होण्याच्या मार्गात सर्वात आधी बुद्धी आणि सामान्य ज्ञानाचा उपयोग होतो. विविध धारणा- समजुतींच्या सापळ्यातून सुटकेसाठी बुद्धीच उपयोगी पडते. मात्र तीच जर बुद्धिविलासात अडकली तर गुंता सुटण्याऐवजी वाढतच जातो. आपण आपल्या बुद्धीचा अत्युच्च विकास केला तर तिच्या साहाय्यानं आपण प्रज्ञावान आणि स्थितप्रज्ञ होऊ शकतो. मन- बुद्धीचा वापर कसा करायचा? मन निर्मळ कसं ठेवायचं?मन व बुद्धीचा समन्वय कसा साधायचा? यांसारख्या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधल्यास बुद्धीचा सर्वोच्च विकास होतो.

सिद्धार्थ गौतमांनी मन-बुद्धीचा सम्यक उपयोग केल्यामुळे त्यांना संबोधी प्राप्त झाली. संबोधी म्हणजे समज ( अंडरस्टँडिंग). यानंतरच बुद्धत्व प्राप्त होऊ शकतं.

संबोधी प्राप्त झाल्यावर भगवान बुद्धांचा अनेक लोकांशी संपर्क आला. त्यात सर्वसामान्य गृहस्थ, राजघराण्यातील माणसं, संन्यासी वगैरे विविध प्रकारच्या लोकांचा समावेश होता. भगवान बुद्धांनी सम्यक ज्ञानाद्वारे लोकांची मनःस्थिती ओळखून त्यांना मार्गदर्शन केलं. ज्यांनी ते लक्षपूर्वक ऐकलं, समजून घेतलं त्या सर्वांनी बुद्धांच्या सहवासाचा पुरेपूर लाभ मिळवला. मात्र ज्यांनी फक्त वरवर ऐकलं, ते पूर्वीसारखंच जीवन जगत राहिले.

दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे. या साखळीबद्दल सविस्तरपणे सांगत भगवान बुद्धांनी दुःखमुक्तीच्या अवस्थेपर्यंत लोकांना नेण्यासाठी शिकवण दिली. तीच शिकवण आजच्या संदर्भात सरश्रींनी विपुल उदाहरणांसकट या पुस्तकात सांगितली आहे. त्यावर काळानुरूप भाष्य केलं आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघायला शिकवणारं हे पुस्तक आपला जवळचा मित्र होऊन राहील

Bhagwan Buddha

“Buddha” is not a name, surname, or nickname; it represents a state of being. In this state, a person realizes the answer to the question, “Who am I?” In this world, some people rise above ignorance and become Buddha. The path to becoming Buddha first requires the use of intelligence and common knowledge. Intelligence helps one escape from the traps of various beliefs and assumptions. However, if it becomes trapped in intellectual pride, the confusion only increases instead of resolving. If we develop our intellect to its highest potential, with its help we can become wise and attain inner steadiness.

How should the mind and intellect be used? How can the mind be kept pure? How can harmony between the mind and intellect be achieved? When these aspects are balanced properly, the intellect reaches its highest development.

Because Gautama Buddha used his mind and intellect in the right way, he attained Sambodhi. Sambodhi means understanding. Only after this understanding can Buddhahood be attained.

After attaining Sambodhi, Gautama Buddha came into contact with many people. These included ordinary householders, members of royal families, monks, and various other individuals. Through true knowledge, he understood the mental state of people and guided them accordingly. Those who listened attentively and understood his teachings benefited greatly from his presence. However, those who listened only superficially continued to live their lives as before.

“There is suffering, there is a cause of suffering, and there is a way to end suffering.” By explaining this chain in detail, Gautama Buddha gave teachings that lead people toward a state free from suffering. In this book, Sirshree explains the same teachings in today’s context with many examples. He also provides commentary relevant to modern times. This book, which teaches readers to look at everyday problems from a new perspective, will become a close and helpful companion in life.

Book Format

Paperback
In Stock
₹190.00
Published on 2017 | 144 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Sir Shree

सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचे अध्ययन केले. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धर्तीचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपले शोधकार्य सातत्याने सुरू ठेवले. या शोधातूनच त्यांना 'आत्मबोध' प्राप्त झाला.

आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले की, अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे 'समज' (Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचे कार्य थांबवले आणि जवळजवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपले समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केले.

सरश्री म्हणतात, "सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही 'समज'च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या 'समजे'चे श्रवणच पुरेसे आहे." ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचने दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेतसमजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणाऱ्या या समजेचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचे बंधन नसते.

विश्वाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांतील लोक आज 'तेजज्ञान'च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.

The spiritual journey of Sarshree began in his childhood. While continuing this search, he studied many different kinds of books. During this period of exploration, he also practiced and studied various meditation methods. His deep curiosity inspired him to visit many intellectual and educational institutions. In order to understand the mystery of life, he spent a long time in contemplation and continued his research with dedication. Through this quest, he eventually attained self-realization (Atmabodh).

After attaining self-realization, he realized that the thread connecting every spiritual path is understanding. After this realization, he stopped his teaching profession and devoted more than two decades of his life entirely to the welfare of humanity and to spiritual development.

Sarshree says, “Although the paths to truth may begin in different ways, they all ultimately end in the same understanding. This ‘understanding’ is everything in itself and is complete. For attaining spiritual knowledge, simply listening to this understanding is enough.”

To illuminate this understanding, he has delivered more than three thousand spiritual discourses on various subjects. Through these talks, he explains very deep spiritual concepts in a simple, easy, and practical language. People from every level of society can benefit from the understanding shared by Sarshree. There are no restrictions of religion, caste, sub-caste, community, sect, or gender.

Today, people from every corner of the world are benefiting from the unique knowledge system of Tejgyan Foundation.

Publisher

Sakal Prakashan

Author

Sir Shree

Language

Marathi

ISBN

9789386204523

Binding
  • Paperback
Pages

144

Publication Year

2017

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Adi Shankaracharya
Adi Shankaracharya

Adi Shankaracharya

Rs. 170.00
Rs. 170.00

Adi Shankaracharya

by Sirshree

1500+ People Purchased last month

Rs. 170.00 (Tax Included)
Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

Regular price  Rs. 299.00 Sale price  Rs. 224.00
Sale price  Rs. 224.00 Regular price  Rs. 299.00

Goshta Paishapanyachi by Prafulla Wankhede

by Prafulla Wankhede

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 Rs. 224.00 (Tax Included)
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 990.00

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 990.00 (Tax Included)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)
Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

Rs. 399.00
Rs. 399.00

Mrutyu : Ek Atal Satya (Death)

by Sadhguru

1500+ People Purchased last month

Rs. 399.00 (Tax Included)
Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Rs. 1,200.00
Rs. 1,200.00

Ayurvedic Garbha Sanskar - The Art And Science Of Pregnancy (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

by Dr. Shri Balaji Tambe

1500+ People Purchased last month

Rs. 1,200.00 (Tax Included)
Shashwat Naisargik Sheti
Shashwat Naisargik Sheti

Shashwat Naisargik Sheti

Rs. 240.00
Rs. 240.00

Shashwat Naisargik Sheti

by Rajendra Bhat

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.