अर्थशास्रातील विविध संकल्पना समजून सांगण्याकरीता विविध उदाहरणे,मुद्देसुदपणा,विविध घटकांची अद्ययावत आकडेवारी, आकृत्या यांचा पुस्तकात समावेश
हा निव्वळ पत्रांचा संग्रह नव्हे; तुमच्या पाल्यासाठी ही जणू आयुष्यभराची शिदोरी ठरू शकेल.
'सर' हा प्रतिष्ठेचा बहुमान ज्यांना मिळाला, त्या न्यूटन यांचे बालपण कसे होते, त्यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता, त्यांनी त्यांचे कार्य कसे केले, त्यांच्या संशोधनाची दखल किती व कशी घेण्यात आली, त्यांचा अंतिम काळ कसा गेला, या विषयी सविस्तर माहिती देणारे प्रेरणादायी पुस्तक.
ज्ञानदेवांचे पहिले विश्वासार्ह चरित्र म्हणून ज्याकडे वारकरी संप्रदाय श्रद्धेने पाहतो, ते म्हणजे भक्तशिरोमणी नामदेव महाराजांनी लिहिलेले श्री ज्ञानदेव चरित्र.
साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीबाबत केलेले चिंतन या पुस्तकात पाहावयास मिळते. भारतीय संस्कृती सर्व जातिधर्म, ज्ञानविज्ञान आणि सर्व काळाचा मेळ घालून वाढते. जगात जे जे काही चांगले आहे, ते ते बरोबर घेऊन, सर्वांना जवळ घेऊन प्रवाहित होणारी अशी ही भारतीय संस्कृती आहे असे साने गुरुजी म्हणतात. आजच्या काळातही त्यांचे विचार वाचनीय व मननीय आहेत.
सहनशीलता, सहकार्य, आपलेपणा, इतरांसाठी काही करण्याची वृत्ती अशा अनेक गुणांबाबत आपल्या मुलाला, श्यामला विचार करायला लावणारी त्यागमूर्ती आई 'श्यामची आई' या अत्यंत गाजलेल्या पुस्तकात साने गुरुजींनी रंगवली आहे.
Anchored in hope, rather than adding to anxiety, and seeing present times as a teachable moment of human history, the book recalls the past and contextualizes it for the next politico-economic shift that is currently unfolding in the world. Every nation must find its bearing and position itself in the matrix of a de-globalized world.
संघर्षाचे स्वरूप, प्रकार यांची माहिती संघर्षाचे रूपांतर शांतीत कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन समन्वयाची वाटेवरील प्रवासाचे चित्रण
जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीतील महत्त्वाच्या राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक,क्रीडा,कृषी,पर्यावरण,विज्ञान व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घटना -घडामाेडींची पायाभूत आणि त्यांचे परिणाम स्पष्ट करणारी विश्लेषणात्मक माहिती
भगतसिंग म्हटले की सर्वसामान्यपणे मनात येते ती हसत हसत फासावर जाणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकाची प्रतिमा... पण भगतसिंग म्हणजे केवळ तेवढेच नाही. भगतसिंगांच्या क्रांतिकार्यासोबतच त्यांच्या विचारविश्वाचा आढावा घेणारे प्रेरक चरित्र.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी,कर्मचारी,अधिकारी,अभ्यासक,सजग नागरिक यांना तसेच एमपीएससी , पीएसआय , एसटीआय , एएसओ या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व -मुख्य -मुलाखत या तीनही टप्प्यांसाठी संदर्भयुक्त पुस्तक
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
सरकारनामा: ट्रम्प ते तावडे... जागतिक राजकीय मंचाचा बदलता अर्थ महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांशी खुमासदार गप्पा उद्याच्या महाराष्ट्राचा तज्ज्ञांनी घेतलेला राजकीय वेध
अॅग्रोवन: शिवार फुलविणाऱया यशकथा शेतकरी आणि मजूर यांच्यातील वेगळ्या नात्याची नव्या दृष्टीकोनातून मांडणी मजुर टंचाईच्या प्रश्नावर मात करणाऱया शेतकऱयांची यशकथा यांत्रिकीकरणातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव
काळजात धावतोय ससाकासवाबरोबरच्या शर्यतीत सशाला हरवणारा माणूस पुढे एक दिवस जगण्याच्या शर्यतीत स्वत:च काळजात ससा घेऊन फिरेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आज तेच दिसतं आहे. उत्तम कांबळे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानं प्रत्येकाच्या काळजात धावणाऱ्या या सशाला भेडसावणारा भवताल 'काळजात धावतोय ससा' या लेखसंग्रहात मार्मिक शब्दांत मांडला आहे.
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.