BK00886
New product
जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक
Warning: Last items in stock!
Availability date:
Jar-Tar chya Goshti - Bhag 1
जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक
Recipient :
* Required fields
or Cancel
आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. आपण त्या अनुभवतो, त्यांचा आस्वादही घेतो. पण त्यांच्याविषयी का, कसं वगैरे प्रश्न मनातही उभे करत नाही. पण अचानक तशी परिस्थितीही उद्भवते आणि आपण भांबावून जातो. मात्र त्याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यानंतर आलेल्या विपरीत परिस्थितीवर काय उपाययोजना करायची याचं थंड माथ्यानं विश्लेषण करून त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असू शकतो. त्यापायीच मग जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं मिळवण्याची निकड भासू लागते.
लेखकाविषयी :
डॉ. बाळ फोंडके,
ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विज्ञानलेखक
तेवीस वर्षे भाभा अणुसंशोधन केंद्रात भौतिकी क्षेत्रातील संशोधनानंतर ‘सायन्स टुडे’ या अग्रेसर विज्ञानमासिकाचे प्रमुख संपादकपद डॉ. बाळ फोंडके यांनी भूषवले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया समूहातील सर्व दैनिक वृत्तपत्रांचे ते विज्ञान संपादक होते. १९८९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आमंत्रणावरून दिल्लीला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन’ या ‘सीएसआयआर’च्या संस्थे चे संचालकपद त्यांनी स्वीकारले.
गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ त्यांनी विज्ञानविषयक लेख आणि सकस विज्ञानकथांचे लेखन केले आहे. इंग्लिश व मराठी भाषांत मिळून आजवर त्यांची ७०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या, देशाच्या विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा आढावा घेणाऱ्या ‘टेक्नॉलॉजी व्हिजन २०३५’ या दस्तावेजाचे लेखन करण्यातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Bal Phondke |
Language | Marathi |
ISBN | 978-81-968004-6-8 |
Binding | Paperback |
Pages | 167 |
Publication Year | 25/06/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |