BK00887
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Bharatbhraman : Pravas Swapnapoorticha
Recipient :
* Required fields
or Cancel
अडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता अदम्य साहस आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सायकलवरून भारत पालथा घालणाऱ्या मोतीराम तुकाराम वाघ यांचे हे प्रवासवर्णन विलक्षण रोमांचक आणि थरारक आहे. मोतीराम यांना प्रवास करण्याचा नाद आहे. सायकल, मोटारसायकल वरुन प्रवास करायला त्यांना आवडते. त्यांनी जी स्थळे पाहिली, त्यांच्या नोंदी, निरीक्षणे त्यांनी त्या पुस्तकात सहजपणे मांडल्या आहेत. या पुस्तकातून वाचकांना अनेक रोमहर्षक अनुभव वाचायला मिळतील. हे पुस्तक वाचणे म्हणजे स्वतःच्या आतल्या ‘जिप्सी’ला साद घालत भ्रमंतीवेडास बिलगण्यासारखेच आहे.
लेखकाविषयी:
मोतीराम तुकाराम वाघ हे व्यवसायाने शेतकरी असून, सध्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात त्यांचे वास्तव्य आहे. काहीकाळ त्यांनी किराणा दुकानदार म्हणूनही व्यवसाय केला. त्यांना प्रवास करायला खूप आवडते, त्यांचे हे पहिलेच पुस्तक असून, या पुस्तकात त्यांनी प्रवास करताना आलेले विलक्षण अनुभव मांडले आहेत. त्यांनी सायकलने भारतभ्रमंती केली आहे. मोटारबाईकवरूनही मुलगा समाधान याच्यासोबत प्रवास केला आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Motiram Tukaram Wagh |
Language | Marathi |
ISBN | 978-81-977101-0-0 |
Binding | Paperback |
Pages | 170 |
Publication Year | 2024-08-20 |
Dimensions | 5.5 x 8.5 |