आज नवरात्रीचा आठवा दिवस! महाअष्टमी! अष्टमी तिथीला केलेली उपासना ही विशेष फलदायी मानली जाते.महा अष्टमीला श्रीदुर्गामातेच्या 'महागौरी' स्वरूपाची पूजा करतात. महा म्हणजे मोठी किंवा महान आणि गौरी म्हणजे गौर,शुभ्र व तेजस्वी वर्णाची देवी. पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षापासून घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली होती. 'हरितालिका' हे व्रत आपण जाणतो.हरितालिका या शब्दाचा अर्थ 'हरित' म्हणजे हिरवळीने नटलेल्या वनश्रीच्या सहवासात म्हणजे अरण्यात जाऊन आणि 'आलि' म्हणजे सखी,आपल्या सखीसह जाऊन शिवप्राप्तीसाठी पार्वतीने तप केले होते म्हणून ती हरितालिका. नंतरही ती जसजशी मोठी होत गेली तसतशी तिच्या तपःसाधनेची उग्रता वाढत गेली. या घनघोर तपामुळे ती दिवसेंदिवस कृश होत गेली. तिचा मूळ गोरा रंग लोप पावून तो काळा झाला.कालांतराने तिच्या या कठोर तपाने शिव तिला प्रसन्न झाले आणि तिचा काळा वर्ण पाहून त्यांनी आपल्या जटेतून वाहणाऱ्या पवित्र गंगेने तिला स्नान घातले. मग त्यानंतर ती एकदम वीज, चंद्र आणि शंखासारखी अत्यंत तेजस्वी आणि गौरवर्णी झाली, म्हणून तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाऊ लागले.
या बाबतीत श्रीदुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेली एक वेगळी कथा अशी आहे- कालीने जेव्हा रक्तबीज व अन्य राक्षसांचा वध केला आणि नंतर शांत होऊन ती जेव्हा मूळ पार्वती रूपात आली तेव्हा स्वतःचा रंग पाहून ती खिन्न झाली. नंतर तिने ब्रह्मदेवांची आराधना केली. तेव्हा ब्रह्मदेवांनी पार्वतीला हिमालयातील मानस सरोवरातील पवित्र जलात स्नान करायला सांगून तिचा मूळ वर्ण मिळण्याचा तिला वर दिला.तेव्हापासून पार्वतीदेवी मानस सरोवरात आजही स्नानासाठी येते अशी भाविकांची श्रद्धा आहे.कैलास मानस सरोवराजवळ पार्वतीच्या स्नानासाठी खास तलाव आहे,असे तिथे जाऊन आलेले भाविक सांगतात.
महागौरी ही श्वेतांबरधरा,वृषभ वाहिनी आणि चतुर्भुज आहे. तिने चारही हातांमध्ये अभय मुद्रा, त्रिशूल, डमरू आणि वरद मुद्रा धारण केलेल्या आहेत. तिचे मुखकमल अतिशय शांत, तृप्त, तेजस्वी आणि आल्हाददायक आहे.
महाअष्टमीला महागौरीचे विशेष पूजन करतात. तिच्या पूजनाचा श्लोक असा आहे -

'श्वेते वृषे समारूढा, श्वेतांबरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान् महादेव प्रमोददा ।।
आणि नाममंत्र असा आहे.
ओम् श्रीमहागौर्यै नमः।
गौरीची देवीसूक्ताने अभिषेक करून षोडशोपचारी पूजा करून तिला महावस्त्र अर्पण करावे.बेल वाहावा. रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. उत्तमोत्तम गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. मंत्रोच्चारयुक्त कुंकुमार्चन करावे. नारळ/कोहळा/ भोपळा फोडून त्याचा नैवेद्य दाखवावा. महागौरीच्या पूजनाने विवाहसौख्य लाभते.महापापांची निवृत्ती होऊन चित्तशुद्धी होते.महागौरी आपल्याला विवेक, शांती, समृद्धी,शुभता हे गुण प्रदान करते.
अष्टमीला आणि नवरात्रीत रोजच श्रीदुर्गासप्तशतीचा पाठ करावा. श्रीसूक्त, अन्नपूर्णा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, ललिता सहस्रनाम, श्रीदुर्गा द्वात्रिंशन्नाममाला,श्रीदुर्गा
अष्टोत्तरशतनाम स्तोत्र अशा अनेक स्तोत्रांचे आवर्तनयुक्त पठण करावे. त्या दिवशी कन्यापूजन करावे. सर्वांनी नारी शक्तीचा, स्त्रीशक्तीचा आदर आणि सन्मान ठेवण्याचे व्रत घ्यावे.स्त्रीभ्रूणहत्या टाळावी.आपल्या मुलींवर योग्य संस्कार करावेत.समाजातील वाईट शक्तींपासून त्यांना जपावे.त्यांना उपासना आणि त्यासोबतच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. त्यांची संगत चांगली आहे की नाही त्याकडे लक्ष द्यावे.
नवरात्र हा ऋतु परिवर्तनाचा काळ असतो.आश्विन महिन्यात आपण 'शारदीय' आणि चैत्र महिन्यात आपण 'वासंतिक' नवरात्र साजरे करतो. या दोन्ही वेळी आपण एका ऋतुतून दुसऱ्या ऋतूमध्ये पदार्पण करत असतो. त्यामुळे आपल्याला नवीन शक्ती,नवा उत्साह,नवी उमेद निर्माण होत असते. बृहत् संहितेनुसार नवग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव माणसाच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे, म्हणूनच वर्षातील हे दोन कालावधी देवी उपासना, जप, यज्ञ,आत्मसंयमन यासाठी उपयुक्त मानलेले आहेत. नवरात्रोत्सव हा अनेक उत्तम संस्कार देणारा, संयम,तपाचरण यांची शिकवण देणारा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त देवीउपासना करून हा काळआपण सर्वांनी सार्थकी लावावा.
डॉ. अपर्णा कल्याणकर (एम.ए., पीएच.डी.)

पुरोहिता, ज्ञानप्रबोधिनी केंद्र, सोलापूर
९८२४८८०७८९,