Marathi

शाश्वत नैसर्गिक शेती

byराजेंद्र भाट

₹240 In stock

  • Usually dispatched in 2–4 business days
  • Secure checkout
  • Direct from Sakal Publications

Also available on Amazon

Author
राजेंद्र भाट
Publisher
Sakal Publications
Language
Marathi
Pages
128
Published
2025-08-23
Dimensions
7 x 9.5

About this book

नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गातील अनेक घटकांचा जैवभार, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील असेंद्रिय द्रव्ये, एकात्म विचाराने, त्यांच्या सेंद्रिय जोडण्यांना सूक्ष्म जीव, वनस्पती, पाणी, कीटक, पक्षी आदींचा जराही धक्का न लावता, त्यांच्या वैशिष्ट्यांचे आणि मर्यादांचे आदर करून केली जाणारी शेती!

निसर्गात एकाच जमिनीत एकाच वेळी वेगवेगळी झाडे-झुडपे-गवते आणि वेगवेगळे जीवजंतू असतात. सर्वांना सारखे महत्त्व असणारे विविधतेचे हे सूत्र नैसर्गिक शेतीतही असते; म्हणूनच नैसर्गिक शेतीमध्ये एकपीक पद्धती अनुस्यूत नाही. नैसर्गिक शेती बहुपीक आणि बहुस्तरीय असते. केवळ शेतीच नव्हे तर त्याबरोबर आपली जीवनशैलीही निसर्गाला अनुसरून असणे अपेक्षित आहे. थोडक्यात, ही केवळ शेती नाही तर जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे.

राजेंद्र भट या पुस्तकात नैसर्गिक शेती पद्धतीचे बहुस्तरीय रूप उलगडून दाखवत तिचे सखोल आणि सर्वांगीण विवेचन प्रस्तुत करतात. प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि चिंतन यातून साकार झालेले त्यांचे हे लेखन अधिक मौल्यवान आणि उपयुक्त ठरते.

शेतकरी, अभ्यासक, शिक्षक, पर्यावरण आणि परिसंस्थेचे रक्षण करणारे, अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.

लेखकाबद्दल:

राजेंद्र श्रीकृष्ण भट्ट, बी.एस्सी. (कृषी)
सेंद्रिय कृषीभूषण निसर्गमित्र फार्म, बदलापूर

पहिल्या पिढीतील शेतकरी यांनी १९९० मध्ये बदलापूरजवळ बेंडशिळ गावात (तालुका अंबरनाथ, जिल्हा: ठाणे) शेती विकत घेऊन सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. १९९० पासूनच मृदा आणि जल संधारण, १९९३ मध्ये वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती.

  • आपल्या जेवणाच्या ताटातील जास्तीत जास्त पदार्थ आपल्याच शेतात पिकवण्याचा प्रयत्न करा.
  • भात पिकापासून मोहरीपर्यंत आणि नारळापासून मिरीपर्यंत बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीची शेती.
  • सदस्य, नैसर्गिक शेती विषयक राष्ट्रीय सल्लागार समिती
  • कृषी आधारित ग्रामीण विकासासाठी एका एनजीओमध्ये आठ वर्षे तज्ञ सल्लागार म्हणून काम.
  • कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्राचार्य म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ
  • कृषी सल्लागार, कृषी पर्यटन आणि कृषी प्रशिक्षण या क्षेत्रांत कार्यरत
  • आजवर १९५ सेंद्रिय आणि नैसर्गिक कृषी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहेत.

रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन, पुस्तके, 'निसर्गमित्र' नावाचे यू-ट्यूब चॅनल अशा विविध प्रसारमाध्यमांतून पर्यावरण व सेंद्रिय शेती संवर्धनासाठी कार्य.

२०१२-१३ चा विभागीय सेंद्रिय कृषीभूषण पुरस्कार; २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या दहा व्यक्तींमध्ये नामांकन.

About the author

Rajendra Bhat

Rajendra Bhat

राजेंद्र श्रीकृष्ण भट
बी.एस्सी. (कृषि) | सेंद्रिय कृषी भूषण
निसर्गमित्र फार्म, बदलापूर

राजेंद्र श्रीकृष्ण भट हे पहिल्या पिढीतील शेतकरी असून १९९० साली बदलापूरजवळील बेंडशील गावात (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) शेती विकत घेऊन त्यांनी सेंद्रिय शेतीस सुरुवात केली. १९९० पासूनच त्यांनी मृदा व जलसंधारणावर विशेष भर दिला. १९९३ मध्ये वयाच्या पस्तिशीत त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेतीला वाहून घेतले.

आपल्या कुटुंबाच्या जेवणाच्या ताटातील जास्तीत जास्त अन्न स्वतःच्या शेतातच पिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भातापासून मोहरीपर्यंत आणि नारळापासून मिरीपर्यंत बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीने ते शेती करतात. ते नैसर्गिक शेती विषयक राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

कृषीआधारित ग्रामीण विकासासाठी एका स्वयंसेवी संस्थेमध्ये त्यांनी आठ वर्षे तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी ते एक वर्ष प्राचार्य म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते कृषी सल्लागार, कृषी पर्यटन व कृषी प्रशिक्षण या क्षेत्रांत सक्रिय आहेत.

आजवर त्यांनी १९५ सेंद्रिय व नैसर्गिक कृषी प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. रेडिओ, दूरदर्शन, वृत्तपत्रांतील सदरलेखन, पुस्तके तसेच ‘निसर्गमित्र’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धन व सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करीत आहेत.

त्यांना २०१२–१३ मध्ये विभागीय सेंद्रिय कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला असून २०१७ मध्ये राष्ट्रीय पातळीवर पहिल्या दहा व्यक्तींमध्ये त्यांचे मानांकन झाले आहे.

Rajendra Shrikrishna Bhat
B.Sc. (Agriculture) | Organic Agriculture Expert
Nisargmitra Farm, Badlapur

Rajendra Shrikrishna Bhat is a first-generation farmer who began organic farming in 1990 after purchasing farmland in Bendsheel village near Badlapur (Taluka Ambarnath, District Thane). From the very beginning, he placed special emphasis on soil and water conservation. In 1993, at the age of 35, he resigned from his job and took up farming full-time.

He strives to grow as much of his family’s food as possible on his own farm. From rice to mustard and coconut to pepper, he practices multi-layered, multi-crop farming. He is also a member of the National Advisory Committee on Natural Farming.

For agricultural-based rural development, he worked for eight years as an expert consultant in a voluntary organization. He has also served as principal for one year for an agricultural degree program. Currently, he is active in the fields of agricultural consultancy, agro-tourism, and agricultural training.

To date, he has conducted 195 training sessions on organic and natural farming. Through radio, television, newspapers, books, and his YouTube channel Nisargmitra, he actively promotes environmental conservation and organic farming.

He was awarded the Departmental Organic Agriculture Bhushan Award in 2012–13 and, in 2017, was recognized nationally among the top ten individuals in his field.

Look inside

Delivery & returns

Free delivery on orders above ₹599. Smaller orders: shipping is calculated at checkout.

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Received a damaged or incorrect book? Tell us within 48 hours at sakalprakashan@esakal.com with photos and we will replace or refund it. Shipping policy

शाश्वत नैसर्गिक शेती₹240

Help

Questions about your order

Call 020-24405678 or WhatsApp +91 88888 49050.

Contact us
How long will my order take to arrive?

Orders are usually processed within 2–4 business days. Delivery then takes about 4–7 business days within Maharashtra and nearby states, and 7–10 business days elsewhere in India.

Can I change or cancel my order?

If your order has not been dispatched, write to sakalprakashan@esakal.com or WhatsApp 88888 49050 straight away for cancellations or address changes.

How do I track my order?

Once your order is dispatched you will receive a tracking link by email and/or SMS. You can also contact us for an update.

Is Cash on Delivery available?

The payment options for your address — including Cash on Delivery where eligible — are shown at checkout.