Skip to product information
Common Stocks And Uncommon Profits
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Common Stocks And Uncommon Profits

Author(s):  Philip A. Fisher, Koustubh Moreshwar Kelkar

कॉमन शेअर्समधील गुंतवणूक यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे बदललेली नाहीत; उलट ती पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहेत. ही मूलभूत तत्त्वे नेमकी कोणती आहेत, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. कोणत्या प्रकारचे शेअर्स खरेदी करावेत, केव्हा खरेदी करावेत; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - जोपर्यंत त्या कंपनीत एक विशेष यशस्वी संस्थेची वैशिष्ट्ये टिकून आहेत, तोपर्यंत ते शेअर्स विकू नयेत, हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
गुंतवणूक क्षेत्रातील अनेक सक्षम व्यक्तींनी वारंवार केलेल्या अगदी साध्यासाध्या चुकांबद्दल या पुस्तकात चर्चा केली आहे. ही चर्चा वाचकांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹599.00
Published on 30/07/2026 | 370 Pages

कॉमन शेअर्समधील गुंतवणूक यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे बदललेली नाहीत; उलट ती पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहेत. ही मूलभूत तत्त्वे नेमकी कोणती आहेत, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. कोणत्या प्रकारचे शेअर्स खरेदी करावेत, केव्हा खरेदी करावेत; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - जोपर्यंत त्या कंपनीत एक विशेष यशस्वी संस्थेची वैशिष्ट्ये टिकून आहेत, तोपर्यंत ते शेअर्स विकू नयेत, हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
गुंतवणूक क्षेत्रातील अनेक सक्षम व्यक्तींनी वारंवार केलेल्या अगदी साध्यासाध्या चुकांबद्दल या पुस्तकात चर्चा केली आहे. ही चर्चा वाचकांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

Philip A. Fisher

फिलिप ए. फिशर (१९०७–२००४) हे अमेरिकन शेअर बाजारातील गुंतवणूकदार, ग्रोथ इन्व्हेस्टिंग (Growth Investing) या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचे अग्रदूत आणि फिशर अँड कंपनीचे संस्थापक होते. १९५८ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे 'कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स' हे पुस्तक गुंतवणूक क्षेत्रातील एक अभिजात (Classic) ग्रंथ मानले जाते. या पुस्तकाचा आधुनिक गुंतवणूक विश्वातील दिग्गज वॉरेन बफे यांच्यासह अनेक यशस्वी गुंतवणूकदारांवर मोठा प्रभाव पडला असून, आजही ते मूल्यवान मार्गदर्शक मानले जाते.

Koustubh Moreshwar Kelkar

पुस्तकाचे अनुवादक कौस्तुभ मोरेश्वर केळकर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधारक असून त्यांना इंजिनिअरिंग मार्केटिंग क्षेत्रात ३४ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कल्याणी स्टील्स, सुझलॉन एनर्जी, महिंद्रा युजीन स्टील्स, मेगा फायबर अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये मार्केटिंग विभागात काम केले आहे. मेगा फायबर या कंपनीत त्यांनी दहा वर्षे मार्केटिंग विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.

रिसिव्हरेबल्स मॅनेजमेंट (विक्री देयके वसुली) या क्षेत्रात त्यांचे विशेष प्रावीण्य असून कंपनीच्या कॅश फ्लोमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध पातळ्यांवर बिझनेस डेव्हलपमेंटच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या; आणि अतिशय स्पर्धात्मक परिस्थितीमध्येही त्यांनी ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय, देशातील कंपन्यांकडून मोठा व्यवसाय मिळवला आणि वाढवला.

अर्थकारणातील विषयांमध्ये त्यांना आवड असून, २००८पासून सकाळ माध्यम समूहाच्या दैनिक सकाळ, साप्ताहिक सकाळ, सकाळ मनी, सप्तरंग अशा विविध प्रकाशनांमध्ये पर्सनल फायनान्स, शेअर बाजार, वीज, ऊर्जा क्षेत्र, भारतीय आणि परकीय चलन, तसेच रिझर्व्ह बँकेची धोरणे यावर त्यांचे तीनशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. याखेरीज, २०२२मध्ये त्यांचे शेअर बाजारात करा अभ्यासपूर्ण गुंतवणूक हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. कच्चे तेल या विषयावर त्यांचा अभ्यास असून या विषयावरही त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत, तसेच विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील 'कच्चे तेल' या विषयातील चर्चेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Philip A. Fisher and Koustubh Moreshwar Kelkar

Language

Marathi

ISBN

9789377062613

Binding
  • Paperback
Pages

370

Publication Year

30/07/2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.