Skip to product information
Maafi Gen Z chi : Shapath Pruthvichi
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

Continue shopping

Maafi Gen Z chi : Shapath Pruthvichi

Author(s):  Dr. Jagganath Patil

आपल्याला पृथ्वीसाठी एक गाणं गायलं पाहिजे आणि ते गाणं अर्थातच हिरवं असलं पाहिजे. सभोवती गर्द झाडी, झुळझुळणारी नदी, खळाळणारे ओढे, कोसळणारे धबधबे आणि शेतात डोलणारी पिकं या सगळ्यांच्या सान्निध्यात या हिरव्या गाण्याची लकेर आसमंतात घुमली पाहिजे.

पण... ज्या काळात विकासाच्या नावाखाली झाडांची तोड सुरू आहे आणि पृथ्वीला ओसाड करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे, त्या काळात हे सगळं एखादं स्वप्न वाटू शकतं. मात्र कोणतीही गोष्ट साकार व्हायची असेल, तर आधी ती स्वप्नांत उभी राहतेच.

'माफी Gen Z ची : शपथ पृथ्वीची' या काव्यसंग्रहातील डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या कविता नव्या पिढीच्या मनात हिरव्या पृथ्वीचं स्वप्न पेरणाऱ्या कविता आहेत. म्हणूनच आजच्या काळात या कवितांचं मोल विशेषत्वाने जाणवतं.

आधीच्या पिढ्यांनी निसर्गाशी जो कृतघ्न व्यवहार केला, त्याबद्दल नव्या पिढीची माफी मागतानाच कवीने पृथ्वीसाठी आधुनिक काळात लिहिलेलं एक भावपूर्ण प्रेमगीत म्हणजे हा काव्यसंग्रह.

तरुणांच्या आणि मुलांच्या मनात निसर्गप्रमाची जाणीव जागवण्यात हा संग्रह नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल, याची मला खात्री आहे.

- सयाजी शिंदे, अभिनेता व पर्यावरणप्रेमी

Book Format

Paperback
Out of Stock
₹100.00
Published on 15-10-2026 | 46 Pages

Dr. Jagganath Patil

डॉ. जगन्नाथ पाटील

ई-मेल: jp.naacindia@gmail.com

संपर्क : ९९४५५६७०३६

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त शिक्षणतज्ज्ञ, लेखक, विचारवंत

आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण वर्तुळात जेपी या नावाने प्रसिद्ध

राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय संस्थेमध्ये सल्लागार म्हणून गेली २३ वर्षे कार्यरत

आशिया प्रशांत खंडातील ६० देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एशिया पॅसिफिक क्वालिटी नेटवर्क -एपीक्यूएन - या आंतरराष्ट्रीय संघटनेचे पहिले भारतीय अध्यक्ष

हार्वर्ड, स्टॅनफोर्ड अशा विद्यापीठांचे मूल्यांकन करणाऱ्या इंटरनॅशनल नेटवर्क फॉर क्वालिटी अशूरन्स इन हायर एज्युकेशन (INQAAHE) या संघटनेचे पहिले आशियाई अध्यक्ष

एशिया पॅसिफिक क्वालिटी रजिस्टर या आंतरराष्ट्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष

युनेस्को, जागतिक बँक, युरोपियन युनियन अशा विविध आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मोहिमांवर व प्रकल्पावर तज्ज्ञ म्हणून कार्य

२००७ : ऑस्ट्रेलिया सरकारचा इंडीवर इंडिया पुरस्कार

२०१३ : ONESQA, थायलंड इथे उपपंतप्रधानांकडून मानपत्र, अमेरिकन सरकारच्या प्रतिष्ठित आयव्हीएलपी पुरस्कारासाठी नामांकन

२०१९ : श्रीलंकेच्या पंतप्रधानांकडून प्रशस्तिपत्र असे अनेक जागतिक सन्मान

नॅक व भारत यांच्यासाठी अनेक जागतिक सन्मान मिळवण्यात सिंहाचा वाटा

जगभरातील साठहून अधिक देशांमध्ये तज्ज्ञ म्हणून निमंत्रणे, व्याख्याने, कार्यशाळा व की-नोट अॅड्रेस

अनेक वंचित विद्यार्थ्यांचे पालकत्व आणि ग्रामीण संस्थांचे मेंटॉर म्हणून मार्गदर्शन

जपान सरकारच्या उच्च शिक्षण गुणवत्ता संस्थेच विशेषज्ञ म्हणून भारत-जपान सहकार्य प्रकल पत्रकारितेतील डॉक्टरेट असलेले जगन्नाथ पाटील हे केवळ शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत; ते पर्यावरण, शाश्वत विकास, समाजभान या विषयांवर 'अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या' भूमिकेचा सजगपणे विचार व्यक्त करणारे विचारवंत आहेत. गुणवत्ता मूल्यांकन संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांची पर्यावरण रक्षणामधील भूमिका या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे ते सध्या नेतृत्व करत आहेत.

चंबुखडी ड्रीम्स हे पुरस्कारप्राप्त आत्मकथन युवावर्गामध्ये लोकप्रिय.

माफी Gen Zची : शपथ पृथ्वीची हा त्यांचा कवितासंग्रह पृथ्वीशी नव्याने नातं जोडण्याचा आणि पुढील पिढ्यांसाठी एक हिरवी प्रतिज्ञा करण्याचा मनापासूनचा प्रयत्न आहे.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr. Jagganath Patil

Language

Marathi

ISBN

9788169355599

Binding
  • Paperback
Pages

46

Publication Year

15-10-2026

Dimensions
5.5 x 8.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.