Skip to product information
Gagabhattkrut Shivrajabhishekprayog
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Gagabhattkrut Shivrajabhishekprayog

Author(s):  Jayshree Sathe

छत्रपती शिवाजीमहाराज हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. शिवाजीमहाराज आणि त्यांचा राजाभिषेक हा आपल्या सर्वांच्या अभिमानाचा विषय आहे. शिवाजीमहाराजांच्या अफाट पराक्रमामुळे आनंदनाम संवत्सर, शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध १३, ६ जून १६७४ या आनंदमय दिवशी हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. रायगडावर वेदमंत्रांच्या पवित्र घोषात झालेल्या राजाभिषेकविधीने शिवाजीराजे 'छत्रपती सिंहासनाधीश्वर महाराज' म्हणून अजरामर झाले.

शतकानुशतके आपल्याच मायभूमीवर गुलामीचे जीवन जगणाऱ्या प्रजेसाठी ही स्वातंत्र्याची पहाट होती. हा राजाभिषेक म्हणजे आपल्या भारतभूमीवरील फार मोठी ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, राजनैतिक सांस्कृतिक अशी क्रांतिकारी घटना होती. सुवर्णाक्षरात नमूद करण्याजोग्या युगप्रवर्तक अशा या शिवराजाभिषेकविधीसाठी काशीस्थित प्रकाण्ड्पण्डित गागाभट्ट यांनी श्रुति, स्मृति, धर्म, पुराण, राजनीती विषयक ग्रंथांमधील विश्वकल्याणात्मक परंपरांवर आधारित अद्वितीय असा प्रयोगग्रंथ रचला. आणि

प्रस्तुत 'गागाभट्टकृत-शिवराजाभिषेकप्रयोगः पुस्तकात अभिषेक, राजाभिषेक या संकल्पनांचा विकास, सात-आठ दिवस चाललेल्या अभिषेकविधीतील महत्त्वपूर्ण असे गौण व मुख्य विधी, त्यांतील आशयघन मंत्र यांवर पूर्णतः प्रकाश टाकणारा उपोद्घात, मूळ संस्कृत प्रयोगग्रंथाचे चिकित्सक संपादन आणि मराठी अनुवाद सादर केला आहे. तसेच जुन्या शकावली, बखरी इत्यादीतील अधिकृत तपशीलही दिल्यामुळे या संस्कृत ग्रंथाला ऐतिहासिक बाजही लाभून, शिवराजाभिषेकविषयक समग्र माहिती इथे एकत्रित स्वरूपात दिली आहे.

Book Format

Paperback
In Stock
₹1,500.00
Published on 12/8/2020 | 493 Pages

Jayshree Sathe

प्रा. डॉ. सौ. जयश्री साठे

(निवृत्त) प्र-कुलगुरु, प्रधान संपादक - संस्कृत विश्वकोश, संस्कृत व कोशशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज, अभिमत विद्यापीठ, पुणे.

एम.ए. (संस्कृत) सुवर्णपदक, पी.एचडी. (सामवेद), पुणे विद्यापीठ.

गेली ४४ वर्षे संस्कृतचा व्यास विदेशातील अनेक विद्यार्थी, संशोधकाना अध्यापन, आणि संशोधनासाठी मार्गदर्शन.

डेक्कन कॉलेजच्या जगद्विख्यात संस्कृत विश्वकोशाच्या २६ खंडांच्या संपादनात महत्त्वाचे योगदान.

वेद, वेदाङ्ग, वेदान्त, उपनिषदे, कोशशास्त्र अशा विविध विषयांवर अनेक व्याख्याने. संशोधन प्रबंध - मार्गदर्शक आणि परीक्षक. अनेक चर्चासत्त्र, परिषदांमध्ये प्रमुख अतिथी, अध्यक्ष, वक्ता म्हणून सहभाग.

महाराष्ट्र शासनाचा कालिदास संस्कृत साधना पुरस्कार, पंडित सातवळेकर पुरस्कार, इंदिरा बेहेरे पुरस्कार इत्यादींनी सन्मानित.

Publisher

Bhandarkar Oriental Research Institute

Author

Jayshree Sathe

Language

Marathi

ISBN

9789392194528

Binding
  • Hardcover
Pages

493

Publication Year

12/8/2020

Dimensions
7 x 9.5

You may also like

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, or Amazon.in . You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.